शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले
पान क्र. ४१
आम्हां शूद्र शेतकऱ्यासंबंधीं आर्य भट ब्राह्मणांस सूचना, व सांप्रत सरकारनें कोणकोणते उपाय योजावेतः– हें शेवटचे पांचवें प्रकरण सुरू करण्याचे पूर्वी या प्रकरणांत भट पडू नये, या इराद्यानें या देशांतील महाधूर्त आर्य भटब्राह्मणांस या प्रसंगी काही सूचना करितो. त्या योगाने आमच्या परदेशी विद्वान सरकारासह आपल्या स्वदेशी अज्ञानी दस्यू शूद्र बांधवांचे डोळे उघडून शुद्धीवर येवोत, असें माझें देवाजीजवळ मागणे आहे. कारण त्यांनीं आतांशी आपल्या धर्मरूपी तरवारीनें सर्व लोकांच्या, ऐश्वर्याचे चरचरा गळे कापणाऱ्या शास्त्ररूप खडगास सोवळ्याच्या वळकुट्यांनी लपवून आपण मोठ्या स्वदेशअभिमान्यांचीं सोंगे आणून मांगामहाराकडे ढुंकून न पाहतां शूद्र, पारशी, मुसलमान लोकांतील अल्लड होतकरू पौरासोरांस एकंदर सर्व आपल्या पुस्तकांनी, वर्तमानपत्रांनीं, सभांनीं, वगैरे मार्गांनी आपल्या देशांतील उच्चनीच भेदभावाविषयीं आपण सर्वत्रांनीं आपआपसांत कुरकुरण्याच एकीकडे ठेवून, एकचित्त होऊन आपली सर्वाची एकी केल्याशिवाय या आपल्या हतभाग्य देशाची उन्नती होणे नाही, असा उपदेश करितात. हें ऎकून अक्षरशून्य शेतकऱ्यांनी काही विपरीत आचरण करू नये, म्हणून येथे थोडासा प्रयत्न करून पहातों. या उपर त्यांचे नशीब.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पूर्वी धूर्त भटब्राह्मणांच्या पूर्वजांनी आपल्या धनुर्विद्येच्या जोराने (दस्यू) शूद्रांवर वर्चस्व मिळवून त्यांजवर त्यांनी आपला कडकडींत अम्मल बसविल्या दिवसापासून आज हजारों वर्षे पराजित झालेल्या (दस्यू) शूद्र रयतेचा चालत आलेला व आजतगाईत त्यांनी आपल्या हस्तगत झालेल्या शूद्रांस मतलबाने अज्ञानी ठेविल्यामुळे, शूद्र शेतकऱ्यास आपल्या मूळच्या वास्तविक मानवीअधिकाराचा विसर पडून, ते यांनी बनविलेल्या ग्रंथातील मतलबी मतास बौद्ध, महमदी व ख्रिस्ती पुस्तकांतील सार्वजनिक मानवधर्माप्रमाणे पवित्र मानून विश्वास ठेवू लागल्यामुळे, एकंदर सर्व अज्ञानी शूद्र, ब्राह्मणांचे अंकित होऊन ते इतर मनुष्यमात्रांचा, अधिकारानुसारी खऱ्या धर्माचा तिरस्कार करून त्यांची निंदा करण्यामध्यें पुण्य मानूं लागले. यामुळे ते यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या दगलबाज्या करूं लागले. तथापि हे (शुद्र) तसें करणे हा त्यांचा अधिकारच, असें मानूं लागले. व ब्राह्मणांच्या दगलबाज्यांविषयीं शूद्रांनी शंकासुद्धां घेऊं नये, हाच काय तो शूद्रांचा धर्म, म्हणून जो प्रचार पडला, तो आजकाळपावेतों चालू आहे. यांतील वास्तविक व्यंगिताविषयी परदेशस्थ इंग्लिश सरकार व त्यांचे ऎषआरामी गोरे कामगार सर्व प्रकारें गैरमाहीत असल्यामुळे त्यांच्याने याजविषयीं योग्य बंदोबस्त होत नाही. यास्तव एकंदर सर्व शूद्र शेतकऱ्यांची स्थिती एवढ्या दैन्यवाण्या मजलशीस येऊन पोहोचली आहे व अद्यापही आपण नामानिराळे राहून परभारें शेतकऱ्यांकडून मोठमोठी महत्त्वाची कामें करून घेण्याचे उद्देशानें हे (ब्राह्मण) आपल्या सभांनी, वर्तमानपत्रांनीं व पुस्तकांनी त्यांस आपल्या नादी लावण्याकरितां नेहमी उपदेश करितात की “शूद्र शेतकऱ्यांनी ब्राह्मणांबरोबर एकनिष्ठेनें राहून त्यांच्याशी एकी केल्याशिवाय या दुर्दैवी देशाची उन्नत्ति होणेच नाही.” आतां हया त्यांच्या पोकळ उपदेशावरून अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांस उन्नतीच्या थापा देऊन, त्यास केवळ फसविण्याचा हेतू दिसतो. कारण ब्राह्मणांच्या पूर्वजांनी आपल्या सत्तेच्या मदांत आपणास भूदेव मानून, निर्बळ शूद्र शेतकऱ्यांस दासासारखे वागवू लागले. व ती अति नीच सुरू केलेली वहिवाट आजदिनपावेतों अन्य रीतीनें जागृत ठेविली आहे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. ४२
यावरून शेतकऱ्याबरोबर अशी परकी ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल, हें महाप्रतापी, “डाक्टर फ्रेंकलीन” “टामस पेन” वगैरे प्रमुख गृहस्थांनी या विद्येच्या प्रतापार्ने रात्रंदिवस सतत परिश्रम करून उद्योग करणारे अमेरिकन कसबी लोक आपल्या कलाकुसरीच्या सहाय्यानें युरोपखंडांतील एकंदर सर्व राष्ट्रांतील कारागीर लोकांस मार्गे हटवून, तेथील कोट्यावधि रुपये साल दरसाल घेऊन जातात. ती विद्या ब्राह्मणांच्या पूर्वजांनी आपल्या वर्चस्वाच्या धुंदीत शूद्र शेतकऱ्यांस देऊं नये, म्हणून आपल्या मतलबी ग्रंथांत अटोकाट बंदीचे लेख करून ठेविले. यामुळे या देशांतील खरी शिपाईगिरी व धनुर्विद्येची बढवी होण्याचे काम अगदी बंद पडले. तसें जर नाही म्हणावें, तर आपण आपल्या डोळ्यांनी नेहमी पाहतो कि, आताशी शिंदे, होळकर वगैरे महापुरुषांच्या घराण्यांतील कित्येक तरूण खासें घोड्यावर बसून भालेबोथाट्याची बरीच टुरटूर करतात, परंतु त्या हतभाग्यांस दुर्बिणी कशा लावून कोणत्या ठिकाणी मोर्चे बांधून, तोफेचे गोळे कसे डागावेत, या कामी ते काळ्या कपिला गाईचे बाप ! ते आपल्या पागोठ्याला पिळावर पिळ घालून वडिवलांच्या अबूचा खराबा करून शूद्र शेतकऱ्यांचे उतावर खायला काळ आणि धरणीवर भार मात्र झाले आहेत. या कारणावरून अनेक वेळी ‘फ्रेंच’, ‘पोर्तुगीज' व 'मुसलमान’ वगैरे लोभी बादशहांनी या देशांत स्वाऱ्या करून येथील अतोनात द्रव्य आपल्या देशांत घेऊन गेले, त्यांतून कित्येकांनी ब्राह्मणांच्या मतलबी धर्माची विटंबना केली. अखेरीस कित्येक खुदापास्त मुसलमान सरदारांनी हजारो भटब्राह्मणांच्या कानाला धरून आपल्या मानवी धर्मांत ओढीत नेऊन त्यांच्या चटचटा सुंता केल्या. तथापि त्यांनी हा काळपावेतों आपल्या संस्कृत पाठशाळांनी शूद्र शेतकऱ्यांचे मुलांस विद्या शिकविण्याची बंदी कायम ठेविली आहेच.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
यावरून शेतकऱ्यांबरोबर अशा ब्राह्मणांची मनुष्यामध्यें व एकंदर सर्व प्राणीमात्रांमध्यें इतर स्वभावजन्य गुण सर्व समान आहेत, असें अनुभवास येतें. जसें पशूस आहार, निद्रा. मैथून, आपल्या बच्चांची जतणूक करणे, शत्रूपासून आपला बचाव करणे व पोट भरल्यावर डुरक्या फोडून धडका घेण्याशीवाय दुसरें कांहीं कळत नाहीं, यास्तव त्यांच्याने सदरच्या व्यवहारांत कोणत्याही प्रकारची तिळमात्र सुधारणा करवत नसल्यामुळे त्यांच्या मूळचा स्थितींत कोणत्याच तन्हेची उलटापालट होत नाहीं. परंतु मानव प्राण्यांस स्वभावत:च एक चमत्कारिक विशिष्ट बुद्धि आहे. तिच्या योगानें तो एकंदर सर्व जलजंतू पशू, पक्षी, कीटक वगैरे प्रानीमात्रांमध्यें महत्त्वास चढून श्रेष्ठत्व पावला आहे व त्याच बुद्धीच्या योगाने त्याने आपले विचार कागदांवर टिपून ठेवण्याची युक्ती शोधून काढली.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. ४३
यावरून चोंहो खंडांतील लोकांस आजपावेतो लागलेल्या ठेचांविषयी अनुभवशीर वृत्तांत टिपून ठेवितां आल्यामुळे हल्ली जगांत अनुभविक ज्ञानभांडाराचा येवढा मोठा समुदाय जमला आहे व त्या अनुभविक ज्ञानाच्या सहाय्यावरून बुद्धीच्या मदतीनें युरोपियन लोक आपले महत्त्वाचे विचार तारांयंत्राद्वारें हजारों मैलांचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळांत आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधि खंडी धान्य एकमेकांचा बचाव करतात. आणि अशा बुद्धिमान मानवजातीपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्यांनें एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जरजर करून गाईब्राह्मणांसह त्यांच्या मतलबी धर्माचा प्रतिपाळ केला. हा प्रकार मनी स्मरून अक्षरशून्य शूद्र शिवाजीच्या निमकहराम पेशवे सेवकानें शिवाजीच्या अज्ञानी वंशजास सातारचे गडावर कैर्देत ठेवून, त्यांची चौकशी ठेवण्याचे काम महाकूर निर्दय अशा त्रिंबकजी डेंगळ्यावर सोपवून आणि पुणे शहरांत आपल्या जातीच्या आर्य भटब्राह्मणांस रमण्यामध्यें रुपयेमोहोरांची दक्षिणा वाटून ब्राह्मणतर्पणे करून रात्रंदिवसकाळ कृष्णलीलेचे पुण्यआचरण करितां करितां, ब्राह्मणासारखे एकेरी धोतर नेसण्याबद्दल शूद्र शेतकऱ्यांसह शिपी वगैरे जातीच्या लोकांस शिक्षा करीत बसले.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
इतकेंच नव्हे, परंतु हल्लीचे भटब्राह्मण शेतकऱ्यांच्या विष्ठा खाणाऱ्या गायांचे मूत्रास पवित्र तीर्थ मानून त्याच्या सेवनानें शुद्ध होतात. आणि तेच भटब्राह्मण आपल्या मतलबी धर्माच्या (Sir William Jones, Vol.II, page 224. It is, indeed, a system of despotism and priestcraft, both limited by law, but artfully conspiring to give mutual support, though with mutual checks; it is filled with strange conceits in metaphysics and natural philosophy, with idle superstitions and with a scheme of theology most obscurely figurative and consequently liable to dangerous misconception; it abounds with minute and childish formalities with ceremonies generally absured and often ridiculous.) हिमायतीनें शूद्र शेतकऱ्यांस नीच मानितात. यावरून शेतकऱ्यांबरोबर अशा ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल?
आर्यब्राह्मणांतील कित्येक, खोटे कागद, बनावट नोती व लांच खाल्याबद्दल सक्तमजुरीच्या शिक्षा भोगितात व कित्येक जरी शक्तमिषे अशौच मांगिणीबरोबर मद्यमांसादि निद्य पदार्थ भक्षण करितात, तरी ते भोंसले, शिदे, होळकर वगैरे शूद्र राजेरजवाड्यांस नीच मानून त्यांजबरोबर रोटीव्यवहार करीत नाहीत. बहुतक अटब्राह्मण गावांतील आोवळ्या कसबिणींच्या घरी सर्व प्रकारचा नीच व्यवहार करितात, तरी ते आर्य भट सालस शूद्र शेतकऱ्यांबरोबर बेटीव्यवहार करण्यांत पाप मानतात, यावरून "ढ" च्या पुढल्या “क्ष" नें म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांबरोबर ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल? एकंदर सर्व भटब्राह्मण आपल्या देवळांतील दगड, धातूच्या मूर्तीस शूद्र शेतकऱ्यांस स्पर्शसुद्धां करूं देत नसून, दुरून कां होईना, त्यांस आपल्या पंक्तिशेजारी बसवून जेऊं न घालतां त्यास न कळवितां, आपल्या पात्रांवरील उरलेलें उष्टें तूप त्यांस घालून त्यांच्या पंक्ति उठवतात. यावरून शेतकऱ्यांबरोबर अशा ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल?
आर्यब्राह्मणांतील कित्येक, खोटे कागद, बनावट नोती व लांच खाल्याबद्दल सक्तमजुरीच्या शिक्षा भोगितात व कित्येक जरी शक्तमिषे अशौच मांगिणीबरोबर मद्यमांसादि निद्य पदार्थ भक्षण करितात, तरी ते भोंसले, शिदे, होळकर वगैरे शूद्र राजेरजवाड्यांस नीच मानून त्यांजबरोबर रोटीव्यवहार करीत नाहीत. बहुतक अटब्राह्मण गावांतील आोवळ्या कसबिणींच्या घरी सर्व प्रकारचा नीच व्यवहार करितात, तरी ते आर्य भट सालस शूद्र शेतकऱ्यांबरोबर बेटीव्यवहार करण्यांत पाप मानतात, यावरून "ढ" च्या पुढल्या “क्ष" नें म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांबरोबर ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल? एकंदर सर्व भटब्राह्मण आपल्या देवळांतील दगड, धातूच्या मूर्तीस शूद्र शेतकऱ्यांस स्पर्शसुद्धां करूं देत नसून, दुरून कां होईना, त्यांस आपल्या पंक्तिशेजारी बसवून जेऊं न घालतां त्यास न कळवितां, आपल्या पात्रांवरील उरलेलें उष्टें तूप त्यांस घालून त्यांच्या पंक्ति उठवतात. यावरून शेतकऱ्यांबरोबर अशा ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल?
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. ४४
हजरत महमद पैगंबराच्या निस्पृह शिष्यमंडळींचे जेव्हां या देशांत पाऊल पडलें, तेव्हां ते अक्षरशून्य शूद्वांस नाटी लावण्याकरितां महा धूर्त मुकुंदराज भटांनी जे संस्कृतच्या उताऱ्यावर थोडी नास्तिक मताची कल्हई करून त्याचा विवेकसिंधु नामक एक प्राकृत ग्रंथ करून त्यांच्यापुढे मांडला व पुढे इंग्रज बहादराचा अम्मल होईतोपावेतों आर्यभटांनी आपल्या भाकड भारतरामायणांतील शेतकऱ्यांस गोष्टी सांगून, त्यांना उलटे मुसलमान लोकांबरोबर लढण्याचे नाटों लाविलें; परंतु अक्षरशून्य शेतकऱ्यांस मुसलमानांच्या संगतीने आपल्या मुलांस विद्या शिकविण्याचे सुचूं दिलें नाही. यामुळे इंग्लिश अम्मल होतांच सहजच एकंदर सर्व सरकारी खात्यांनीं मोठमोठ्या महत्त्वाच्या जागा आर्यब्राह्मणांस मिळून ते सर्वोपरी शेतकऱ्यांस लुबाडून (A Sepoy Revolt by Henry Mead, page 225.) खाऊं लागले व आर्यभट, इंग्रज वगैरे एकंदर सर्व युरोपियन लोकांस जरी मांगामहारासारखे नीच मानीत आहेत, तथापि त्यांच्या महाधूर्त पूर्वजांनी महापवित्र मानलेले वेद, ज्यांची शेपटेंसुद्धां शूद्र शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडूं देत नाहीत, ते सोवळे बुरख्यांतील वेद, हल्ली त्यांच्यांतील मोठमोठाले जाडे विद्वान काखेंत मारून गोऱ्या म्लेंछ लोकांच्या दारोदार जाऊन त्यांस शिकवित फिरतात. परंतु हे भटब्राह्मण खेड्यापाड्यांनी सरकारी शाळांत शूद्र शेतकऱ्यांच्या अज्ञानी मुलांस साधारण विद्या शिकवितांना थोडी का आवडनिवड करतात? यावरून शेतकऱ्यांबरोबर अशा ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल? एकंदर सर्व धार्मिक मिशनरी वगैरे युरोपियन लोकांच्या परागंदा झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलास मोठमोठाल्या शहरीं थोडीशी विद्या प्राप्त झाल्याबरोबर त्यांस गोऱ्या कामगारांच्या दयाळूपणामुळे चुकून आपल्या कचेऱ्यांनी जागा दिल्या की, एकंदर सर्व कचेन्यांतील भटकामगार त्यांच्याविषयी नानाप्रकारच्या नालस्त्या गोऱ्या कामगारांस सांगून त्यांना अखेर कामावरून हांकून देववितात व कित्येक भटकामगार आपल्या वरच्या सरकारी गोऱ्या कामगारांच्या मेहेरबान्या होण्याकरिता, अज्ञानी शेतकऱ्यांचे पिकपाण्याविषयीं भलत्यासलत्या लांड्यालबाड्या त्यांस सांगून शेतकऱ्यांची योग्य दाद लागण्याचे मार्गात आडफाटे घालून त्यांस चळाचळा कांपावयास लावितात.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
यावरून शेतकऱ्यांबरोबर अशा ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल? आर्यब्राह्मणांपैकी एकंदर सर्व वैदिक, शास्त्री, कथाडे, पुराणिक वगैरे भटभिक्षुक नानाप्रकारची संधीनें लढवून अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांपैकी भोसले, शिन्दे, होळकर वगैरे राजेरजवाड्यांस पोकळ धर्माच्या बहुरूपी हुलथापा दऊन त्यांस यजमान म्हणतां म्हणतां त्यांजपासून शेकडों ब्राह्मण भोजनें, प्रतिदिवशीं गोप्रदानें व दानधर्म उपटीत असून भटब्राह्मणांच्या जातीतील पंतप्रतिनिधी, सचीव, सांगलीकर वगैरे ब्राह्मणसंस्थानिकांनी दुष्काळांतसुद्धां आपल्या यजमान शूद्र शेतकऱ्यांच्या मंडळास, साधों कां होईनात, भोजनें देऊन त्यांचे वंदन करून आशिर्वाद घेत नाहीत. व त्यांच्यापैकी बहुतेक विद्वान ब्राह्मण, गायकवाड वगैरे शुद्र संस्थानिकांकडून हल्ली हजारो रुपयांचीं वर्षासनें व नित्यशः खिचड्या उपटीत असल्याबद्दल उपकार मनीं स्मरून ब्राह्मण संस्थानिकांपैकी एकानेंही शेतकऱ्याच्या मुलास अन्नवस्त्र पुरवृन त्यास विद्वान करवलें नाही. यावरून शेतकऱ्यांबरोबर आर्य ब्राह्मणांची एकी कशी होऊं शकेल? एकंदर सर्व श्रीमंत भटब्राह्मणांचे घरी, दररोज भिक्षा वाटतांना आवडनिवड करून ब्राह्मण भिकाऱ्यांस तांदूळ व शूद्र, मुसलमान वगैरे भिकाऱ्यांस चिमूटचिमूट जोंधळे दिले तर दिले, नाही तर, पुढे हो, म्हणून सांगतात. यावरून आर्य भटब्राह्मणांपेक्षां परदेशी टक्कर जज्जसाहेबांसारखे परधर्मी युरोपियन खासे म्लेंच्छ, लाख वाट्याने दयाळू म्हणावे का नाही बरे? कारण ज्यांनी आपल्या स्वत:च्या कमाईतून ब्राह्मणांस, शूद्रांपैकी कित्येक अनाथांचे मुलांस तुकड घालून त्यांस इंग्रजी शिकविल्यामुळे हे आतां गोऱ्या कामगारांच्या पायावर पाय देऊन त्यांच्यबरोबर सरकारी हुद्यावर डुरक्या फोडीत आहेत. अहो, याचेच नांव समज ! याचेच नांव दया ! याचेच नाव उपकार ! आणि याचेच नांव उन्नती ! नाही तर आर्य भटब्राह्मणांची कामापुरती एकी आणि काम सरल्यावर तूं तिकडे आणि मी इकडे. कारण “ये गे कोयी तुझी डोयी भाजून खाई आणि माझी डोयी ब्याला ठेवी” या जगप्रसिद्ध म्हणीप्रमाणे भटब्राह्मणांचे अघळपघळ कल्याण होणार आहे. परंतु आर्य विद्वज्जनांस, जर खरोखर या देशांतील सर्व लोकांची एकी करून या देशाची उन्नती करणे आहे, तर प्रथम त्यांनी आपल्या विजयी व पराजितांमधील चालत आलेल्या दुष्ट धर्मास (A Sepoy Revolt by Henry Mead, page 227) जलसमाधी देऊन, त्या जुलमी धर्मानें नीच केलेल्या शूद्रादि अतिशूद्र लोकांसमक्ष उघड रीतीने, आपल्या वेदांत मतासहजातीभेदाचे उरावर थयथया नाचून कोणाशीं भेदभाव न ठेवितां, त्यांच्याशीं कृत्रीम करण्याचे सोडून निर्मळपणे वागू लागल्याशिवाय सर्वाची खरी एकी होऊन या देशाची उन्नती होणे नाहीं. कदाचित आर्यभटांनीं आपल्या वडिलोपार्जित धूर्ताईनें शुद्रांतील शेंपन्नास अर्धकच्च्या विद्वानांस हाती धरून या देशांतील एकंदर सर्व लोकांत कामापुरती एकी करून देशाची क्षणिक उन्नत्ति केल्यास, ती त्यांची उन्नत्ति फार दिवस रहाणार नाही. जसे भट ब्राह्मणांनी, जर शूद्रांतील पोटबाबू यस, फेस करूं लागणाऱ्या चोंबड्या साडेसातीस सामील करून हे हिरव्या बागेंतील बंदछोड आंब्यांच्या कैऱ्या तोडून आढी लावितील, तर पुढे मौल्यवान होणाऱ्या आंब्यासह वाळ्या गवताचा नाश करतील आणि तेणेकरून एकंदर सर्व वाकबगार शेतकऱ्यांस खालीं माना घालाव्या लागतील, हें माझें भाकीत त्यांनी आपल्या देवघरांत गोमुखीत घालून सांभाळून ठेवावें, असे माझें त्यांस निक्षून सांगणे आहे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. ४५
आतां मी गारशा थंडहवाशीर रमणीय सिमला पर्वतावर जाऊन कांहीं विश्रांति घेऊन आपल्या परम दयाळू गव्हरनरसाहेबांसमक्ष आपल्या समुद्राचे पलीकडील सरकारच्या नावानें हाका मारून त्यांस शूद्र शेतकऱ्यांची सुधारणा करण्याविषयी उपाय सुचवितो:- आता आमच्या नीतिमान धार्मिक सरकारनें केवळ द्रव्यलोभ एकीकडे ठेऊन शेतकऱ्यांचे आचरणावर डोळा ठेवण्याकरितां डिटेक्टिव्ह डाक्टरांच्या नेमणुका करून शेतकऱ्यांनी आपल्या गैरशिस्त आचरणावरून प्रकृति बिघडल्यास व चोऱ्या, छिनाल्या वगैरे नीच आचरण केल्यास त्यांस योग्य शिक्षा करण्याविषयी चांगला बंदोबस्त केल्याविना ते नीतिमान होणे नाहीत. शूद्र शेतकऱ्यांनी एकापेक्षां जास्त बायका करू नयेत व यांनी आपल्या मुलीमुलांची लग्ने लहानपणी करू नयेत म्हणून कायदा केल्याविना संतती बळकट होणे नाही. सरकारी गोऱ्या कामगारांस एकंदर सर्व प्रकरणांत गैरमाहिती असल्यामुळे, भटब्राह्मणांच्या संख्याप्रमाणापेक्षां कामगारांच्या जास्ती जेमणुका होऊं लागल्यामुळे, यांच्यावर शेती खपून गावांत चिखलमातीची कामें करून, यांच्या स्त्रियांवर भर बाजारांत हेलपाट्या करून पोटें भरण्याचा प्रसंग गुदरत नाही. शिवाय शेतकरी अज्ञानी असल्यामुळे भटब्राह्मणांस जातीभेदापासून अनंत फायदे होतात.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
यावरून ब्राह्मणांतील सरकारी कामगारासहित पुराणिक, कथाडे, शाळेतील शिक्षक वगैरे ब्राह्मण, जातीभेद मोडू नये म्हणून आपला सर्व धूर्तपणा खर्ची घालून रात्रंदिवस खटपट करीत आहेत. यास्तव शूद्र शेतकऱ्यांचीं मुलें सरकारी हुद्दे चालविण्यालायक होईतोपावेतों ब्राह्मणांस यांच्या जातीच्या संख्येच्या मानापेक्षां सरकारी हुद्याच्या जागा जास्ती देऊं नयेत व बाकी उरलेल्या सरकारी हुद्यांच्या जागा मुसलमान अथवा हिंदू ब्रिटन लोका6स देऊं लागल्याशिवाय ते (ब्राह्मण) शूद्र शेतकऱ्याचे विद्येचे आड येण्याचे सोडणार नाहीत. हें त्यांचे कृत्रिम एकंदर सर्व सरकारी खात्यांनी त्यांचांच भरणा असल्यामुळे, परदेशी गोऱ्या कामगारांच्या नजरेस येण्याचे मार्ग बंद जाहले आहेत. यामुळे, ब्राह्मणांची जात मात्र विद्वान व श्रीमान व शूद्र शेतकरी हे अन्नवस्त्रासही मोताद होऊन कधी कधीं ब्राह्मणांचे अंकित होऊन यांच्या बंडांत सामील होऊन आपल्या जिवास मुकतात. शिवाय भटब्राह्मणांनी आपल्या कृत्रिमी धर्माची शूद्र शेतकऱ्यांवर इतकी छाप बसविली आहे की, ब्राह्मणांच्या सांगण्यावरून त्यांनी केलेले खून अथवा गुन्ह इनसाफ होतेवेळीं ते ब्राह्मणास पुढे न करतां आपल्या माथ्यावर घेऊन त्याबद्दल शिक्षा भोगण्यामध्यें पुण्य मानितात. यामुळे पोलीस व न्यायखात्याचे श्रम वायां जातात. यास्तव शूद्र शेतकऱ्यांचे मुलांस विद्वान करण्याकरितां त्यांच्या जातीतील, स्वतः पाभारी, कोळपी व नांगर हाकून दाखविणारे शिक्षक तयार करून, त्यांच्या शाळेत शेतकऱ्यांनी आपली मुलें पाठविण्याविषयी कायदा करून, प्रथम कांही वर्षे त्यांच्या परीक्षा घेण्याकरितां हलक्या इयत्ता करून त्यांस ब्राह्मणांच्या मुलांसारख्या पदव्या देण्याची लालूच दाखवून त्यांच्या मुलीमुलांचा लग्नांत लग्नविधी करण्याविषयी परजातीने जुलूम करू नये, म्हणून बंदोबस्त केल्याशिवाय शूद्र शेतकऱ्यांत विद्या शिकण्याची गोडी उत्पन्न होणे नाही.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. ४६
व पुढे शूद्र गांवकऱ्यांची मुले, जी मराठी सहावे इयत्तेसह नांगर, पाभर व कोळपी हाकण्याची परीक्षा देऊन सदगुणी निवडतील, त्यांस मात्र पाटिलक्या द्याव्यात, म्हणून आमचे दयाळू सरकारनें कायदा केल्याबरोबर हजारों शेतकरी पाटिलकया मिळविण्याचे चुरशीनें आपली मुलें विद्वान करण्याकरतां मोठ्या आनंदानें शाळेत पाठवितील व असे शिकलेले सदगुणी गांवोगांव पाटील असल्यापासून, एकंदर सर्व खेड्यांपाइयांतील धुर्त भटकुळकण्र्यास अज्ञानी शेतकऱ्यांस आपआपसांत कज्जे करितां येणार नाहीत व तेणेकरून शेतकऱ्यांसह आमचे सरकारचे मोठमोठाले अनिवार फायदे होऊन थोड्याच काळांत हल्लीपेक्षां शूद्र शेतकऱ्यांस जास्ती शेतसारा देण्याची ताकद येऊन निरर्थक येथील पोलीस व न्यायखातीं फुगली आहेत, त्याचे मान सहज कमी करतां येईल. याशिवाय आमचे सरकारनें हिंदुस्थानांत सरकारी कामे करण्यालायक मुळीच भटब्राह्मण नाहींत, असें आपल्या मनांत समजून, जसजसे शूद्र शेतकरी शाळेत विद्वान तयार होत जातील, तसतशा त्यांस मामलेदार वगैरे सरकारी कचेऱ्यांत लहानमोठ्या जागा देऊन, त्यांस तों कामें करावयास शिकविल्याशिवाय शेतकऱ्याचे पाय थारीं लागून सरकारचा वसूल वाढणेच नाही. हल्ली आमच्या सरकारनें गुजरमारवाइयांच्या देवघेवीच्या दगलबाज्यांवर डोळा ठेविला आहे, त्यापेक्षां त्यांच्या दुकानांतील कुजक्या जिनसा व खोट्या मापांसह दारूबाज पाटलावर चांगली नजर ठेविली पाहिजे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
असो. आतां आपल्या सरकारास अक्षरशुन्य अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांचे निकस झालेल्या शेतांची सुधारणा करण्याविषयी उपाय सुचवितों ते - आमच्या दयाळू सरकारनें एकंदर सर्व शेतकऱ्यांस युरोपियन शेतकऱ्यांसारखे विद्याज्ञान देऊन, त्यांस त्यांसारखीं यंत्रद्वारें शेती कामें करण्यापुरती समज येईतोंपावेतों एकंदर सर्व गोऱ्या लोकांसह मुसलमान वगैरे लोकांनी हिंदुस्थानांतील तूर्त गायाबैलांसह त्यांचीं वासरें कापून खाण्याचे ऎवजी, त्यांनी येथील शेळ्याबकरीं मारून खावीतः अथवा परमुलखांतील गायाबैल वगैरे खरेदी करून येथे आणून मारून खावे, म्हणून कायदा करून अमलांत आणल्याशिवाय, येथील शूद्र शेतकऱ्यांजवळ बैलांचा पुरवठा हाऊन त्यांना आपल्या शेतांची मशागत भरपूर करतां येणार नाही व त्यांजवळ शणखताचा पुरवठा हाऊन त्यांचा व सरकारचा फायदा होणे नाहीं. एकंदर डोंगरपर्वतावरील गवतझाडाच्या पान फुलांचे व मेलेल्या कीटक २वापदांचे, मांसहाडांचे कुजलेले सत्य, वळवाच्या पावसानें धुपून पाण्याच्या पुराबरोबर वाहून ओढ्याखोड्यांत वायां जाऊं नये, म्हणून आमच्या उद्योगी सरकारनें सोयीसोयीनें काळ्यागोऱ्या लष्करासह पोलीसखात्यांतील फालतु शिपायांकडून जागोजाग तालीवजा बंधारे अशा रितीनें बांधावे की, वळवाचे पाणी एकंदर शेतांतून मुरून नंतर नदीनाल्यास मिळावें, असे केल्यानें शेतें फार सुपीक होऊन एकंटर सर्व लष्करी शिपायांस हवाशीर जाग्यांत उद्योग करण्याची संवय लागल्याबरोबर त्यांस रोगराईची बाधा न होतां बळकट होतील. त्यांनी दररोज एक आणा किंमतीचे जरी इमानेंइतबारें काम केले, तरी सालदरसाल पंचवीस लक्षांचे वर सरकारच्या स्थावरमत्तेंत भर पडणार आहे. कारण हल्लीं आमचे खबरदार सरकारजवळ पोलीसखात्यासह पलटणी शिपाई सुमारें दोन लक्ष आहेत. त्याचप्रमाणे आमच्या दयाळू सरकारनें एकंदर सर्व डोंगरटेकइयांमधील दयाखोज्यांनीं तलावतळीं, जितकी होतील तितकी सोयीसोयीनें असल्यामुळे जागोजाग लहानमोठी धरणे चालून एकंदर सर्व विहिरींस पाण्याचा पुरवठा होऊन, त्यांजपासून सर्व ठिकाणी बागाइती होऊन शेतकऱ्यांसहित सरकारचा फायदा होणार आहे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
एकंदर सर्व शेतें धूपून त्यामध्यें खोंगळ्या पडू नयेत, म्हणून सरकारनें शेतकऱ्यांपासून पाणलोटाच्या बाजूनें शेतांच्या बांधांनी वरचेवर ताली दुरुस्त ठेवाव्यात. आमचे दयाळू सरकारनें आपल्या राज्यांतील एकंदर सर्व शेतांच्या पहाण्या, पाणाइयांकडून करवून, ज्या ज्या ठिकाणीं दोनग्या मोटांचे वर पाण्याचे झरे सांपडतील, असा अदमास निघेल, त्या सर्व जाग्यांच्या खुणा त्या त्या गांवच्या नकाशांनी नमूद करून केवळ सरकारच्या मदतीशिवाय पाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या पाणड्यासह विहिरी खोदून, बांधून काढणाऱ्या शूद्र शेतकऱ्यांस लहानमोठीं बक्षिसे सरकारांतून देण्याची वहिवाट घालावी व एकंदर सर्व नदीनाले व तलावांतील सांचलेला गाळ पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांस फुकट नेऊं द्यावा व ज्या ज्या गावची गावरानें आमचे सरकारनें आपल्या "फॉरेस्टांत" सामील केलीं असतील, तीं सर्व त्या त्या गांवास परत करून फक्त सरकारी हद्दीतील सरपण व शेतास राब खेरीज करून, विकण्याकरितां इमारती लांकडें मात्र तोडू न देण्याविषयीं सक्त कायदा करून, जुलमी फारेस्टखात्याची होळी करावी. खुद्द आमच खास सरकारनें परिश्रम करून आपल्या खजिन्यांतून थोडेसे पैसे खर्ची घालून, इतर देशांतील नानाप्रकारच्या उत्तम उत्तम शेळ्यामेंढरांची बेणीं खरेदी करून या देशांत आणून त्यांची येथे अवलाद उत्पन्न केल्याबरोबर येथील एकंदर सर्व शेतांस त्यांच्या लेंड्यामुतापासून झालेल्या खतांचा महामूर पुरवठा होऊन शेतें सुपीक होतील व त्यांच्या लोकरीपासून शूद्र शेतकऱ्यांस फायदा होईल.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. ४७
आमच्या सरकारी जंगलांतील रानटी जनावरांपासून शूद्र शेतकऱ्यांच्या शेतांचा बच्याव करण्यापुरत्या गांवठी तोइयाच्या कां होईनात, जुन्या डामीस बंदुक शूद्र शेतकऱ्यांजवळ ठेऊं देण्याची जर आमचे सरकारची छाती होत नाही, तर सरकारनें तें काम आपल्या निर्मळ काळ्या पोलीस खात्याकडे सोपवून, त्या उपर शेतकऱ्यांच्या शेतांचे रानडुकरें वगैरे जनावरांनी खाऊन नुकसान केल्यास ते सर्व नुकसान पोलीसखात्याकडील वरिष्ठ अंमलदरांच्या पगारांतून कापून अथवा सरकारी खजिन्यांतून शेतकऱ्यांस भरून देण्याविषयी कायदा केल्याशिवाय, शेतकऱ्यांस रात्रीं पोटभर झोंपा मिळून त्यांस दिवसा आपल्या शेती भरपूर उद्योग करण्याची सवड होणे नाही. यांचेच नांव “मला होईना आणि तुझें साहिना !” आमचे दयाळू सरकारचे मनांतून जर खरोखर अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांचे बरें करून आपली पैदास वाढविणे आहे, तर त्यांनीं सालदरसाल श्रावणमासीं प्रदर्शनें करून आश्विनमासीं शेतपिकांच्या व औतें हाकण्याच्या परीक्षा घेऊन उत्तम शेतकऱ्यांस बक्षिसें देण्याची वहिवाट घालून; दर तीन वर्षाच्या अंदाजावरून उत्तम उत्तम शेतकऱ्यांस पदव्या द्याव्यात व शेतकऱ्यांच्या विद्वान मुलांनी एकंदर सर्व आपली शेते उत्तम प्रकारची वजवून, त्यांनी थोडथोड्या लोहारी, सुतारी कामात परीक्षा दिल्यास, त्यांस सरकारी खर्चानें विलायतेंतील शेतकीच्या शाळा पाहण्याकरितां पाठवीत गेल्यानें इकडील शेतकरी ताबडतोब आपल्या शेतकीची सुधारणा करून सुखी होतील.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
आमचे नीतिमान सरकारनें जोगतिणी, आराधिणी, मुरळ्या, कोल्हाटिणी व कसबिणींवर बारीक नजर ठेऊन, त्यांच्याकरितां तालुकानीहाय लॉक इस्पितळे ठेऊन, मुरळ्या, कोल्हाटिणी, कसबिणी, तमासागीर, नाटककार, कथाडे वगैरे लोकांनीं कुनीतिपर गाणी गाऊं नयेत, म्हणून त्यांजवर सक्त देखरेख ठेवून त्यांजला वरचेवर शिक्षा केल्यावाचून अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांच्या नीतीसह शरीरप्रकृत्यांमध्यें पालट होणे नाही. एकंदर सर्व इलाख्यांतील लष्करी व पोलीसखात्यांनी शूद्रादि अतिशूद्र शेतकऱ्यांचा मोठा भरणा असून ते इजिष्ट व “काबुलांतील" हिरवट लोकांबरोबर सामना करितांना गोऱ्या शिपायांच्या पायांवर पाय देऊन मोठ्या शौर्यानें टकरा देऊं लागतात. एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्र शेतकरी आपल्या मुलांमाणसांसह रात्रंदिवस ऊर पिकेतों शेती कष्ट करून, सरकारास कर, पट्ट्या, फंड वगैरे जकातीद्वारें सालदरसाल कोट्यावधि रुपयांचा भरणा करीत आहेत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
तथापि शूद्र शेतकऱ्यांच्या मुलांस शेतकीसंबंधी ग्रंथ अथवा नेटिव्ह वर्तमानपत्रांतील शेतकीसंबंधीं सूचनासुद्धां वाचविण्यापुरतें ज्ञान आमच्या धर्मशील सरकारच्यानें देववत नाहीं. व शेतकऱ्यापैकीं लक्षाधिश कुटुंबास वेळच्या वेळी पोटभर भाकर व आंगभर वस्त्र मिळण्याची मारामार पडली असून, त्यांच्या सुखसंरक्षणाच्या निमित्यानें मात्र आमचे न्यायाशील सरकार लष्करी, पोलीस, न्याय, जमाबंदी वगैरे खात्यांनीं चाकरीस ठेविलेल्या कामगारांस मोठमोठाले जाडे पगार व पेनशनी देऊन अतोनात द्रव्य उधळतें, याला म्हणावें तरी काय !! कित्येक आमचे सरकारचे नाकाचे बाल, काळे गोरे सरकारी कामगारांनीं, हजारों रुपये दरमहा पगार खाऊन तीसपस्तीस वर्षे सरकारी हुद्दे चालविले की, त्यांस आमचे सरकार दरमहाचे दरमहा शेंकडों रुपये पेनशनें देतें. बहुतेक काळे वगैरे सरकारी कामगार, सरकारी कचेऱ्यांनी कामें करण्यापुरत अशक्त, आंधळे बनून खंगल्याची सोंगें आणून भल्या भल्या युरोपियन डाक्टर लोकांच्या डोळ्यात माती टाकून पेन्शनी उपटून, गोरे पेन्शनर विलायतेस पोबारा करितात व काळे पेनशनरांपैकी कित्येक, जसे काय आतांच येशू ख्रिस्त योगी महाराजांनी मेलेल्यामधून उठविल्यासारखे तरूण पट्टे बनून, मिशांवर कलपाची काळी जिल्हई देऊन म्युनिसिपल व व्यापान्यांच्या कचेऱ्यांनी मोठमोठ्या पगारांच्या चाकन्या पतकरून हजारों रुपयांच्या कमाया करून आपल्या तुंबड्या भरीत आहेत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
आमचे खबरदार सरकारनें एकंदर सर्व सरकारी खात्यांतील काळे गोरे शिपायांसहित लष्करी डोलीवाले, बांधकामाकडील लोहार, सुतार, बिगारी वगैरे हलके पगारी चाकरांच्या पगारांत काडीमात्र फेरफार न करितां बाकी सर्व मोठमोठ्या काळ्या व गोऱ्या कामगारांचे वाजवीपेक्षां जास्ती केलेले पगार व पेन्शनी देण्याचे हळूहळू कमी करावें. सदरी लिहिलेल्या गोष्टीचा विचार केल्याविना आमचे सरकारचे राज्याचा पया या देशांत मुस्तकीम होऊन, अक्षरशून्य शेतकऱ्यांच्या कपाळच्या लंगोट्या जाऊन त्यांचे हल्लीचे उपास काढण्याचे दिवस कधीच जाणे नाहींत. सारांश एकंदर सर्व आसूडाच्या प्रकरणांत शूद्रांपैकी बडे बडे राजेरजवाडे व लहान-सहान अज्ञानी संस्थानिकांच्या व अतिशूद्रांच्या लाजीरवाण्या स्थितीविषयी बिलकुल वर्णन केले नाही. याचे कारण, पहिले आपल्या पाकळ वैभवामुळे व दुसरे आपल्या ਫੁੱਕਸੁਣੋ शूद्र शेतकऱ्यांपासून ते दुरावले आहेत. याकरिता फक्त येथे मध्यम व कनिष्ठ प्रतीच्या शूद्र शेतकऱ्यांच्या दैनवाण्या स्थितीविषयी ठोकळ ठोकळ मुद्यांचे ओबडधोबड वर्णन करून येथील गव्हरनरसाहेबांचे रहाते शहरांत व गव्हरनर जनरलसाहेबांचे अमलांत, आमचे समुद्राच पलीकडील खासे विलायती सरकारास कळविलें आहे. याउपर आमचे सरकारांस ब्राह्मणांच्या मुलांनी शेवटचे पाणी पाजून मुक्त करावें, अशी जर त्यांची इच्छाच असेल, तर त्यांनी शूद्र शेतकऱ्यांची हाडें पिळून गोळा करीत आलेल्या रायलफंडातून सालदरसाल मोठमोठ्या रकमा खर्ची घालून ब्राह्मणांचे मुलांस विद्वान करण्याची वहिवाट कायम ठेवावी. त्याविरुद्ध (A Sepoy Revolt by Henry Mead, pages 69 and 235.) तूर्त माझें कांही म्हणणे नाही. परंतु त्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या मुलांस विद्या देण्याची थाप देऊन वसूल करीत आलेला एकंदर सर्व लोकल फंड तेवढा तरी निदान शेतकऱ्यांच्या मुलांस (Pages 301, 308, 313.) मात्र इमानेइतबारें विद्या देण्याचे कामी खर्ची घालूं लागल्यास मी इतके दिवस श्रम केल्याचे फळ मिळाले, असे समजून मोठा आनंद मानीन. परंतु त्यांनी तसें जर नाहीं केलें, तर ते देवाजीजवळ जबाबदार होतील.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. ४८
आतां प्रथम मी लहान असतांना, माझे आसपासचे शेजारी मुसलमान खेळगडी यांच्या संगतीनें मतलबी हिंदुधर्माविषयी व त्यांतील जातिभेद वगैरे कित्येक खोट्या मतांविषयी माझ्या मनांत खरे विचार येऊं लागले, त्याबद्दल त्यांचे उपकार स्मरतों. नंतर पुण्यांतील स्कॉच मिशनचे व सरकारी इन्स्टीट्यूशनचे-ज्यांच्या योगानें मला थोडेबहुत ज्ञान प्राप्त होऊन मनुष्यमात्राचे अधिकार कोणते हे समजलें व ज्या ज्या युरोपियन धार्मिक गृहस्थांनी त्यांस द्रव्यद्वारें मदत केली असेल, त्यांचे व तसेच ज्या इंग्रज सरकारच्या स्वतंत्र राज्यपद्धतीमुळे हे विचार मला निर्भयपणे बाहेर काढितां आले, त्या सरकारचे आभार मानून व या सर्वांच्या आपल्या पुत्रपौत्रांसह बढती होण्याविषयी आपल्या दयाळू सृष्टीचालक शक्तीची प्रार्थना करून, ती या माझ्या अज्ञानी, अभागी शूद्र शेतकऱ्यांचे डोळे उघडून शुद्धीवर येण्याविषयी त्यांच्या मनांत प्रेरणा करील, अशा उमेदीनें धीर धरून, तूर्त या माझ्या आसुडाचा फटका लागल्यामुळे पाठीमार्गे वळून कोण कोण पहातो, हें बघत स्वस्थ बसतों.
तारीख १८
बुधवार
माहे जुलई
सन ई. १८८३
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.