Sunday, 6 August 2017

प्रकरण ४ थे : (भाग २ )

शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३२ 

असो. हल्लीं शेतकऱ्यांची निहारी, शिळ्या तुकड्यांवर लाल चटणीचा गोळा, दुपारीं ताज्या भाकरीबरोबर आमटी अथवा सांडळयाचे खळगुटः रात्रीं निवळ वरणाचे पाण्यांत जोंधळ्याच्या अथवा मक्याच्या कण्या, मध्यें कधीं गाजरें अथवा रताळी पिकल्यास त्यांच्या वरूवर गुजारा करावा लागता, तरी त्यांस नेहमीं वेळच्या वेळीं पोटभर भाकरी मिळावयाच्या नाहीत. यास्तव मध्येंच एखादे वेळी भुक लागल्याबराबर औत उझे करून हिरव्यासरव्या आंब्याच्या कैया, भोंकरें, उंबरें, गाभुळल्या चिचा वगैरे शेताच्या आसपास जो कांहीं खाण्याचा पदार्थ हाती लागेल, तो खाऊन त्यावर ढसढसा पाणी पिऊन पुन्हा आपले औत हाकावयास जातो, व ज्या ज्या वेळीं पोटभर भाकरी मिळतात, त्या त्या वेळीं तो त्या आधाशासारख्या खातां खातां मध्यें कधीं पाणी पीत नाही, यामुळे त्यास सर्व दिवसभर किरमिट ढेकर वगैरे येऊन मोडशी विकारानें त्यास नानाप्रकारचे रोग होतात व त्यांचे शमनार्थ दमडीचा ओवा अथवा सुंठसाखर मिळण्याची भ्रांती ! यामुळे हिंवतापाच्या आजारानें अखेरीस यमसदनास जावें लागतें. सणावारास कित्येककांचे घरी उत्तम पक्वान्न म्हटलें म्हणजे गुळवण्याबराबर पुरणाच्या पाळ्या, तोंडीं लावण्याकरितां तेलांत तळलेल्या कुरड्या, पापड्या व फुरफुरीं व शेवटीं आमटीबरोबर भात. बहुतेकांच घरी डाळरोट्या व तोंडीं लावण्याकरिता सांडत्वयांचे कोरड्यास. बाकी उरलेल्या कंगाल शेतकऱ्यांस गुजरमारवाड्यांनी उधार सामुग्र्या न दिल्यास ते नाचणी अथवा ज्वारीच्या भाकरीवर कशी तरी वेळ मारून नेतात यास्तव बहुतक शेतकऱ्यांस कर्ज काढल्याशिवाय पट्टी वारण्याची सवडच होत नाही व अशा लाचार शेतकऱ्यांनी आपल्या मुलीबद्दल निदान पांचपंचवीस रुपये घेतल्याशिवाय त्यांस त्यांचीं लग्नें करून देतां येत नाहीत. त्यांतून अट्टल कर्जबाजारी शेतकऱ्यास ब्राह्मण अथवा मारवाडी सावकारांनी त्यांचे मुलांच्या लग्नाकरितां कर्ज न दिल्यास, कित्येक मुलें भर जवानींत आल्याबरोबर त्यापैकीं कित्येक तरूण निराळ्या मार्गानें मदागिन शांत करू लागल्यामुळे त्यांस क्षयाच्या बाधा होऊन वायां जातात. त्याविषयीं नामांकित डाक्तर विद्वानांच्या पुराव्यासहित मी पुढे एखादे वेळी आसुडाच्या पुरवणीदाखल शेतकऱ्यांचे थापटणे या नांवाचा एक स्वतंत्र निबंध करून आपल्यापुढे सादर करीन.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya

कित्येक तरूण नि:संग होऊन चोरीछापीने काडीमाहालांतील खाटल्यावर जाऊन खटपटी करू लागल्यामुळे थोड्याच दिवसांत ते कैलासवासी होतात व बाकी उरलेली, चोर, बंडखोरांचे नार्दी लागून आपल्या जिवास मुकतात (भूदव वासुदेव फडक्याच्या नादी लागून बहुतक अज्ञानी, शूद्र, रामोसी काळ्या पाण्यास व कित्येक तर फाशीं गेले.), व ज्यास नवरीच्या बापास देण्यापुरतें कर्ज मिळून उभे केलेल्या लग्नांत शेतकऱ्याजवळ पुरते पैसे नसल्यामुळे एकंदर सर्व माळी, कुणबी व धनगरांपैकी तरूण दिवसां शेतकामें करून सर्व रात्रभर जात्यावर बसून एकमेकांच्या मांड्यांशीं मांड्या भिडवून हिजड्यासारखी बायकांचीं गाणीं (बामनाच्या मुला, कोठे जातोशी जोडाया ! हाती दवूत लेखणी, फिरशी कुणबी नाडाया !) गाऊन गहूं, ज्वारी दळून बाकी सर्व लहानमोठों कामें करूं लागतात. त्याचप्रमाणे गांवांतील तरूण स्त्रिया वरमाईस बरोबर घेऊन कांटे चिरून, हळकुंडें फोडून भाजल्या बाजरीचा वेरुवार, हळद, चिकसा, दळून काढितात. यामुळे सदरच्या पदार्थाची घाण, रात्रंदिवस काम करणाऱ्या वरमाईच्या हिरव्या रंगाच्या, पातळाच्या घाणीमध्यें मिसळून तिच्या सर्व अंगाची इतकी उबट दुर्गधी चालते की तिजपासून जवळच्या मनुष्यास फार त्रास होतो. त्याच्या घरापुढे अंगणांत लहानसा लग्नमंडप शेवरीच्या मेढी रोवून त्यांजवर आडव्या तिडव्या फॉकाठ्यावर आंब्याचे टहाळे टाकून नांवाला मात्र सावली केली असते. ढोलकी अथवा डफड्याचे महारमांगाचे बदसूर वाजंत्र्याची काय ती मौज ! नवण्या मुलास गडंगनेर म्हटलें, म्हणजे पितळीमध्यें अर्ध पावशेराच्या भातावर थोडासा गूळ व नखभर तूप घातलें की, नवन्या मुलीमुलांबरोबर फिरणारी मुलें लांडग्यासारखी घांसामागें घांसाचे लचके मारून एक मिनिटांत पितळी चाटून पुसून मोकळी करितात.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३३ 

लग्नांतील भोजनसमारंभ रस्त्यावर हमेशा बसावयाकरितां पडदा अंथरल्याशिवाय पंगत पडावयाची. देवकार्याचे दिवशीं सर्वानों आपआपल्या घरून पितळ्या घेऊन आल्यानंतर त्यांमध्ये ज्वारीच्या भाकरी, कण्या अथवा बाजरीच्या घुगच्याबरोबर सागुतीचे बरबट, ज्यामध्यें दर एकाच्या पितळीत एकदां चार अथवा पांच आंतडींबरगड्याचे रवे पडले म्हणजे जेवणारांचे भाग्य. कारण एकंदर सर्व बकन्याची मागची पुढचीं टिंगरें दोनदोन तीनतीन दिवस पुढे घरांतील वन्हाडांसहित मुलांबाळांस तयार करून घालण्याकरितां घरांत एका बाजूला टांगून ठेवितात. गांवजेवणांत वाळल्याचिळ्या इस्तान्यांवर थोड्याशा भातांत उभे केलेल्या द्रोणांतील गुळवण्यांत, तेलांत तळलेल्या तेलच्या कुसकरून खातां खातां, गाजरें अथवा बटाट्याची भाजी तोंडीं लावून अखेरीस हुदाइयाबरोबर शवटचा 8भात खाऊन वरतीं तांब्याभर पाणी पिऊन डरदिवशीं ढेकर दिले की, शेतकऱ्याचे जेवण संपले. त्या सर्व जेवणामध्यें हजार मनुष्यांमार्गे दमडीचेसुद्धां तूप मिळावयाचे नाही. अशा थाटाची शेतकऱ्यांत लग्ने होत असून येथील एकंदर सर्व गैरमाहित शहाणे ब्राह्मणांतील विद्वान, आपल्या सभांनी लटक्यामुटक्या कंड्या उठवून कारभारीस सुचवितात कीं, शेतकरी आपले मुलाबाळांचे लग्नांत निरर्थक पैसा खर्च करितात, यामुळे ते कर्जबाजारी झाले आहेत. अहाहा ! हे सार्वजनिक (A Sepoy Revolt by Henry Mead, pages 234, 270 and 271.) पोकळ नावाच्या समाजांत, एकतरी मांगमाहार शेतकऱ्यास त्या समाजाचा सभासद करून त्यास आपल्या शेजारी कधीतरी घेऊन बसले होते काय? अथवा यांच्यांतील गांवोगांव वेदावर पांडित्य करणाऱ्या गृहस्थांपैकी एखाद्या स्वामीनें तरी उघड जातीभेदाच्या उरावर पाय देऊन शूद्राच्या पंक्तीस बसून तेथील एखादा बरबटाचा फुरका मारून शेतकरी खर्चीक म्हणून म्हणावयाचे होतें.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


हे नाटकांतील फासांत लाडकीचे सोंग घेऊन तंबुरीचे खुंटे करून शेतकऱ्याचीं जात्यावरील गाणीं गाऊन मजा करून सोडितात; परंतु यांला आपले मुलाबाळांचे लग्नांत पल्लोगणती बाजरी गहूं दळतांना कोणी पाहिले असल्यास त्यानें येथे उभे राहून सर्वास कळविल्यास मी त्यांचा आभार मानीन. हे कधीं तरी शेतकीचीं कामें स्वतः हातांनी करितात काय? त्यांना शेतकीचा इंगा माहित आहे काय? असो, परंतु शेतकरणीसारख्या यांच्या घरांतील स्त्रिया आपल्या घरांतील शेणशेणकूर करून शेती नवल्याबरोबर पाभारीमागें तुरी वगैरे मोघून शेती खुरपण्याकाढण्या वगैरे करूं लागून खळ्यावर कणसें मोडून तिवड्याभोवती गंज करून मळणी होतांच टाणे उपणतांना वावड्यावर पुरुषास उपणपाट्या उरापोटावर उचलून देऊन, डोईवर राखराखुडा, शेण, सोनखतांचे पाट्यांची व काइयागवत वगैरे भुसकटांची ओझीं वाहून, उन्हाळ्यात शेती काम कमी असल्यामुळे सडकेवर खडी फोडून दिवसभर मोलमजुरी करून, आपल्या भटभिक्षुक पतीस अशा तन्हेच्या मदती करीत नसून दररोज सकाळी निजून उठल्याबरोबर वेणीफणी करून, घरांतील सडासारवण, स्वयंपाक व धुणेधाणे आटोपून सर्व दिवसभर पोथ्यापुराणे ऎकत बसून लग्नसमयीं जात्याच्या खुट्याला हात न लावितां अंगावर शालजोड्या घेवून पुढे शेतकऱ्यांच्या बायकापोरीच्या डोक्यावर रुखवतांच्या शिपतरांची धिंड काढून शूद्रांनी हाती धरलेल्या अबदागिरीखाली मशालीचे उजेडांत, पायांत जोडे घालून शृंगाराच्या डौलांत मोठ्या झोंकानें मिरविणाऱ्या असून, या कुभांड्यासारखे शेतकरी आपल्या मुलाबाळांच्या लग्नमंडपांत विजेची रोषणाई करून आपल्या जातबांधवांस मोठमोठाल्या रकामांची उधळपट्टी करून तूपपोळ्या व लाडूजिलब्यांचीं प्रयोजनें घालून फक्त भटब्राह्मणांच्या सभा भरवून त्यांस शेकडों रुपये दक्षिणा वाटून आपल्या घराण्यांतील गरती सुनाबाळांची परवां न करितां त्यांच्यासमोर निर्लज्ज होऊन गांवांतील वेसवाकसबिणींच्या नाचबैठकांत बसून त्यांची वेडीविट्रीं गाणी ऐकल्यानंतर त्यांस मन मानेल तशा बिदाग्या देत नाहीत. सणावारांस कां होईना, शेतकरी आपल्या आल्या जन्मांतून एकदां तरी आपल्या खोपटांत घीवर, चुरमा, जिलब्या, बासुंदी, श्रीखंड 3]थवा बुंदीचे लाडू कुटुंबातील मुलांबाळांस घालण्यापुरतें, त्यांजवळ यांनीं व गोऱ्या कामगारांनी, कांहीं तरी त्राण ठेविलें आहे काय? या वाचाळांच्या तोंडाला कोणी हात लावावा? अहो, यांच्या धूर्त पूर्वजांनी मनू वगैरे धर्मशास्त्रांतील घाणेरड्या ग्रंथांत जातिभेदाचे थोतांड उभे करून, उलटें शेतकऱ्यांनी इंग्रज लोकांस जर नीच मानणाऱ्या प्यादेमातीचा डाव मांडून ठेविला नसता, तर आज सर्वाचेसमोर एक अपूर्व चमत्कार करून दाखविला असता.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३४ 

तो असा की, गव्हरनरसाहेबांच्या स्त्रिया मखमलीच्या फुलासारख्या नाजूक असल्यामुळे त्यांस तर या कामी तसदी न देतां, दहापांच युरोपियन कलेक्टरसाहेबांच्या मडमांस त्यांच्या मुलाबाळांसहित जर शेतकऱ्यांचे लग्नात आमंत्रणे करून आणिल्या असत्या व त्यांस शेतकऱ्यांचे स्त्रियांबरोबर लगनांतील सर्व कामें आटोपावयास लाऊन मुख्य वऱ्हाडणी केल्या असत्या, तर त्यांनी येथील दुर्गंधी, खाण्यापिण्याचा थाट, अंथरुणाचा बोभाट व बाज्या भराड-गोंधळाचा किलकिलाट वगैरे अव्यवस्था पाहून दुसरे दिवशीं सकाळीच तेथून आपलीं (A Sepoy Revolt by Henry Mead, page44.) मुलेलेंकरें जागचे जागीं टाकून पळून गेल्या नसत्या, तर या धूर्तानी माझें नांव बदलून ठेवावें, अशी मी भर सभेत चक्रीदार पागोटी घालून हातांत वळूच्या पिवळ्या काठ्या घऊन फिरणाऱ्या अजागळ शूद्र चोंबड्या चTपदारासमार मिशांवर ताव देऊन छातीला हात लाऊन प्रतिज्ञा करितों. या उभयतां काळ्या व गोऱ्या कामगारांनी रात्रंदिवस मौजा मारण्याकरितां विलायत सरकारची नजर चुकावून अज्ञानी शेतकऱ्यांवर नानाप्रकारच्या भलत्यासलत्या बाबी बसवून त्यास इतका नागवा उघडाबंब केला आहे की, त्याला एजंट व गव्हरनरसाहेबांस आपल्या दरबारांत पानविड्याकरितां आमंत्रण करून बोलावण्याची शरम वाटते.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


अरे, ज्यांचे श्रमांवर (A Sepoy Revolt by Henry Mead, page 198.) सरकारी फौजफाटा, दारूगोळा, गोऱ्या कामगारांचा वाजवीपेक्षां जास्ती ऐषआराम व काळ्या कामगारांचे वाजवीपेक्षां जास्ती पगार, पेनशनी व सॉवळेचाव असून, त्यांस चारचौघांत पानविड्यापुरता मान मिळू नये काय? अहो, जो सर्व देशांतील लोकांचे सुखाचा पाया, त्याचे असे बुरे हाल ! ज्यास वेळचे वेळीं पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळत नसून, ज्याचे उरावर सरकारी पट्टी देण्याची कटार लोंबत आहे, ज्याच्या हालास साहेब लोकांचा शिकारी कुत्रासुद्धां हुंगून पाहीना, याला महाणावें तरी काय? ज्यास मुळीच आपल्या लीपींतील मूळाक्षरसुद्धां वाचतां येत नाहीं, त्यानें शेतकीसंबंधी अन्य भाषेतील ग्रंथ वाचून शेतसुधारणा तरी कशी करावी? ज्यास नेहमी फाके(A Sepoy Revolt by Henry Mead, pages 334 and 358.) चालले आहेत, त्यानें आपलीं मुलें परगांवीं मोठमोठ्या शहरांतील ऍग्रिकलचर शाळेत शिकण्याकरितां कशाच्या अथवा कोणाऱ्या आधारावर पाठवावीं?
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३५ 

आतां आपण शेतकऱ्यांचे हल्लीचे शेतस्थितीकडे वळू. आमचे महादयाळू इंग्रजी सरंकारचा अम्मल या सोवळ्या देशांत झाल्यादिवसापासून त्यांनी येथील धष्टपुष्ट गाया कोवळ्याकाच्या वासरासहित वाहतुकीचे खांदकरी बैलास यज्ञविधी केल्याशिवाय मारून, मुसलमान, मांग, महार वगैरे आचार्यास बरोबर घेऊन खाऊं लागल्यावरून, शेतकऱ्याजवळ कष्टाच्या उपयोगी पडण्याजोग्या मजबूत बैलांचे बेणे कमी कमी होत गेलें. तशांत पर्जन्याची अनावृष्टि झाल्यावरून पडलेल्या दुष्काळांत चारापाण्यावांचून लक्षावधि बैलांचा सरसकटीनें खप होऊन त्यांचे वाटोळे झालें. दुसरें असें की, शेकन्याजवळ उरलेल्या खल्लड बैलास फारेस्टखात्याच्या अनिवार त्रासामुळे व गायराजांच्या कमताईमुळे पोटभर चारावैरण मिळेनाशी होऊन त्यांची (जनावरांची) संतति दिवसेंदिवस अतिक्षीण होत चालल्यावरून त्यांच्यांत हमेशा लाळीच्या सांथी येऊन, त्या रोगानें दरवर्षी शेतकऱ्यांचे हजारों बैल मरूं लागल्यानें कित्येक शेतकऱ्यांचे गोठ्यांतील दावणीचे खुटे उपटले. पुढे शेतकऱ्यांजवळ पहिल्यासारखीं मनमुराद जनावरें शिल्लक नसल्यामुळे त्यांच्या बागायतीची वेळच्या वेळी उस्तवारी होऊन त्यांस पोटभर खतपाणी मिळेनासे झाल्याबरोबर बागायती जमिनीतील फूल कमी झाल्यामुळे हल्ली बागाईतांत पूर्वीप्रमाणे पीक होत नाही.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


शिवाय आमच्या सरकारनें धूर्त ब्राह्मण कामगारांस हाती धरून त्यांच्या मदतीनें दर तीस वर्षांनी अज्ञानी भेकड शेतकऱ्यांच्या शेतीचा पैमाष करून त्यांजवर मन मानेल तसे शेतसारे वाढवू लागल्यानें शेतकऱ्यांची हिम्मत खचून त्यांच्यार्ने त्यांच्या शेताची मशागत होईना, यास्तव कोट्यावधि शेतकऱ्यांस पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळेनासें झाले. यावरून शेतकरी जसेजसे शक्तिहीन होऊ लागले, तसतशा त्यांच्यांत महामारीच्या आजाराच्या सांथी येऊं लागल्यामुळे दरवर्षी हजारों शेतकरी मरूं लागले. तशांत दुष्काळाच्या अमलांत अन्नावांचून लक्षावधि शेतकऱ्यांचा खप होऊन यमपुरीस गेले व कित्येकांच्या दाराला जरी काठ्या लागल्या, तरी एकंदरीनें त्यांची पहिल्यापेक्षां खानेसुमारी जास्त वाढल्यामुळे, त्या मानानें पुनः पुन्हा त्याच शेतांच्या लागवडी होऊन जमिनीस विसांवा बिलकुल मिळेनासा झाला, यावरून जिराईत शेते पिकामागे पिके देऊन देऊन थकली, शिवाय दरवर्षी हजारों खंडी धान्य, कापूस, कातडीं व लॉकर परमुलखीं जात असून मुंबईसारख्या बकाली म्युनिसीपालटीतील गोऱ्या इंजिनीयर व डाक्टर कामगारांच्या गैरमाहितीमुळे, अथवा त्यांच्या आडदांड्पणाच्या शैलीमुळे लक्षावधी खंडी खतांचे सत्व समुद्रांत वाया दवडल्याने शेतांतील सत्व नाहींसे होऊन आतां एकंदर सर्व शेतें पडकळीस आली आहेत. अहो, हे विलायती गोरे इंजिनीयर गोऱ्या डाक्टरांचे मिलाफानें, आपल्या देशांतील कारागीर लोकांच्या सामानसुमानांचा येथे खप व्हावा, या इराद्यानें आपल्या पाटावर इंगळ ओढण्याकरितां अशा नानातन्हच्या युक्त्या (स्किमा) आमलांत आणून बेसमज रयतेचे बेलगामी द्रव्य उधळून, येथील कित्येक हाताखालच्या काळ्या कामगारांकडून त्या त्या इमारतीस आपली नावे देऊन मोकळे होतात. नंतर त्या इमारतीसहित रयतेचे उदयां कां वाटोळे होईना. त्यांच्या तुंबड्या भरून लौकिक झाला, म्हणजे गंगेस घोडे नहाले.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३६ 

त्यांतून एखादे वर्षी पाऊस न पडल्यामुळे ਸ੍ਵੱਧ शेतांनी पिकें होत नाहीत. कधी कधी बैल पुरते नसल्यामुळे कित्येकांच्या पेरणीचा वाफ बरोबर न साधतां पिकास धक्का बसतो. कधी कधीं बीं विकत घण्यापुरत पैसे सावकारांनीं वेळेस न दिल्यामुळे, अथवा मागाहून उधार आणलेले जुनें बीं पेरल्यामुळे कित्येकांचे पिकास धक्का बसतो. अशा नानाप्रकारच्या सुलतानी व अस्मानी अरिष्टांमुळे शेतांनी पीक न झाल्यास, शेतकऱ्यांपैकी एकटादुकटा शेतकरी, ब्राह्मण सरकारी कामगारांचे घरी एकांती त्यास पिकापाण्याची सविस्तर हकीकत कळविण्याकरिता गेला की, कोणी कामगार नुकताच स्नान करून अंगावर अस्म फासून पुढे पाटावर शालिग्राम मांडून अगरबत्तीच्या सुवासांत लपट होऊन त्याची पूजा करीत बसला आहे व कोणी भलती एखादी मळकट पोथी हातांत घेऊन वाचीत बसला आहे व कोणी नांवाला गोमुखीत हात घालून गच्च डोळे झांकून जपाच्या निमित्यानें बावनखणीकडेस ध्यान लावीत आहे. इतक्यांत बाहेर ओसरीवर शेतकऱ्याचे पायाचा आवाज त्यांचे कानीं पडल्यास डोळे न उघडतां सोवळा कामगार त्यास विचारतो की “तूं कोण आहेस?" शे.-रावसाहेब मी शेतकरी आहे.” का० “येथे देवपूजेंत तुझें काय काम आहे? कांहीं भाजीपाला आणला असल्यास घरांत मुलाबाळांस स्पर्श न करितां यजमानीजवळ देऊन चालता हो. दुपारीं कचेरीत येऊन लेखी अर्ज तुझ नांवाचा कर, म्हणजे तुझें काय म्हणणे आहे, तें सर्व साहेबांस समक्ष जाऊन सांगेन. आतां जा कसा.”
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पुढे शेतकऱ्याने तसेच मागले पायी लागोलग राईतील कलेक्टरसाहेबांचे तंबूचे बाहेरले बाजूस जाऊन बुटलेर, पट्टेवाले व जमादारसाहेबांस मुजर करून तंबूचे दारापुढे लांब उ8भT राहून पहाता, तों कोणी साहेब पायाखालीं जमिनीवर काशिमरी गालिचाची बिछायत, अंगावर सालरजंगासारखा मोगलाई पेहराव घालून खुर्चीआसनावर बसून लवेंडरच्या सुवासामध्ये आपल्या खाण्यापिण्याचे नादांत गुंग, कोणी कोचावर उताणा पडून पुस्तकांतील गुलाबी वर्णन वाचण्यामध्यें निसंग असल्यामुळे तेथील चपराशी त्यांस (शेतकऱ्यास) तेथून धुडकावून लावितात. तेव्हां शेतकऱ्यांस आपलीं गाऱ्हाणीं सांगितल्याशिवाय घरीं मुकाट्यानें जावें लागते. यावरून गोरे कामगारांच्या रं तभाती, मिजाज व ताजीमतवाजा व काळे कामगारांचे दौलत, विद्या, अधिकार, उंचवर्णाची शेखी व सोवळेचाव, याच्या धुंदीत असणाऱ्या उभयतां कामगारांच्या घरांतील बेपरवा बायकापोरांशीं अज्ञानी दुबळ्या शेतकऱ्यांच्या बायकामुलांचे दळणवळण नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या वास्तविक अडचणी गोऱ्या व काळ्या परजातीतील सरकारी कामगारांच्या कानावर घालण्यास मार्गच नाही. कारण या उभयता सरकारी कामगारांचे सर्वस निराळे(हें येथील लाल अथवा हिरव्या बागेंतील उपदेश करणाऱ्या शूद्र टीकोजीस माहीत कसें नाही? तो हमेशा वेडीचे सॉग कशाकरिता घेतो बरें?) आणि असे परकी कामगार शूद्र शेतकऱ्यांच्या शेताची पहाणी करून त्यास सूट देणार ! पहाणी करतेवेळी कधी कधीं गोरे कामगार शिकार करून थकल्यामुळे तंबूंत सडकून झोंपा मारितात. आणि सॉवळे कामगार त्या गांवांतील निर्दय कुलकण्र्याच्या व अक्षरशून्य भितया पाटलाच्या मदतीनें गांवांतील त्याचे दोनचार दारूबाज गांवगुंड सोबती घेऊन पहाणी व्हावयाची व तत्संबंधी सर्व कागदपत्र पाहून सूट दणार म्हटलें म्हणज, समुद्राच पलीकडचे गोरे कामगार ! इतकाही अट्टाहास करून शेतकऱ्यांस वेळच्या वेळी सूट नच मिळाल्यास त्यानें मारवाड्यापासून कर्ज काढून पट्टी(A Sepoy Revolt by Henry Mead, page 29) न वारावी तर, का त्यानें चोंन्यामान्या करून पट्टी वारावी ! किंवा कसें?
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३७ 

असो, परंतु अज्ञानी शेतकरी कर्जवाम काढून चावडी भरण्यास चालले की, त्यांच्यापुढे वाटेंत बहूतेक अक्षरशून्य ठोंबे, 3 भटांचा थाट करून आडवे उभे राहून फक्त “यजमान तुमचे कल्याण असो” असें म्हणून त्यांजपासून कांहीं ना कांही पैसे उपटतात, त्यांतून वेळीं वक्तशीर पाऊस पडून थोडेंबहूत पीक 3 रकमेस आल्यास आमच्या जहामर्द सरकारच्या भागूबाई गोऱ्या कामगारांनी अज्ञानी भोळ्या शेतकऱ्यांजवळून बंदुकी-बरच्या हिसकावून घेतलेल्या. त्यांच्या कित्येक पिकांचा रात्रीं डुकरें येऊन नाश करितात व बाकी उरलेल्या पिकांवर ब्राह्मण, मारवाडी, वगैरे सावकार लिगायती व गुजराथी अडते आणि इतर जातीतील दलाल दीडीवाले नजर ठेवून त्यास ओरबडून खातात. इतकेंच नव्हे, परंतु अडत्याचे स्वयंपाकी गुजराथी ब्राह्मण, शेतकऱ्यापासून दर पल्ल्यामार्गे शेर शेर ओरबडू लागले आहेत. असो, शेवटी बाजार करून एकटा दुकटा शेतकरी, परत वेशीच्या दारांत आला की, गावांतील पोलीसपाटलासहीत एकदोन गांवगुंड, दारूबाज लुच्चांस थोडी थोडी टारू न पाजल्यास थोड्याच दिवसांत चावडीपुढे त्याची कुंदी निघालीच, असे समजा. काय हो हे आताचे ज्ञानसंपन्न धर्मराज्य ! परंतु या धर्मराज्यांत कर्मनिष्ठ ब्राह्मण कामगारांच्या कर्तबगारीने काठीला सोनें बांधून रामेश्वरापासून अटकेपावतों फिरण्यास कांहीं हरकत नव्हती. परंतु सांप्रत लक्ष्मी आपल्या ज्ञान व वस्त्रहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या घरांत पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळेना, तेव्हां कंटाळून उघड दिवसा आपल्या समुद्र पित्याचे घरीं गेली व समुद्राचे पलीकडील इंग्रज सख्या बांधवांनी तिच्या मर्जीप्रमाणे आळस टाकून उद्योगधंद्याचा पाठलाग करून, आपल्या घरांतील अबालवृद्ध स्त्रीजातीस बरोबरीचा मान देऊन त्यांचा इतमाम नीट ठेवू लागल्यामुळे, ती (लक्ष्मी) त्यांची बंदी बटिक झाल्यावरून, ते आपल्या हस्तगत झालेल्या शूद्र शेतकऱ्यांपासून मन मानेल तसे द्रव्य गोळा करून, त्यांजबरोबर वरकांति गोड गोड बोलतात खरे, परंतु त्यांस मनापासून विद्या देण्याकरिता चकवाचकव करितात. याचे मख्य कारण हें सावें कीं शेतकरी विद्वान झाल्याबरोबर ते आपल्या खांद्यावर आसूड टाकून लक्ष्मीस पुढे घालून आपल्या घरी आणून नांदावयास लावण्याकरितां कधीं मागेपुढे पहाणार नाहीत, या भयास्तव ते शेतकऱ्यांस विद्वान करीत नाहीत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


कारण तसें घडून आल्यास त्या सर्वास टोम टोम अमेरिकेत जाऊन तेथे रात्रंदिवस कष्ट करून आपलीं पोटें भरावी लागतील. व शेतकऱ्यांची लक्ष्मी जर आजपावेतों आपल्या माहेरी गप्प बसली नसती, तर भट ब्राह्मणांनी इतकें सॉवळे माजविलें असतें कीं, यांनी आपल्या जन्म देणाऱ्या मातापित्याससुद्धा अंमळ दूर हो ! आम्ही आता सोवळे नेसलो आहोत, आम्हाला शिवू नका, तुमची आम्हांवर सावलीदेखील पडू देऊं नका, म्हणून म्हणण्यास चुकल जसत. तेव्हां या भूदेव भटांनी अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांची काय दुर्दशा उडविली असती, त्याचे अनुमानसुद्धां करितां येत नाही. परंतु मी खात्रीने सांगतो कि, यांनी तर मांगमहारांस जिवंतच नव्या इमारतीच्या पायांनी दगडचुन्यांत चिणून काढिलें असतें. आतां मांगामहारांनी ख्रिस्ती होऊन आपली सुधारणा करून मनुष्यपदास पावावें तर, तेथील कित्येक काळे भट विद्वान ख्रिस्ती, रात्रंदिवस गोऱ्या मिशनरींच्या कानी लागून ते या अनाथांची डाळ शिजूं देत नाहीत. कारण तेथेही उंच वर्णातील झालेले ख्रिस्ती अनेक प्रकारचे भेदाभेद ठेवितात, असें पहाण्यांत आले आहे. इतकेंच नव्हे परंतु आतांशीं कित्येक विद्वान भटब्राह्मण (A Sepoy Revolt by Henry Mead, page 286.) काखेंत सोंवळींभांडीं मारून इंग्लंडास जाऊं लागले आहेत. तेथे हे प्रतापी जाऊन शेतकऱ्यांच्या घरांतील लक्ष्मीच्या नाटांत लंपट होऊन सदा सर्वकाळ विजयी लक्ष्मीच्या झोकांत असल्यामुळे कोणाची परवा न करणारे इंग्रज लोकांस, मुक्या शूद्रादि अतिशूद्रांविषयी काय काय लांड्यालबाड्या सांगून त्यांच्या समजुतीत काय काय फरक पाडून त्यांचा सरकारी कामगारांकडून कसकसा सत्यानास करितील.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


याविषयी आमच्या हल्लीच्या बापुड्या गव्हरनर जनरल साहेबांच्या सुद्धा तर्क करवणार नाहीत. कारण आमचे अट्टल खटपटी माजी गव्हरनर टेम्पलसाहेबांचे कारकिर्दीत कालच्या दुष्काळात तलावकनाल वगैरे ठिकाणीं पोटें आवळून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर भट ब्राह्मण कारभारी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा भटकामगारांनी इतका बंदोबस्त ठेविला होता की, भेकड सिद्धी लोकांच्या मुलाबाळांस चोरून अमेरिकेंत विकण्याकरितां नेतेवेळी त्यांची भयंकर स्थिती यांहून फार बरी होती, असें तुमच्या खात्रीस आणून देण्यापुरतें येथे सर्व लिहूं गेल्यास त्या सर्वाचा आसुडाच्या सवाईनें दुसरा एक स्वतंत्र ग्रंथच होईल. यास्तव पुढे एखादे वेळी मला फावल्यास त्याविषयी पहातां येईल. परंतु हल्लीं हिंदुस्थानविषयी लंडनांत रात्रंदिवस बडबड करण्यापेक्षां मे. फासेटसाहेबांनीं मे. ग्ल्याडस्टनसाहेबांसारख्या डोळसास कसेंही करून आपल्याबरोबर घेऊन येथे आल्याबरोबर, त्या उभयतांनीं एकटोन आठवडे महारामांगांच्या झोपडीत राहून त्यांची हल्लींची स्थिती स्वत: आपल्या डोळ्यांनीं पाहिल्याबरोबर ते पुनः इंग्लंडांत बडबड करण्याकरितां परत न जातां परभारां अमेरिकेंत पळून न गेल्यास, भटब्राह्मणांच्या पोरासोरांनी या माझ्या लेखावर पाहिजेल तशा कोट्या करून आपल्या वर्तमानपत्रांसह मासिक पुस्तकांनी छापून बेलाशक आपली पोटें भरावीत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३८ 

सारांश एकंदर सर्व माळी, कुळबी, धनगर वगैरे शेतकऱ्यांजवळ ईश्वराकडून आलेले म्हणण्यालायक कुराण, बायबलासारिखें पुस्तक नसल्यामुळे त्यांच्यांतील महाप्रतापी ओसले, शिंदे, होळकर, गायकवाड वगैरे राजेरजवाडे शेतकऱ्यांचीं बहुतक मुलें, गायीचे बाप, जयांस आर्यभटांच्या आडकाठीमुळे संस्कृत रुपावलिसुद्धां धड वाचतां येत नाही. आम्हीं मानव प्राणी आहोत व आमचे वास्तविक अधिकार काय काय आहेत, याविषयी एकंदर सर्व शेतकऱ्यांस मुळीच कांही समजत नाहीं. तसें जर नाहीं म्हणावें, तर शेतकऱ्यांनी आपुल्या स्वजात, आर्यमानवांच्या मलीन पायांची तीर्थे प्राशन करण्याची वहिवाट चालू ठेविली असती काय? ब्राह्मणांच्या सांगण्यावरून त्यांच्या पूर्वजांनी उपस्थित केलेल्या या दगड धतूंच्या मूर्ति, गाया, सर्प व तुळशीच्या झाडांची शेतकऱ्यांनी पूजा करून त्यांस देवाप्रमाणे मानले असते काय? आर्यब्राह्मणांनी आपले मतलब साधण्याकरिता समूळ ज्ञानहीन करून ठेविल्यामुळे त्याच्यांत सारासार विचार करण्याची ताकट नसल्यामुळे ते भुताखेतांवर भरोसा ठेऊन मन मानेल त्या वीरांची वारी अंगांत घुमवून, पोरासोरांसह आपल्या अंगावरील साधणी (उतारे) टाकून आपलें द्रव्य खराब करितात. त्यांचा औषधउपचारांवर भरोसा नसल्यामुळे ते लुच्चड देवऋषींचे नादी लागून आपल्या जिवास मुकतात. असो, याविषयीं पुढे एखादे वेळा पाहता येईल.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


अशा चोहोकडून सर्वोपरी नाडल्यामुळे सत्वहीन झालेले अज्ञानी शेतकऱ्यांत लहानपणीं लगने करण्याची वहिवाट असल्यामुळे, प्रथम एकंदर सर्व शेतकऱ्यांचे कोवळ्या वीर्याचा भंग होत चालल्यावरून त्यांची संतति दिवसेंदिवस वीर्यहीन होत चालली आहे. त्याचप्रमाणे पूर्वी शेतकऱ्यांच्या गोफणीच्या धोंड्यांच्या भडिमारापुढे एकटादुकटा टिकाव धरीत नसे. परंतु आतांचे इंग्रजी अंमलांतील त्यांचे नातूपणतू इतके तेजहीन झाले आहेत की, त्यांस गांवांतील धगड्या मुरळ्यासुद्धां भीक घालीत नाहींत व दुसरें असें कीं, त्यांच्यांत लहानपणीं लगनें केल्यामुळे, लग्नें केल्यानंतर त्यांचीं मुलें वयांत आल्याबरोबर त्यांस रंगरूप, चालचलणूक, प्रकृती, स्वभाव वगैरे गुणावगुण एकमेकांस न आवडल्यामुळे परस्परांत वितुष्ट पडून, कित्येक उनाड शेतकऱ्यांच्या छाकट्या मुलांनी आपल्या निरपराधी स्त्रियांचा त्याग (मी हा चवथा भाग गतवर्षी सन १८८३ एप्रिल महिन्यांत मुंबई शहरांत वाचला. त्या दिवसापासून शूद्वांत निरनिराळ्या विद्वानांनी आपापल्या तारुण्यांत लग्नाच्या कुलशील स्त्रिया फक्त गोऱ्यागोमट्या नसल्यामुळे मोकलल्या आहेत, ह्या सर्वास माझा मोठा राग आला आहे व ते आपआपल्या अनाथ स्त्रियांपाशीं मनाच्या लज्जेस्तव क्षमा मागून त्यांस आपआपल्या घरीं परत आणण्याचे एकीकडे ठवून माझीच ते उलटी चोरून छापून वर्तमानपत्राद्वारें निंदा करूं लागले आहेत. त्यांच्या तोंडाला हात कोणी लावावा !) केल्यामुळे त्या बापुड्या आपल्या आईबापांचे घरीं आयुष्याचे दिवस काढीत आहेत व बाकी उरलेल्या निराश्रित बिचाऱ्या हाळ्यापाळ्या करून आपला गुजारा करितां करितां यमसदनास जातात. शेतकऱ्यांचे आईबाप त्यांच्या संमतीशिवाय त्यांचीं लहानपणीं लगनें करून देतात. यामुळे त्यांस लग्नाच्या बायक जर आवडल्या नाहीत, तर त्या प्रत्येकांनी दुसरीं एकेक पाटाची बायको केल्यास ते कदाचित न्यायदृष्टीनें अपराधी ठरतील, असे माझ्यानें सांगवत नाही.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३९ 

तथापि त्यांनी एकामागें एक, दोन, तीन, चार पाटाच्या बायका कराव्यात, या जुलमी न्यायाला म्हणावें तरी काय? माझ्या मते त्यांनी पांचवी पाटाची बायको करावी, म्हणजे त्यांच्या मढ्यापुढे गाडगी धरण्याच्या जाचातून त्यांची मुलें मुक्त होतील. त्यांतून कुणब्यांतील कित्येक शेतकरी ज्यांस ट, फ करून व्यंकटेशस्त्रोत्र, तुळशीआख्यान व रुक्मिणी स्वयंवर वाचतां आलें की, त्यांनी दोन दोन, तीन तीन पाटांच्या बायका केल्यानंतर गांव पाटिलक्या करितां करितां गांवांतील धूर्त ब्राह्मणांचे नादी लागून आज यांच्या खोट्या खतांवर साक्षी घालितात, उद्यां त्यांच्या खोट्या पावत्यांवर साक्षी घालून गांवांतील एकंदर सर्व गरीबगुरिबांस त्रास देऊन त्यांजपासून मन मानेल तसें आडवून द्रव्य उपटतात. माळ्यांतील शेतकऱ्यांस ट, फ, कां होईना, वाचण्याचे नांवानें वाटोळे गरगरीत पूज्य. परंतु त्यांस भराड, गोंधळ, चितरकथा व कीर्तनें ऎकतां ऎकतां थोडेसे अभंग, चुटके व दोहरे तोंडपाठ झाले की, ते चौकोनी चिरे बनले, म्हणजे त्यांच्यापुढे विद्वान, पंडित व घोड्यावर बसून गोळी निशाण मारणारे काय माल ! त्यांनी एखादा अक्षंगाचा तुकडा अथवा दाहरा फकला कों, भल्या भल्या जाड्या विद्वानांचे मोहरे फिरविण्यापुरता मनांत घमंडीचा भास झाला की, त्यांनीं लग्नाच्या बायकोच्या उरावर एकएक, दोनटोन पाटाच्या बायका ठणकावल्याच. त्यांच्या हाळीपाळीच्या जिवावर हांतांच्या बोटांत लहानमोठ्या रुप्याच्या अंगठ्या, उजव्या कानांत मोत्यांच्या बाळ्या, सखलादी तांबड्या टोप्या, बसावयास खाली लहान लहान तरटांचे तुकडे, त्यावर पुढले बाजूला नवारीच्या काळ्या मिचकूट चंच्या, पलिकडे चिटकुल्या पितळेच्या घाणेरड्या पिकदाण्या, त्यांत त्यांच्या आग्रहावरून विडा खाऊन थुकू लागल्याबरोबर आोकारी येते. शेजारी तरटावर एक दोन गांजा मळू लागणाऱ्या दाटी बळकटी करून बसलेल्या भांग्यासोबत्याबरोबर मन मानेल तशा, राजा विक्रमाच्या पोकळ गोष्टी सांगतां सांगतां आपण आपल्यासच टोपाजी मोन्याचे पूत हणगोजीराव म्हणवून घेणारे कारभारी बनतात.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


ज्यांच्या बायकांवर या कारभाज्यांच्या जेवणाच्या फरपाळ्या आल्या असतील, त्या बापुड्या आपल्या हाळ्यापाळ्यांच्या मिळकतीतून या ऐदी कारभाऱ्यांस पान, तबाकू पुरवून वळच्या वळ जेवू घTTत्ञतात. दुपारं रवाडून झापा घेतल्यानंतर घराबाहेर पडतांच दोन्ही पाय फांकून सोनारासारखीं पुढे उराडीं काढून चवड्यावर चालतांना दोन्ही दोन्ही अंगावर डूलून बोळक्या तोंडावरील भुरक्या मिशीवर ताव देणारे टोन बायकांचे कारभारी, माळ्यांच्या आळोआळींनीं फिरतां फिरतां तेथील एकटोन तुकडमाडू आप्तांस सामील करून गांवांतील अल्लड तरूण स्त्रियांच्या उखाळ्यापाखाळ्या काढून जातीमध्यें दोनदोन तीनतीन तट करून त्यांच्या पंचायती करितां करितां बहतेकांच्या सोयऱ्याधायज्यांत ਰੁਟੀ पडून, 3 बहतेकांच्या कानांत सुंठी पुंकून कित्येकांच्या सुनाबाळीची मायमाहेरें वर्ज करवितात. शेवटीं हे 3 पराक्रमी कारभारी गरीबगुरिबांस धमक्या देऊन त्यांजपासून दारूपाण्यापुरते पैसे घेऊन संध्याकाळी घरीं जातांच बायकांच्या पाट्यांतील उरल्यासुरल्या सडक्यासुडक्या फळफळांवर ताव देऊन, त्यांचे स्वयंपाक आटपेपावेतों तेथेच त्यांच्याशी लाडीगोडी लाऊन इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून टपत बसतात. गांवांतील लग्नांत हे रिकामटेकडे, तुकड माडून गांवातील दिवसाच्या तेलच्यावर धाड घालण्याकरितां त्याच्या मूळमातीस जातात. अशाप्रकारचे अक्षरशून्य मुजोर अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास त्या अज्ञानी शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतांची सुधारणा कधी व कशी होणार बरें ।
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ४० 

असो, आजपावेतों मी काय जी माहिती मिळविली आहे, त्यांपैकी नमुन्याकरितां सदरची थोडीशी हकिकत आपल्यापुढे आणिली आहे, तिचा आपण स्वतः शोध करून पहाल, तेव्हां तुमची खात्री होईल की, शूद्र शेतकऱ्यांवर हल्ली मोठा खुदाइ गहजब गुजरत्ना आहे व ही माहिती तरी फारच थोडी आहे, तथापि आमचे उद्योगी सरकारनें आपल्या गोऱ्या बयाझेटियरकडून काळ्या भट मामलेदारांमार्फत आजपावेतों शेतकऱ्याविषयीं जी काय माहिती मिळविलेली आहे, तिच्याशीं कांही मेळ मिळेल असे माझ्यानें म्हणवत नाही. कारण एकंदर सर्व सरकारी खात्यांपैकी एकसुद्धां खातें सांपडणार नाहीं की, ज्यामध्यें भट पडले नाहीत. या सर्व अनिवार दुःखांचा पाया आजपर्यंत हजारों वर्षापासून ब्राह्मणांनी शूद्र शेतकऱ्यास विद्या देण्याची बंदी केली हा होय. शेतकऱ्यांनी विद्या शिकू नये म्हणून पुराणिक व कथाइया भटांनी त्यांच्या मनावर इतकी छाप बसविली आहे कीं, शेतकऱ्यांस आपलीं मुलें विद्वान करण्यामध्ये मोठे पाप वाटतें. त्यांतून हल्ली त्यांची अतिशय लाचारी असल्यामुळे ते आपल्या मुलांस विद्या शिकवू शकत नाहीत, याचा अनुभव सर्वांस आलाच आहे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


यास्तव आमचे अष्टपैलू धार्मिक सरकार ज्या मानाने शेतकऱ्यापासून नानाप्रकारचे कर, पट्ट्या, लोकलफंड वगैरे बाबी गोळा करिते, त्याचप्रमाणे त्यांनी प्रथम एकंदर सर्व खेड्यांपाइयांतील सरकारी मराठी व इंग्लिश शाळा बंद करून शेतकऱ्यांवर थोडीशी इमानेंइतबारें मेहरनजर करून शेतकऱ्यांपैकीच शिक्षक तयार करण्याकरितां दरएक तालुक्यानें लोकल फंडापैकी रकमा खर्ची घालून, शेतकऱ्यांच्या मुलांस 3भन्नवस्त्रं, पुस्तकें, वगैरे पुरवून त्यांच्या मुलांकरिता बोर्डिंग शाळा कराव्यात व त्या शाळांमध्ये त्या मुलांपैकी शाळागुरु तयार केल्यानंतर फक्त त्यांच्या शाळांनी शूद्र शेतकऱ्यांनी आपली मुलें अमुक वर्षाचे वयाचीं होईतों पावतों अभ्यास करण्याकरितां पाठवावीत, म्हणून कायदा केल्याशिवाय शेतकऱ्यांचे मुलांस, थोडेसें कां होईना, परंतु पडावयाचा नाहीं. आणि तसें केल्याविना शेतकरी शुद्धीवर येणेच नाहीत. परंतु आमच्या इदर थापडी तिदर थापडी करणाऱ्या सरकारनें, पल्लोगणती ब्राह्मण कामगारांतील प्रोफेसर व डिरेक्टर शाळाखात्यांत खोगीरभरतीला घालून एकंदर सर्व लोकल फंड जरी खर्ची घातला, तथापि त्यांजपासून शेतकऱ्यांचे मुलांस वास्तविक विद्या मिळनें नाहीं. कारण शेतकऱ्यांचे शेती कुंपणाकरितां महारांनी लावलेल्या कांत्या वाऱ्याने जातात. हीं किती केलीं तरी भाइयाची तट्टे, संध्याकाळ झाली की, धर्मशाळेपुढे गप्प उभी रहावयाचीं । हें आमच्या सरकारच्या कानांत हळूच सांगून या प्रसंगीं आजचा विषय पुरा करितों.
पुढील पान..


महात्मा फुलेंचे संपूर्ण साहित्य अॅप स्वरुपात येथे उपलब्ध आहे..

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.