Sunday, 6 August 2017

प्रकरण ४ थे : (भाग १ )

शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले

पान क्र. २६ 

शेतकऱ्यांसहित शेतकीची हल्लींची स्थिती या प्रकरणाचे आरंभीं रात्रंदिवस शेत खपणाऱ्या कष्टाळू, अज्ञानी शेतकऱ्यांच्या कंगाल व दीनवाण्या स्थितीविषयीं वाटाघाट तूर्त न करितां, ज्यांच्या आईच्या आज्याची मावशी अथवा बापाच्या पंज्याची मुलगी, शिद्याचे अथवा गाइकवाडाचे घराण्यांतील खाशा अथवा खर्ची मुलास दिली होती, एवढ्या शेखी मिरविणाऱ्या कर्जबाजारी, अज्ञानी कुणब्यांच्या हल्लींच्या वास्तविक स्थितीचा मासला तुम्हास याप्रसंगों कळवितों. एक कुळवाडी एके दिवशीं नदीच्या किनान्याजवळच्या हवाशीर दाट आंबराईतील कलेक्टरसाहेबांच्या कचेरीच्या तंबूकडून, मोठ्या रागाच्या त्वेषांत हातपाय आपटून दांतओठ खात आपल्या गांवाकडे चालला आहे. ज्याचे वय सुमारें चाळीशीच्या भरावर असून हिम्मतीत थोडासा खचल्यासारखा दिसत होता. डोईवर पीळदार पेंचाचे पांढरें पागोटें असून त्यावर फाटक्या पंचानें टापशी बांधलेली होती. अंगांत खादीची दुहेरी बंडी व गुढघेचोळणा असून पायांत सातारी नकटा जुना जाडा हाता. खांद्यावर जाट, त्यावर खारवी बटवा टाकला असून, एकंदर सर्व कपड्यांवर शिमग्यांतील रंगाचे पिवळे तांबूस शितोडे पडलेले होते. पायांच्या टांचा जाड व मजबूत होत्या खऱ्या, परंतु कांहीं कांही ठिकाणी उकलून भेगा पडल्यामुळे थाडासा कुलपत चालत हाता. हाताच्या कांबी रुंद असून, छाता पसरट होता. चोटीशिवाय भवूक दाढमिशा ठेवल्यामुळे वरील दोन दोन फाळ्या दातांचा आयब झांकून गेला होता. डोळे व कपाळ विशाळ असून आंतील बुबूळ गारोळे भोऱ्या रंगाचे होतें. शरीराचा रंग गोरा असून एकंदर सर्व चेहरामोहरा ठीक बेताचा होता. परंतु थोडासा वाटोळा होता. सुमारें बारावर दोन वाजल्यावर घरीं पोहोचल्यावर जेवण झाल्यानंतर थोडासा आराम करण्याचे इराद्यानें माजघराचे खोलीत जाऊन तेथे वलणीवरील बुरणूस घेऊन त्यानें जमिनीवर अंथरला आणि त्यावर ठशाखालों घोंगडीची वळकटी घेऊन तोंडावर अंगवस्त्र टाकून नजला. परंतु सकाळीं उठून कलेक्टरसाहेबांची गांठ घेतली व ते आपल्या चहापाण्याच्या व तेव्हां त्यानें उताणे पडून आपले दोन्ही हात उरावर ठेवून आपण आपल्याच मनाशीं बावचळल्यासारखें बोलू लागला “इतर गावकऱ्यांसारखा मी पैमाष करणाऱ्या भटकामगारांची मूठ गार केली नाही यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर वाढविला व त्याच वर्षी पाऊस अळस टळम पडल्यामुळे एकंदर सर्व माझ्या शेत व बागाइती पिकास धक्का बसला, इतक्यांत बाप वारला. व याच्या दिवसमासाला बराच खर्च झाला, यामुळे पहिले वर्षी शेतसारा वारण्यापुरतें कर्ज ब्राह्मण सावकारापासून काढून त्यास मळा गहाण देऊन रजिस्टर करून दिला.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. २७ 

पुढे त्यानें मन मानेल तसें, मुद्दल कर्जावरील व्याजाचे कच्च्यांचे बच्चे करून माझा बारवेचा मळा आपल्या घशांत सोडला. त्या सावकाराच्या आईचा भाऊ रेव्हेन्यूसाहेबांचा दफ्तरदार, चुलता कलेक्टरसाहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा मुनसफ आणि बायकोचा बाप या तालुक्याचा फौजदार, याशिवाय एकंदर सर्व सरकारी कचेऱ्यांत त्यांचे जातवाले ब्राह्मणकामगार, अशा सावकाराबराबर वाद घातला असता, तर त्याच्या सर्व ब्राह्मण आप्तकामगारांनी हस्तेंपरहस्तें भलत्या एखाद्या क्षुल्लक कारणावरून माझा सर्व उन्हाळा केला असता. त्याचप्रमाणे दुसरे वर्षी घरांतील बायकामुलांच्या अंगावरील किडुकमिडूक शेतसाऱ्याचे भरीस घालून नंतर पुढे दरवर्षी शेतसारा अदा करण्याकरितां गांवांतील गुजर-मारवाडी सावकारांपासून कर्जाऊ रकमा काढिल्या आहेत, त्यांतून कित्येकांनी हल्ली मजवर फिर्यादी ठोकल्या आहेत व ते कज्जे कित्येक वर्षापासून कोडतांत लोळत पडले आहेत. त्याबद्दल म्यां कधीं कधीं कामगार व वकिलांचे पदरीं आवळण्याकरितां मोठमोठाल्या रकमा देऊन, कारकून, चपराशी, लेखक व साक्षीदार यांस भत्ते भरून चिऱ्यामिच्या देतां देतां माझ्या नाकास नळ आले आहेत. त्यांतून लांच न खाणारे सरकारी कामगार कोठे कोठे सांपडतात. परंतु लांच खाणाऱ्या कामगारांपेक्षा, न लांच खाणारे कामगार फारच निकामी असतात. कारण ते बेपर्वा असल्यामुळे त्यांजवळ गरीब शेतकऱ्यांची दादच लागत नाही व त्यांच्या पुढे पुढे करून जिवलग गड्याचा भाव दाखविणारे हुषार मतलबी वकील, त्यांच्या नांवानें आम्हां दुबळ्या शेतकल्यांतर सावकार सांगतील त्याप्रमाणे आपल्या बोडक्यांवर त्यांचे हुकुमनामे करून घ्यावेत. यावरून कोणी सावकार आत मला आपल्या दांरापाशीं उभे करीत नाहीत ! तेव्हां गतवर्षी लग्न झालेल्या माझ्या थोरल्या मुलीच्या अंगावरील सर्व दागिने व पितांबर मारबाड्याचे घरीं गहाण टाकून पट्टीचे हप्ते वारले. त्यामुळे तिचा सासरा त्या बिचारीस आपल्या घरीं नेऊन नांदवीत नाही. अरे, मी या अभागी दुष्टानें माझ्यावरील अरिष्ट टाळण्याकरितां माझ्या सगुणाचा गळा कापून तिच्या नांदण्याचे चांदणे केलें । आतां मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून? बागाइतांत नवीन मोटा विकत घेण्याकरितां जवळ पैसा नाही. जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे उसाचे बाळगे मोडून हुंडीचीही तीच अवस्था झाली आहे. मकाही खुरपणीवाचून वाया गेला. भूस सरून बरेच दिवस झाले. आणि सरभड गवत, कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्यामुळे कित्येक धट्टेकट्टे बैल उठवणीस आले आहेत. सुनाबाळांची नेसण्याचीं लुगडी फाटून चिंध्या झाल्यामुळे लग्नांत घेतलेली मौल्यवान जुनी पांघरुणे वापरून त्या दिवस काढीत आहेत. शेती खपणारी मुलें वस्त्रावांचून इतकी उघडींबंब झाली आहेत की, त्यांना चारचौघांत येण्यास शरम वाटते. घरांतील धान्य सरत आल्यामुळे राताळ्याच्या वरूवर निर्वाह चालू आहे. घरांत माझ्या जन्म देणाऱ्या आईच्या मरतेवेळी तिला चांगलें चुंगलें गोड धोड करून घालण्यापुरता मजजवळ पैस नाही, याला उपाय तरी मी काय करावा? बैल विकून जर शेतसारा द्यावा, तर पुढे शेतकी कोणाच्या जीवावर ओढावी? व्यापारधंदा करावा, तर मला लिहिता वाचता मुळीच येत नाहीं. आपला देश त्याग करून जर परदेशांत जावें, तर मला पोट भरण्यापुरता कांहीं हुन्नर ठाऊक नाही. कण्हेरीच्या मुळ्या मी वाटून प्याल्यास कर्तीधर्ती मुलें आपली कशीतरी पोटें भरतील. परंतु माझ्या जन्म दणाऱ्या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या लहानसहान चिटकुल्या लेकरास अशा वेळीं कोण सांभाळील? त्यांनी कोणाऱ्या दारांत उभें रहावें? त्यांनी कोणापाशीं आपलें तोंड पसरावे?”
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. २८ 

म्हणून अखेरीस मोठा उसासा टाकून रडतां रडतां झोपी गेला. नंतर मी डोळे पुशीत घराबाहेर येऊन पहातों तों त्याचे घर एक मजला कौलारू आहे. घराचे पुढच बाजूस घरालगत आढेमेढी टाकून बैल बांधण्याकरिता छपराचा गोठा केला आहे. त्यांत दोनतीन उठवणीस आलेले बैल रवंथ करीत आहेत व एक बाजूला खंडी सवाखंडीच्या दोनतीन रिकाम्या कणगी कोपऱ्यांत पडल्या आहेत बाहेर आंगणांत उजवे बाजूस एक आठ बैली जुना गाडा उभा केला आहे. त्यावर मोडकळीस आलेला तुराठ्यांचा कुरकुल पडला आहे. डावे बाजूस एक मोठा चौरस ओटा करून त्यावर एक तुळशीवृंदावन बांधलें आहे व त्यालगत खापरी रांजणाऱ्या पाणईचा ओटा बांधला आहे. त्यावर पाण्यानें भरलेले दोनतीन मातीचे डेरे व घागरी ठेविल्या आहेत. पाणईशेजारीं तीन बाजूला छाट दिवाली बांधून त्यांचे आंत आबडधोबड फरशा टाकून एक लहानशी न्हाणी केली आहे. तिच्या मोरीवाटे वाहून गलल्या पाण्याचे बाहेरचे बाजूस लहानसे डबकें सांचलें आहे, त्यामध्यें किड्यांची बुचबुच झाली आहे. त्याचे पलीकडे पांढऱ्या चाफ्याखाली, उघडी नागडी सर्व अंगावर पाण्याचे ओघळाचे डाग पडलेले असून; खर्जुली, डोक्यांत खवडे, नाकाखाली शेंबडाच्या नाळी पडून घामट अशा मुलांचा जमाव जमला आहे. त्यांतून कितीएक मुलें आपल्या तळहातावर चिखलाचे डोळे घेऊन दुसऱ्या हातांनी ऊर बडवून “हायदोस, हायदोस” शब्दांचा घोष करून नाचत आहेत; कोनी दारूपिठ्याचे दुकान घालून कलालीन होऊन पायांत बाभळीच्या शेंगांचे तोडे घालून दुकानदारीण होऊन बसली आहे. तिला कित्येक मुलें चिचोक्याचे पैसे देऊन पाळीपाळीनें लटकी पाण्याची दारू प्याल्यावर तिच्या अमलामध्यें एकमेकांच्या अंगावर होलपडून पडण्याचे हुबहुब सोंग आणीत आहेत. त्याचप्रमाणे घराचे पिछाडीस घरालगत आढे-मेंढी टाकून छपरी गोठा केला आहे. त्यांत सकाळीं व्यालेली म्हैस, दोनतीन वासरें, एक नाळपडी घोडी बांधली आहे. भिंतीवर जिकडे तिकडे कोण्याकोपऱ्यांनीं घागरी, तांबडीं गोचिडें चिकटलीं आहेत. छपराच्या वळचणीला वेणीफणी करितांना निघालेले केसांचे बुचक जागाजाग कोंबले आहेत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
त्यालगत बाहेर परसांत एके बाजूस कोंबड्याचे खुराडें केले आहे. त्याशेजारी एकदोन कैकाडी झांप पडलेले आहेत व दुसरे बाजूस हातपाय धुण्याकरितां व खरकटी मडकीभांडी घासण्याकरितां गडगळ दगड बसवून एक उघडी न्हाणी केली आहे. तिच्या खुल्या दरजांनीं जागोजाग खरकटें जमा झाल्यामुळे त्यांवर माशा घोंघों करीत आहेत. पलीकडे एका बाजूला शेणखई केली आहे. त्यांत पोरासोरांनी विष्ठा केल्यामुळे चहूंकडे हिरव्या माशा भणभण करीत आहेत. शेजारीं पलीकडे एका कोपऱ्यांत सरभड गवत व कडब्यांच्या गंजी संपून त्यांच्या जागी त्या त्या वैरणीच्या पाचोळ्यांचे लहानमोठे ढीग पडले आहेत. दुसऱ्या कोपऱ्यांत गोवळ्यांचा कलवड रचिला आहे, त्याचे शेजारी बाभळीच्या झाडाखाली मोडक्या औतांचा ढीग पडला आहे, त्याच्या खालीं विलायती धोतरे उगवले आहेत, त्यामध्यें नुकतीच व्यालेली झिपरी कुत्री आल्यागेल्यावर गुरगुर करीत पडली आहे. शेजारी गवाणींतील चघळचिपाटांचा ढीग पडला आहे. बाकी उरलेल्या एकंदर सर्व परसांत एक तरुण बाई घराकडे पाठ करून गोवच्या लावीत आहे. तिचे दोन्ही पाय शेण तुडवून तुडवून गुढग्यापावेतों भरले होते. पुढे एकंदर सर्व माजघरांत उंच खोल जमीन असून येथे पहावें, तर दळण पाखडल्याचा वैचा पडला आहे; तेथे पहावें, तर निसलेल्या भाजाच्या काइया पडल्या आहेत. येथे खाल्लेल्या गोंधणीच्या बिया पडल्या आहेत, तेथे कुजक्या कांद्यांचा ढीग पडला आहे, त्यांतून एक तन्हेची उबट घाण चालली आहे. मध्यें खुल्या जमिनीवर एक जख्ख झालेली म्हातारी खालीवर पासोडी घालून कण्हत पडली होती. तिच्या उशाशीं थोइयाशा साळीच्या लाहया व पितळीखालीं वार्टीत वरणाऱ्या निवळींत जोंधळ्याची भाकर बारीक कुसकरून काला व पाणी भरून ठेवलेला तांब्या होता. शेजारीं पाळण्यांत तान्हें मूल टाहो फोडून रडत पडले आहे. याशिवाय कोठे मुलाच्या मुताचा काळा आघळ गला आहे. कोठे पोराचा गू काढल्यामुळे लहानसा राखेचा पांढरा टवका पडला आहे. घरांतील कित्येक कोनेकोपरे चुनातंबाखू खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारून तांबडेलाल केले आहेत, एका कोपऱ्यांत तिघीचौधींचे भलें मोठे जातें रोविलें आहे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
दुसच्या कोपयांत उखळाशेजारी मुसळ उभे6 केलें आहे आणि दाराजवळील कोपऱ्यांत केरसुणीखाली झाडून लावलेल्या कचऱ्याचा ढीग सांचला आहे; ज्यावर पोरांची गांड पुसलेली चिंधी लोळत पडली आहे. इकडे चुलीच्या भाणुशीवर खरकटा तवा उभा केला आहे, आवलावर दुधाचे खरकटे मडके घोंगत पडले आहे. खाली चुलीच्या आळ्यांत एके बाजूला राखेचा ढीग जमला आहे, त्यामध्यें मनीमांजरीनें विष्ठा करवून तिचा मागमुद्दा नाहीसा केला आहे. चहूंकडे भिंतीवर ढेकूणपिसा मारल्याचे तांबूस रंगाचे पुसट डाग पडल आहत. त्यांतून कोठे पोरांचा शेंबूड व कोठे तपकिरीच्या शेंबडाचे बोट पुसल आहे. एका देवळीत आतले बाजूस खात्या तेलाचे गाडगें, खोबरेल तेलाचे मातीचे बुटकुलें, दांतवणाची कळी, शिगटाची फणी, तखलाठी आरशी, काजळाची डबी आणि कुंकाचा करंडा एकेशेजेजी मांडून ठेविले आहेत व बाहेरच्या बाजूस देवळीच्या किनाऱ्यावर रात्रीं दिवा लावण्याकरितां एकावर एक तीनचार दगडांचे दिवे रचून उतरंड केली आहे. त्यांतून पाझरलेल्या तेलाचा ओघळ खाली जमिनीपावेतों पसरला आहे. त्या सर्वांचे वर्षातून एकदां आषाढ वद्य अमावस्येस कीट निघावयाचे. दुसरे देवळीत पिठाचे टोपल्याशेजारी खाली डाळीचा कणुरा व शिळ्या भाकरीचे तुकडे आहेत. तिसऱ्या देवळीत भाकरीच्या टोपल्याशेजारी थोड्या हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, दुधाची शिप व आंब्याच्या करंड्या पडल्या आहेत, ज्यावर माशा व चिलटें बसून एकीकडून खातात व दुसरीकडून त्यांजवर विष्ठा करीत आहेत. आणि चौथ्या देवळीत सांधलेल्या जुन्या वाहाणांचा व जोड्यांचा गंज पडला आहे. शेजारीं चकमकीचा सोकटा व गारेचे तुकडे पडले आहेत. एका खुटीवर अंथरावयाच्या जुन्या जीर्ण झालेल्या घोंगड्या व चवाळीं ठेविलीं आहेत. दुसरीवर पांघरावयाच्या गोधइया व पासोइया ठेविल्या आहेत व तिसरीवर फाटके मांडचोळणे व बंड्या ठेविल्या आहेत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. २९ 

नंतर माजघराचे खोलींत जाऊन पहातों, तों जागोजाग मधल्या भिंतीला लहानमोठ्या भंडाच्या आहेत. त्यांतून एका भंडारीस मात्र साधे गांवठी कुलूप घातलें होतें. येथेही जागोजाग खुट्यांवर पांघरुणांची बोचकी व सुनाबाळांचे झोळणे टांगले आहत. एका खुटीला घोडीचा लगाम, खोगीर, वळी व रिकामी तेलाची बुधली टांगली आहे. दुसरीला तेलाचा नळा टांगला आहे. शेवटी एका बाजूला भिंतीशी लागून डेल्यावर डेरे व मडकी रचून पांच उतरंडी एके शेजेनी मांडल्या आहेत. शेजारीं तुळईला दोन मोळाची शिकी टांगली आहेत. त्यावर विरजणाचे व तुपाचे गाडगें झांकून ठेविलें आहे. अलीकडे भला मोठा एक कच्च्या विटांचा देव्हारा केला आहे. त्याच्या खालच्या कोनाइयांत लोखंडी कुन्हाडी, विळे आणि विळी पडली आहे. वरतीं लहानसें सारवी वस्त्र अंथरून त्यावर रुप्याचे कुळस्वामीचे टॉक एके शेजेनी मांडले आहेत. त्यांच्या एके बाजूस दिवटी बुधली उभी केली आहे व दुसरे बाजूस दोम दोम शादावलाची झोळी, फावडी उभी केली आहे. वरती मंडपिला उदाची पिशवी टांगली आहे. खाली बुरणुसावर शेतकऱ्यास गाढ झोंप लागून घोरत पडला आहे. एका कोपऱ्यांत जुनी बंदुकीची नळी व फाटक्या जनासहित गाटीची वळकुटी उभी केली आहे. दुसच्या कोपऱ्यांत नांगराचा फाळ, কুন্তলাভয়া फाशी, कोळप्याच्या गोल्हया, तुरीची गोधी व उलटी उभी केलेली ताक घुसळण्याची रवी आणि तिसन्या कोपऱ्यांत लवंगी काठी व पहार उभी केली आहे. सुमारें टोनतीन खणांत तुळ्यांवर वकाण व शराच सरळ नीट वांसे बसवून त्यावर आडव्यातिडव्या चिंचेच्या फोकाट्यांच्या पटईवर चिखलमातीचा पेंड घालून मजबूत माळा केला आहे. ज्यावर राळा, राजगिरा, हृलगा, वाटाणा, पावटा, तीळ, चवळी 3 वगैरे अनेक भाजीपाल्यांचे बी जागोजाग डेन्यांतून व गाडग्यांतून भरून ठेविलें आहे. वरती कांभिऱ्याला बियाकरितां मक्याच्या कणसांची माळ लटकत असून पाखाडीला एके ठिकाणीं चारपांच वाळलेले दोडके टांगले आहेत. दुसऱ्या ठिकाणी दुधाभोपळा टांगला असून तिसऱ्या ठिकाणी शिक्यावर काशीफळ भोपळा ठेविला आहे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
चवथ्या ठिकाणीं नळ्यासुद्धां चाडे व पाभारीची वसू टांगली असून, कित्येक ठिकाणीं चिध्याचांध्यांचीं बोचकी कोंबली आहेत. मध्ये एका कॉभिज्याला बाशिगें बांधलीं आहेत. वरती पहावें, तर कौलांचा शेकार करण्यास तीनचार वर्षे फुरसत झाली नाहीं व त्याचे खालचे तुराठ्याचे ओमण जागोजाग कुजल्यामुळे गतवर्षी चिपाडानें सांधलें होतें, म्हणून त्यातून कोठेकोठे उंदरांनी बिळे पाडली आहेत. एकंदर सर्व घरांत स्वच्छ हवा घेण्याकरिता खिडकी अथवा सवाना मुळीच कोठे ठेविला नाहीं. तुळ्या, कांभिरें, ओमणासहित वांशांवर धुराचा डांबरी काळा रंग चढला आहे. बाकी एकंदर सर्व रिकाम्या जागेत कान्तीणीनी मोठ्या चातुर्याने, अति सुकुमार तंतूनीं गुंफलेली मच्छरदाणीवजा आपलीं जाळीं पसरलीं आहेत, ज्यांवर हजारों कांतिणीचीं पिलें आपली खेळकसरत करीत आहेत. ओमण, वांसे, तुळ्यांवर जिकडे तिकडे मेलेल्या घुल्यांची व कांतिणीचीं विषारी टरफलें चिकटली आहेत, त्यांतून तुळ्या वर्गेरे लांकडाच्या ठेवणीवर कित्येक ठिकाणी उंदीर व झुरळांच्या विषारी लेंड्यांनी मिश्र झालेल्या धुळीचे लहानलहान ढीग जमल आहत, फुरसत नसल्यामुळे उजेथें चारपांच वर्षातून एकदांसुद्धां केरसुणी अथवा खराटा फिरविला नाही. इतक्यांत उन्हाळा असल्यामुळे फार तलखी होऊन वळवाचा फटकारा येण्याचे पूर्वी वादळाचे गर्दी मध्यें वाऱ्याचे सपाट्यानें कौलांच्या सापटीतून सर्व घरभर धुळीची गर्दी झाली, तेव्हां तोंडं वासून घोरत पडलेल्या कुणब्याच्या नाकातोंडांत विषारी धूळ गेल्याबरोबर त्यास ठसका लागून, तो एकाएकी दचकून जागा झाला. पुढे त्या विषारी खोकल्याच्या ठसक्याने त्याला इतके बेजार केलें की, अखेरीस थोडासा बेशुद्ध होऊन तो मोठमोठ्यानें विवळून कण्हू लागला. त्यावरून त्याच्या दुखणायीत म्हातारे आईनें माजघरांतून धडपडत त्याच्याजवळ येऊन त्याचे मानेखाली खोगराची वळी घातल्यानंतर त्याच्या हनवटीला हात लावून तोंडाकडे न्याहाळून रडतां रडतां म्हणाली, “अरे भगवंतराया, मजकडे डोळे उघडून पहा. रामभटाच्या सांगण्यावरून तुला साडेसातीच्या शनीनें पीडा करू नये, म्हणून म्यां, तुला चारून, कणगींतले पल्लोगणती टाणे नकट्या गुजरास विकून अनेक वेळां मारुतीपुढे ब्राह्मण जपास बसवून सवाष्ण ब्राह्मणांच्या पंक्तीच्या पंक्ती कि रे उठविल्या ! कित्येक वेळ बाळा, तुला चोरून परभारा गणभटाचे घरीं सत्यनारायणाला प्रसन्न करण्या निमित्त ब्राह्मणांचे सुखसोहळे पुरविण्याकरितां पैसे खर्च केले आणि त्या मेल्या सत्यनारायणाची किरडी पाजळली. त्यानें आज सकाळीं कलेक्टरसाहेबाचे मुखीं उभे राहून तुला त्याजकडून सोयीसोयीनें पट्टी देण्याविषयी मुदत कशी देवविली नाही? अरे मेल्या ठकभटानों, तुमचा डाला मिरवित्मा. तुम्ही नेहमीं मला शनि व सत्यनारायणाऱ्या थापा देऊन मजपासून तूपपोळ्यांचीं भोजनें व दक्षिणा उपटल्या. अरे, तुम्ही मला माझ्या एकुलत्या एक भगवंतरायाच्या जन्मापासून आजदिनपावेतों नवग्रह वगैरेंचे धाक दाखवून शेकडों रुपयांस बुडवून खाल्लें. आतां तुमचे तें सर्व पुण्य कोठे गेलें? अरे, तुम्ही मला धर्ममिर्षे इतकें ठकविलें की, तेवढ्या पैशांत मी अशा प्रसंगी माझ्या बच्याच्या कित्येक वेळां पट्टया वारून, माझ्या भगवंतरायाचा गळा मोकळा करून त्यास सुखी केलें असतें !
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
अरे, तुमच्यांतीलच राघूभरारीनें प्रथम इंग्रजांस उलटे टोन आणे लहून दऊन त्यास तळेगांवास आणिले. तुम्हीच या गोरे गैर माहितगार साहेबलोकांस लांड्यालबाड्या सांगून, आम्हां माळ्याकुणब्यांस क्विभकारी केलें आणि तुम्हीच आतां, आपल्या अंगांत एकीचे सोंग आणून इंग्रज लोकांचे नांवानें मनगटें तोडीत फिरतां. इतकेंच नव्हे, परंतु हल्लीं माळी कुणबी जसजसे भिकारी होत चालले, तसतसे तुम्हांस त्यांना पहिल्यासारखें फसवून खातां येईना, म्हणून तुम्ही ब्राह्मण, टोपीवाल्यास बाटवून, पायांत बूट-पाटलोन व डोईवर सुतक्यासारखे पांढरे रुमाल लावून, चोखामेळ्यापैकी झालेल्या ख्रिस्ती भाविकांच्या गोऱ्यागोमट्या तरुण मुलींबरोबर लग्नें लावून, भर चावडीपुढे उ8भे राहून माळ्याकुणब्यांस सांगत फिरतां कीं,–
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३० 

“आमच्या ब्राह्मण पूर्वजांनी जेवढे म्हणून ग्रंथ केले आहेत, ते सर्व मतलबी असून बनावट आहेत. त्यांत त्यांनी उपस्थित केलेल्या धातूंच्या किंवा दगडांच्या मूर्तीत कांहीं अर्थ नाही. हे सर्व त्यांनी आपल्या पोटासाठी पाखंड उभे केलें आहे. त्यांनी नुकताच पलटणीतील परदेशी लोकांत सत्यनारायण उपस्थित करून, आतां इतके तुम्हां सर्व अज्ञानी 8भोळ्या भाविक माळ्या कुणब्यांत नाचवू लागले आहेत. ही त्यांची ठकबाजी तुम्हांस कोठून कळणार? यास्तव तुम्ही या गफलति ब्राह्मणांचे ऎकून धातूच्या व दगडांच्या देवाच्या पूजा करूं नका. तुम्ही सत्यनारायण करण्याकरितां कर्जबाजारी होऊन ब्राह्मणाचे नार्दी लागू नका. तुम्ही निराकार परमात्म्याचा शोध करा, म्हणजे तुमचे तारण होईल.” असा, परंतु तुम्ही आम्हा या भितया माळ्याकुणब्यांस उपदेश करीत फिरण्यापेक्षां प्रथम आपल्या जातबांधवांचे आळ्यांनी जाऊन त्यांस सांगावें की, तुम्ही आपल्या सर्व बनावट पोथ्या जाळून टाका. माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकऱ्यांस खोटे उपदेश करून आपली पोटें जाळू नका," असा त्यांस वारवार उपदेश करून त्यांजकडून तसें आचरण करवू लागल्याबरोबर शेतकऱ्यांची सहज खात्री होणार आहे. दुसरें असें की, आम्ही जर तुम्हां पाद्रया ब्राह्मणांचे ऎकून आचरण करावें, तर तुमचच जातवाल सरकारी कामगार येथील गोज्य। कामगारांच्या नजरा चुकावून भलत्यासलत्या सबबी कटवून आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांबाळांची दशा करून सोडतील-इतक्यांत शेतकरी शुद्धीवर येतांच आपल्या मातुश्रीच्या गळ्यास मिठ घालून रडू लाछाला.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
आतां बाकी उरलेले एकंदर सर्व कंगाल, दीनदुबळे, रात्रंदिवस शेती खपून कष्ट करणारे, निव्वळ आज्ञानी, माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकऱ्यांच्या हल्लींच्या स्थितीविषयीं थोडेसें वर्णन करितों, तिकडेस सर्वानी कृपा करून लक्ष पुरविल्यास त्यांजवर मोठे उपकार होतील. बांधवहो, तुम्ही नेहमीं स्वतः शोध करून पाहिल्यास तुमची सहज खात्री होईल की, एकंदर सर्व लहानमोळ्या खेड्यापाड्यांसहित वाइयांनी शेतकऱ्यांचीं घरें, दोन तीन अथवा चार खणांची कवलारू अथवा छपरी असावयाचीं. प्रत्येक घरांत चुलीच्या कोपण्यांत लोखंडी उत्ञथणे अथवा खुरपें, लांकडी काथवट व पुंकणी, भाणुशीवर तवा, दुधाचे मडकें व खालीं आळ्यांत रांधणाऱ्या खापरी तवल्या, शेजारी कोपऱ्यांत एखादा तांब्याचा हंडा, परात, काशाचा थाळा, पितळी चरवी अथवा वाटी, नसल्यास जुन्या गळक्या तांब्याशेजारीं मातीचा मोखा, परळ व जोगल्या असावयाच्या. त्यालगत चारपांच डेऱ्यामडक्यांच्या उतरंडी जयांत थोडे थोडे साठप्याला खपले, हुलण, मटको, तुरीचा कणुरा, शवया भुईमुगाच्या शेंगा, भाजलेल्या हुळा, गव्हाच्या ऑब्या, सांडगे, बिबड्या, मीठ, हळकुंडें, धने, मिरी, जिरें, बोजवार, हिरव्या मिरच्या, कांदे, चिंचेचा गोळा, लसूण, कोथिंबीर असावयाची. त्याचेलगत खाली जमिनीवर काल संध्याकाळी, गोडबोल्या भट पेनशनर सावकाराकडून, व दिढीनें जुन जोंधळे आणलेले. तुराठ्यांच्या पाट्या भरून त्या भिंतीशी लावून एकावर एक रचून ठेवलेल्या असावयाच्या. एके बाजूला वळणीवर गोधड्या, घोंगड्यांची पटकुरें व जुन्यापान्या लुगड्यांचे धड तुकड आडवेउभे दंड घालून नेसण्याकरितां तयार केलेलें धडपे, भिंतीवर एक लांकडाची मेख ठोकून तिजवर टांगलेल्या चिध्याचांध्याच्या बोचक्यावर भुसकट व गॉवन्या वहावयाचीं जाळ, दिव्याच्या कोनाड्यांत तेलाच्या गाडग्याशेजारीं फणी व कुंकाचा करंडा, वरतीं माळ्यांवर गोंवण्या व तीनधारी कुदळ, कुन्हाड, खुरपें, कुळवाची फास, कोळण्याच्या गोल्हया, जातें, उखळ, मुसळ व केरसुणीशेजारीं थुकावयाचे गाडगें असावयाचे. दरवाज्याबाहेर डावे बाजूला खापरी रांजणाऱ्या पाणईवर पाणी वहावयाचा डेरा व घागर असून पलीकडे गडगळ दगडाची उघडी न्हाणी असावयाची. उजवे बाजूला बैल वगैरे जनावरें बांधण्याकरिता आढेमेढी टाकून छपरी गोठा केलेला असावयाचा. घरांतील सर्व कामकाजांचा चेधा उपसून पुरुषांच्या पायांवर पाय देऊन दिवसभर शेती काम उरकू लागणाऱ्या बायकोच्या अंगावर सुताडी धोटा बांड व चोळी, हातांत रुप्याचे पोकळ गोठ व ते न मिळाल्यास कथलाचे गोठ नि गळ्यांत मासा सवामासा सोन्याचे मंगळसूत्र, पायाच्या बोटांत चटचट वाजणारी काशाचीं जोडवीं, तोंडभर दांतवण, डोळेभर काजळ आणि कपाळभर कुंकू, याशिवाय दुसन्या शृंगाराचे नांवानें आंवळ्याएवढे पूज्य. उघडी नागडी असून अनवाणी सर्व दिवसभर गुराढोरांच्या वळत्या करीत फिरणाऱ्या मुलांच्या एका हातांत रुप्याची कडीं करून घालण्याची ऐपत नसल्यामुळ त्यांच्याऐवजीं दोन्ही हातांत कथलाचीं कडीं व उजव्या कानांत पितळेच्या तारेंत खरड्यांच्या बाळ्या. याशिवाय अंगावर दुसन्या अलंकाराचे नांवानें शिमगा. हिंवावाच्यांत व उन्हातान्हांत रात्रंदिवस शेतीं खपणाऱ्या शेतकऱ्याचे कंबरेला लुगड्यांचे दशांचा करगोटा, खाठीची लंगोटी टोपीवर फाटकेसे पागोटें, अंगावर साधे पंचे न मिळाल्यास घोंगडी व पायांत ठिगळे दिलेला अथवा दोरीने आवळलेल्या जोड्यांशिवाय बाकी सर्व अंग सळसळीत उघडेंबंब असल्यामुळे, त्याच्यार्ने अतिशय थंडीपावसाळ्यांत हंगामशीर शेती मेहनत करवत नाही.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
त्यांतून तो अक्षरशून्य असून त्यास सारासार विचार करण्याची बिलकुल ताकद नसल्यामुळे तो धूर्त भटांच्या उपदेशावरून हरीविजय वगैरे निरर्थक ग्रंथांतील भाकडकथेवर विश्वास ठेवून पंढरपूर वगैरे यात्रा, कृष्ण व रामजन्म व सत्यनारायण करून अखेरीस रमूजीकरीता शिमग्यांत रात्रंदिवस + + मारतां मारता नाच्यापोराचे तमाशे ऐकण्यामध्ये आपला वेळ थोडा का निरर्थक घालवितो? त्यास मुळापासून विद्या शिकण्याची गोडी नाही व तो निवळ अज्ञानी असल्यामुळे त्यास विद्येपासून काय काय फायदे (A Sepoy Revolt, by Henry Mead, page 293.) होतात, हें शेतकऱ्याच्या प्रत्ययास आणून देण्याचेऎवजी शेतकऱ्यांनी विद्या देण्याची कडेकोट बंटी केली होती. तशी जरी दुष्टबुद्धी आमचे हल्लीचे सरकार दाखवीत नाहीत; तरी त्यांच्या बाहेरील एकंदर सर्व वर्तणुकीवरून असे सिद्ध करितां येईल कीं, शेतकऱ्यांस विद्वान करण्याकरिता विद्याखात्याकडील सरकारी कामगारांचे मनांतून खरा कळवळा नाही. कारण आज दीनतागाईत विद्या देण्याच्या निमित्तानें सरकारनें लोकल फंड द्वारें शेतकऱ्यांचे लक्षावधी रुपये आपल्या घशांत सोडले असून, त्या ऐवजाच्या मानाप्रमाणे आजपावेतो त्यांच्याने शेतकऱ्यांपैकी एकालासुद्धा कलेक्टरची जागा चालाविण्यापुरती विद्या देण्यांत आली नाही. कारण खेड्यापाड्यांतील एकंदर सर्व शाळांनी भट ब्राह्मण (A Sepoy Revolt by Henry Mead, page 288.) शिक्षकांचा भरणा, ज्यांची किंमत चिखलमातीचा धंदा करणाऱ्या बेलदार कुम्भारांपेक्षा कमी, ज्यांस शेतकऱ्यांच्या नांगरांच्या मुठी कोणीकडून धरावायाच्या, याविषयी बिलकुल माहिती अंगी, आम्ही सर्व मानव प्राण्यांत श्रेष्ठ, म्हणून गर्वाचा ताठा मिरवणाऱ्या मगरूर शिक्षकांकडून त्यांच्या पूर्वजांनी सर्वोपरी नीच केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांस शिस्तवार व सोईची विद्या देववेल तरी कशी? कोठे जेव्हां त्यांस शहरगांवी चाकऱ्या मिळण्याचे त्राण उरत नाही, तेव्हां ते विद्याखात्यांतील ब्राह्मण कामगारांचे अर्ज करून खेड्यापाड्यांनी पंतोजीच्या चाकऱ्या करून कशी तरी आपली पोटे जाळीतात. परंतु कित्येक शेतकऱ्यांचा, खेड्यापाड्यांनी शेतावर गुजारा न झाल्यामुळे ते तेथे उपाशी न मरतां परागंदा होऊन मोठमोठ्या शहरांनी पाहिजेल त्या मोलमजुन्या करून पोटें भरीत असतां, त्यांतून फारच थोड्या शेतकऱ्यांची मुलें कांही अंशीं नांवाला मात्र विद्वान झाली आहेत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. ३१ 

तथापि एकंदर सर्व सरकारी खात्यांनी ब्राह्मण विद्वानांचा युरोपियन गोप्या कामगारांवर पगडी पडल्यामुळे हीं शेतकऱ्यांची सTडसात तुटपुंजी विद्वान मुलें, आपल्या इतर अज्ञानी शेतकरी जातबांधवांचा सत्यानाश सरकारे ब्राह्मण कामगार कसा करितात, तो सर्व बाहेर उघडकीस आणून सरकारचे कानावर घालण्याविषयी आपल्या गच्च दांतखिळी बसवून, उलटें ब्राह्मणांचे जिवलग शाळूसोबती बनून त्यांनीं उपस्थित केलेल्या सभानीं त्यांबरोबर सरकारच्या नांवानें निरर्थक शिमगT करूं लागतात.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
अशी सोंगें जर ब्राह्मणांबरोबर न आणावीत, तर ते लोक आपल्या पुस्तकांसह वर्तमानपत्रांनी यांच्याविषयीं भलत्यासलत्या नालस्त्या छापून यांजवर कोणत्या वेळी काय आग पाखडतील व याशिवाय, मामलेदार, शिरस्तेदार, माजीस्ट्रेट, इंजिनियर, डाक्टर,, न्यायाधीश वगैरे ब्राह्मण कामगार असून अखेरीस सरकारी रिपोर्टर जरी, धर्मानें खिस्ती तथापि हाडाचा ब्राह्मण, या एकंदर सर्व ब्राह्मण कामगारांचा सरकारी खात्यांनीं भरणी असल्याकारणामुळे, ते या तुटपुंज्या साडेसातीस आपलाल्या कचेन्यांनी भलत्या एखाद्या सबबीवरून उभे न करितां, एखादे वेळी त्यांचा डाव साधल्यास यांच्या पोटावर पाय देतील, या भयास्तव हे आपल्या मनांतून ब्राह्मण कामगारांचे नांव ऎकल्याबरोबर टपटपा लेंड्या गाळितातः इतकेंच नव्हे, परंतु कित्येक विद्वान भटब्राह्मण सोवळ्याओवळ्याचा विधिनिषेध न करितां या साडेसाती चोंबड्या शूद्र विद्वानांच्या उरावर पाय देऊन विलायतेस जाऊन परत आल्याबरोबर पुनः यांच्यासमक्ष आपल्या जातीत मिळून वावरत आहेत. तथापि या साडेसात शेळीच्या गळ्यांतील गलोल्या, आपल्या अज्ञानी आप्तबांधव शेतकऱ्यांसमोर निर्लज्ज होऊन भटब्राह्मणांस आपले घरीं उलटे बोलावून, त्यांच्या हातून नानाप्रकारचे विधी करून त्यांच्या पायांचीं तीर्थे प्राशन करितात, या कोडगोपणाला म्हणावें तरी काय? कदाचित सरकारी ब्राह्मण कामगारांचे आश्रयावांचून यांचीं पोटें भरत नाहीत म्हणून म्हणावें, तर गांवांत थोडी का + + पोट भरितात ! !
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya

पुढील पान..


महात्मा फुलेंचे संपूर्ण साहित्य अॅप स्वरुपात येथे उपलब्ध आहे..

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.