शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले
पान क्र. २३
जे आपल्या विपत्तीत आसपासच्या जंगलांतील गवत लांकूडफांटा व पानफुलांवर गुराढोरांची व आपली जतणुक करीत असत, ती सर्व जगलें सरकारनें आपल्या घशांत सोडली, त्यांच्या कोंड्याभोंड्याच्या भाकरीबरोबर तोंडी लावण्याच्या मिठावरसुद्धां भली मोठी जकात बसविली आहे. तसेच शेतकऱ्याचे शेतांत भरपूर पाणी असल्यानें त्यांच्या जितराबाचा बचाव होऊन त्यास पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळावें, असा वरकांति भाव दाखवून, आंतून आपल्या देशबांधव युरोपियन इंजिनीयर कामगारांस मोठमोठे पगार देण्याचे इराद्यानें, युरोपांतील सावकारांस महामूर व्याज देण्याचा हेतु मनीं धरून त्यांचे कर्ज हिंदुस्थानच्या बाडक्यावर वाढवून, त्या कर्जापैकी लक्षावधि रुपये खर्ची घालून जागोजाग कालवे बांधिले आहेत. व त्या कालव्यांतील पाण्याची किंमत अज्ञानी शेतकऱ्यांपासून मन मानेल तशी घेऊन, त्यांच्या शेतांत वेळच्या वेळी तरी पाणी देण्याविषयीं सरकारी कामगारांकडून बरोबर तजवीज ठेवली जाते काय? कारण या इरिगेशनखात्यावरील बेपर्वा युरोपियन इंजिनीयर आपली सर्व कामें ब्राह्मण कामगारांवर सोपवून आपण वाळ्याचे पडद्याचे आंत बेगमसाहेबासारखे ऎषआरामांत मर्जीप्रमाणे कामें करीत बसतात. इकडे धूर्त ब्राह्मण कामगार आपली हुशारी दाखविण्याकरितां इंजिनियर साहेबांचे कान फुंकून त्यांजकडून, पाहिजेल तेव्हां, पाहिजेल तसे जुलमी ठराव सरकारांतून पास करून घेतात. त्यांपैकी नमुन्याकरितां येथे एक घेतो. तो असा की:-वक्तशीर कालव्यांतील पाणी सरत्यामुळे शेतकऱ्यांची एकंदर सर्व जितराबांची होरपळून राखरांगोळी जरी झाली, तरी त्याची जोखीम इरिगेशन खात्याचे शिरावर नाहीं.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
अहो, जेथें हजारों रुपये दरमहा पगार घशांत सोडणाऱ्या गोऱ्या व काळ्या इंजिनीयर कामगारांस, धरणांत हल्ली किती ग्यालन पाणी आहे, याची मोजदाद करून तें पाणी पुढे अखेरपावेतों जेवढया जमिनीस पुरेल, तितक्याच जमिनीच्या मालकांस पाण्याचे फर्मे द्यावे, असा तर्क नसावा काय? अहो, या खात्यांतील कित्येक पाणी सोडणाऱ्या कामगारांचे पाण्यासाठी अर्जव करितां शेतकऱ्यांचे नाकास नळ येतात. अखेर, जेव्हां शेतकऱ्यांस त्याजकडून पाणी मिळेनासें होतें, तेव्हां शेतकरी त्यांचेवरील धूर्त अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यास गेले की, पाण्याचे ऎवजीं शेतकऱ्यांवर मगरुरीच्या भाषणांचा हल्ला (हा आरोप आमचे लोकप्रिय नि:पक्षपाती मि. विश्वनाथ दाजीसारखे जे कित्येक गृहस्थ असतील त्यांस लागू नाही. असे निमळ मनाचे पुरुष सरकारी ब्राह्मण कामगारांत थोडे सांपडतात.) मात्र होतो. अशा या न्यायीपणाचा डौल मिरविणाऱ्या सरकारी चाकरांनीं, कर्जबाजारी दुबळ्या शेतकऱ्यांपासून पाण्याचे भरपूर दाम घेऊन, त्यांच्या पैशापुरतें भरपूर पाणी देण्याचे ऐवजी, आपल्या उंच जातीच्या तोन्यांत शेतकऱ्यांशी मगरुरीची भाषणे करणे, या न्यायाला म्हणावें तरी काय? सारांश, आमचे न्यायशील सरकार आपले हाताखालच्या ऎषआरामी व दुसरे धूर्त कामगरांवर भरोसा न ठेवितां शेतकऱ्यांचे शेतास वेळच्या वेळी पाणी देण्याचा बंदोबस्त करून, पाण्यावरचा दर कमी करीत नाहीत, म्हणून सांप्रत काळ शेतकऱ्यांचीं दिवाळीं निघून सरकारांस त्यांच्या घरादारांचे लिलांव करून, ते सर्व पैसे या निर्दय कामगाराचे पदरी आंवळावे लागतात. यास्तव आमचे दयाळू सरकारांनी दर एक शेतकऱ्याच्या शेताच्या पाण्याच्या मानाप्रमाणे प्रत्येकास एकेक तोती करून द्यावी, जिजपासून शेतकऱ्यांस जास्त पाणी वाजवीपेक्षां घेतां न यावें. आणि तसे केलें म्हणजे पाणी सोडणारे कामगारांची सरकारास जरूर न लागतां, त्यांच्या खर्चाच्या पैशाची जी बच्यत राहील, ती पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांस पाणी घेण्याचे दर कमी करण्याचे कामीं चांगली उपयोगी पडेल. व हल्लीं जो आमचे विचारी सरकारांनीं पाण्यावरचे दर कमी करण्याचा ठराव केला आहे, तो “इरीनोशन” खात्यास एकीकडे ठेवण्याचा प्रसंग टाळतां येईल.
तसेंच अज्ञानी शेतकऱ्यांचे मागें आताशीं लोकल फंडासारखा नवीन एक दुसरा म्युनिसिपालिटीचा जबरदस्त बुरदंडा योजून काढिला आहे. तो असा की, शेतकऱ्यांनी शेतांत तयार करून आणिलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरांत आणितेवेळीं त्या सर्व मालावर म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्यांस सर्वोपरी नाडिते. कधी कधीं शेतकऱ्यांने गाडीभर माळवें शहरांत विकण्याकरितां आणिल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारांत जास्तीकमती वजनानें घेणारे देणारे दगेबाज दलालाचे व म्युनिसिपालिटीचे जकातीचे भरीस घालून गाडीभाडें अंगावर भरून, त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो. अहो, एकट्या पुणे शहरांतील म्युनिसिपालटीचे आतांच वार्षिक उत्पन्न सांगली संस्थानचे उत्पन्नाची बरोबरी करूं लागले. त्याचप्रमाणे मुंबईतल टोलेजंग म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नाचे भरीस पंतसचिवासारखीं दहाबारा संस्थानें घातली, तरी तो खडडा भरून येणे नाही. यावरून “उपरकी तो खूप बनी और अंदरकी तो राम जणी” या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे प्रसंग गुजरला आहे. जिकडे पहावें तिकडे दुतफी चिरेबंदी गटारें बांधलेले विस्तीर्ण रस्ते, चहूंकडे विलायती खांबांवर कंदिलांची रोषणाई, जागोजाग विलायती खापरी व लोखंडी नळांसहित पाण्याच्या तोट्या, मुत्र्या, कचऱ्याच्या गाड्या वगैरे सामानांचा थाट जमला आहे.
तसेंच अज्ञानी शेतकऱ्यांचे मागें आताशीं लोकल फंडासारखा नवीन एक दुसरा म्युनिसिपालिटीचा जबरदस्त बुरदंडा योजून काढिला आहे. तो असा की, शेतकऱ्यांनी शेतांत तयार करून आणिलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरांत आणितेवेळीं त्या सर्व मालावर म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्यांस सर्वोपरी नाडिते. कधी कधीं शेतकऱ्यांने गाडीभर माळवें शहरांत विकण्याकरितां आणिल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारांत जास्तीकमती वजनानें घेणारे देणारे दगेबाज दलालाचे व म्युनिसिपालिटीचे जकातीचे भरीस घालून गाडीभाडें अंगावर भरून, त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो. अहो, एकट्या पुणे शहरांतील म्युनिसिपालटीचे आतांच वार्षिक उत्पन्न सांगली संस्थानचे उत्पन्नाची बरोबरी करूं लागले. त्याचप्रमाणे मुंबईतल टोलेजंग म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नाचे भरीस पंतसचिवासारखीं दहाबारा संस्थानें घातली, तरी तो खडडा भरून येणे नाही. यावरून “उपरकी तो खूप बनी और अंदरकी तो राम जणी” या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे प्रसंग गुजरला आहे. जिकडे पहावें तिकडे दुतफी चिरेबंदी गटारें बांधलेले विस्तीर्ण रस्ते, चहूंकडे विलायती खांबांवर कंदिलांची रोषणाई, जागोजाग विलायती खापरी व लोखंडी नळांसहित पाण्याच्या तोट्या, मुत्र्या, कचऱ्याच्या गाड्या वगैरे सामानांचा थाट जमला आहे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
परंतु पूर्वीचे राजेरजवाडे जरी मूर्तिपूजक असून इंग्रज लोकांसारखे विद्वान नव्हते, तरी त्यांनी आपल्या रयतेच्या सुखसंरक्षणाकरितां मोठमोठ्या राजमार्गाचे दोन्ही बाजूंनी झाडें, जागोजाग गांवकुसू पूल, बहुतक ठिकाणीं, भुईकोट, किल्ले व गढ़या, कित्येक ठिकाणी धरणे, कालवे, विहिरी, तलाव व अहमदनगर, औरंगाबाद, विजापूर, दिल्ली, पुणे वगैरे शहरांतून मजबूत पाण्याचे नळ, हौद, देवालयें, मशिदी व धर्मशाळा, मोन्या, पाणपोई वगैरे सरकारी खजिन्यांतील द्रव्य खर्ची घालून तयार केल्या होत्या. हल्लीचे आमचे महातत्त्वज्ञानी खऱ्या एका देवास भजणारे इंग्रज सरकार बहादर, म्युनिसिपालिटीचे द्वारें अन्य मार्गानें रयतेचे द्रव्य हरण करून, त्या द्रव्यापासून सदरची कामें पुरीं करू लागल्यापासून, आंतून रयतेस दिवसेंदिवस प्रामाणिकपणाने चरितार्थ चालविण्याचे सामर्थ्य कमी कमी होत चालल्यामुळे त्यांस दुर्गुणावलंबन करण्याचे हें एक प्रकारचे शिक्षणच देत आहे. तशांत हल्ली अशा सुबत्तेचे काळांत चार (Journal of the East India Association, No. 3, vol. VII, page 124) कोट रयतेस दिवसांतून दोन वेळा पोटभर अन्न मिळत नाही व ज्यांस भुकेची व्यथा अनुभवल्यावांचून एक दिवससुद्धां सुना जात शेतांवर वाजवी शेतसारा स्थायिक करून, त्यांस विद्वान करून शेतक्रीसंबंधीं ज्ञान दिलें म्हणजे ते पेशवे (A Sepoy Revolt by Henry Mead, pages 133 and 134.), टोपे, खाजगीवाले, पटवर्धन, फडके वगैरे निमकहरामी बंडखोर ब्राह्मणांचे नादी लागून, आपल्या प्राणास मुकणार नाहींत. शिवाय या देशांत इंग्रजाचे राज्य झाल्यादिवसापासून इंग्लंडांतील विद्वान कसबी लोक आपल्या अकलेच्या जोरानें यंत्रद्वारें तेथे तयार केलेला माल, येथील सर्व अक्षरशून्य ढोरामांगांपासून तो लोहार व विणकरांचे पोटावर पाय देऊन, त्यांजपेक्षा स्वस्त विकू लागले. यास्तव येथील तांदूळ, कापूस, अळशी, कातडी वगैरे मालाचा खप इकडे न जाहल्यानें तो माला इंग्लंडांतील व्यापारी पाहिजे त्या दरानें स्वस्त खरेदी करून, विलायतेंतील कसबी लोकांस विकून त्याच्या नफ्यावर कोट्याधीश बनले आहेत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
सारांश या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे केलेला खर्चसुद्धा उभा राहणेची मारामार पडते. तेव्हां ते मारवाड्यांपासून कर्ज काढून सरकारी पट्टी देतात. व याविषयीं बारीक चौकशी करण्याकरितां नेमलेल्या ऎषआरामांत गुंग असणाऱ्या व संध्यासोवळ यामध्यें निमग्न असणाऱ्या भट सरकारी कामगारांस फुरसत तरी सांपडते काय? त्यांतून इकडील कित्येक मोठ्या आडनांवाच्या सभांतील सरकारी चोंबड्या नेटिव्ह चाकरांनीं “शेतकरी लोक लग्नकार्यनिमित्त्यानें बेलगामी खर्च करितात म्हणून ते कर्जबाजारी झाले आहेत,” अशी लटकीच पदरची कंडी उठविल्यावरून, महासमुद्राचे पलीकडील आमच्या महाज्ञानी, चार चार घोड्यांच्या चारटांत बसून फिरणाऱ्या मेंढपाळ स्टेट सेक्रेटरीस, शेतकऱ्यांचे पोकळ ऐश्वर्य जेव्हां पाहवेना, तेव्हां त्यांनी तेथील कसबी लोकांनी तयार केलेल्या विलायती जिनसांवर अजीबात जकात काढून टाकली. येथे त्यांनी आपल्या शहाणपणाची कमाल केली त्यांनी आपले बडेबडे सावकारांस सालदरसाल सुमारें पांच कोट रुपये व्याज देण्याविषयीं मनांत काडीमात्र विधिनिषेध न आणतां, येथील कायदेकौन्सिलचे द्वारें ज्या लोकांस गरीबीचा इंगा बिलकुल ठाऊक नाही, अशा ऎषआरामी युरोपियन व सोंवळ्या नेटिव्ह जज्जांकडून गरीब बापड्या तुटपुंज्या सावकाराचे अजीबाद व्याज खुटविण्याचे सोंग उभें करविले आहे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. २४
अहो, सरकारचे मनांत जर आम्हां कंगाल शेतकर्यांविषयी खरोखर कळवळा आहे, तर ते आपले विलायती सावकारांचे एक अर्व रकमेचे व्याज अजीबाद बंद कां करीत नाहीत? आणि तसे केल्याबरोबर शेतकल्यांचे पाय कसे थारी लागत नाहींत, हें पाहूं লী? परंतु 3नामच्या सरकारनें मध्येंच एखाठी नवीन मोहीम परदेशांत उपस्थित करून तिकडे ही वांचविलेली एकम खर्ची घालू नये, म्हणजे त्यांच्या न्यायीपणाची चहूंकडे वाहवा होईल व मे. वेडरबर्नसाहेबासारख्या परोपकारी, उदार पुरुषांनी प्रथम आपल्या विलायती सरकारांचे व्याज अजिबाद कमी करण्याविषयी सरकारची चांगली कानउघाडणी करण्याचे काम एकीकडे ठेवून, अशा नव्या ब्यांकी उपस्थित करण्याचे नादी लागून शेतकऱ्याचे माथ्यावर अपेशाचे खापर फोडू नये. कारण त्यापासून कोणत्याही पक्षाचे हित होणे नाहीं, इतकेंच नव्हे परंतु याशिवाय आमचे गव्हरनर जनरलसाहेबांनी एकंदर सर्व लष्करी, न्याय, जंगल, पोलीस, विद्या वगैरे लहानमोठ्या सरकारी खात्यांतील शंभर रुपयांचे पगारावरील कामगारांचे पगार व पेनशनी कमी करण्याविषयी आपल्या मुख्य विलायती सरकारास शिफारस करून, त्याविषयीं बंदोबस्त केल्याविना, शेतकऱ्यांस पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळून त्यांचे कपाळचा कर्जबाजारीपणा सुटणार नाहीं. शेतकऱ्यांनी आपल्या बायकांमुलांसह रात्रंदिवस शेतांत खपावें, तरी त्यास शेतसारा व लोकल फंड वारून आपल्या कुटुंबांतील टर माणशीं दरमहा तीन तीन रुपयेही पडत नाहीत; आणि साधारण युरोपियन व नेटीव्ह सरकारी कामगारांस दरमहा पंधरा रुपये नसत्या किरकोळ खर्चास व दारुपाण्याससुद्धां पुरत नाहीत. मग कलेक्टर वगैरे कामगारांसारख्या नबाबांचे येथील बेलगामी किरकोळ खर्चाविषयी गोष्ट काढल्यास आमचे कोण ऎकतो? यास्तव आपण, येथील एक आठ बैली कुणबाया ओढणारा शूद्र शेतकरी असून त्याचे चारपांच कर्ते मुलगे आहेत व ज्याचे कुटुंबांतील सुनाबाळ एकापेक्षां एक अधिक एकमेकांच्या पायावर पाय देऊन चढाओढीनें, घरीं व शेती, रात्रंदिवस खपणाऱ्या आहेत व जो ब्राह्मण, गुजर युरोपियन पलटणीतील साधारण गोच्या सोजराच्या स्थितीशी सूक्ष्म रीतीनें तुलना करून पाहिली असतां, त्यामध्यें काशीरामेश्वरापेक्षांही जास्ती अंतर दिसून येतें.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
इकडे शूद्र शेतकरी लंगोटी नेसून करगुट्याला चुनातंबाखूची गुंतविलेली बटवी, डोईवर चिंध्यांचे पागोटें, उघडाबंब, अनवाणी, हातांत नांगराची मूठ धरून भर कडक उन्हामध्यें सर्व दिवसभर, शिपलेवजा नोकदार धसकटांनी युक्त अशा खरबरीत ढेकळांतून आठ बैलाशी झटे घेतां घेतां गीत गाऊन नांगर हांकीत आहे; तिकडे गोरा शिपाई पायांत पाटलोन, अंगांत पैरणीवर लाल बनाती डगलें, डोईवर कलाबूतचा कशीदा काढलेली नखरेदार टोपी, पायांमध्यें सुती पायमोज्यावर विलायती वजविलेल्या मजबूत मऊ कातड्याचा बूट, कंबरेवर कातड्याचें तोस्तान व खांद्यावर चापाची बंदूक घेऊन, दररोज सकाळ अथवा सायंकाळीं हवाशीर मैदानांत तास अर्धा तास परेडीची कसरत करीत आहे. इकडेस शूद्र शेतकऱ्यांचा पिढीजादा दरबारी पोशाख म्हटला म्हणजे, जाडाभरडा खादीचा दुहेरी मांडचोळणा, बंडी, पासोडी, खारवी पागोटें आणि दोरीनें आळपलेला गांवठी जोडा, ज्यांची निहारी व दुपार संध्याकाळचे जेवण जोंधळे, नाचणीची किंवा कोंड्याभोंड्याच्या भाकरी, वा गाजरेरताळांची वरु, कालवण आमटी अथवा बोंबलाचे खळगुट, तेंही नसल्यास चटणीच्या गोळ्याशिवाय भाकरीवर दुसरें कांहीं मिळावयाचे नाहीं. चटणी भाकर कां होईना, परंतु ती तरी वेळच्या वेळी व पोटभर त्यास मिळते काय? राहतें घर बैलांच्या गोठ्याशेजारी असून ज्याच्या उशापायथ्याशीं तीन्ही वासरें, पारडीं अथवा कर्डे बांधलेली असल्यामुळे घरांत चहूंकडे मुतारीची उबट घाण चालली आहे, फाटके पटकूर व मळकट गोधडीचे अंथरूण पांघरूण, सर्व गांवच्या म्हशी पाण्यांत बसून बसून खराब झालेल्या डोहाचे खालचे बाजूस उकरलेल्या डहुर्यांतील पाणी पिण्याचे गांवांतील खिडार तेंच त्यांचा शेतखाना, तशांत मोडशी होऊन त्यास जाळताप आल्यास चांगल्या औषधी व त्यांचा माहीतगार डॉक्टराच्या नावानें आंवळ्याएवढे पूज्य, याशिवाय सरकारी शेतसारा वगैरे फंड व पट्या कोठून व कशा द्याव्यात, यासंबंधीं त्यांच्या उरावर कटार टांगलेली असते, अशा अभागी शेतकऱ्यांची अक्कल गुंग होणार नाही, असें एखाद्या वाकबगार गोऱ्या अथवा काळ्या डाक्टराच्यार्ने छातीस हात लावून म्हणवेल काय? तिकडे सरकार विलायतेहून गोऱ्या शिपायांच्या पोषाकाकरितां उंच कपडे, बनाती, रुमाल, पायमोजे, बूट खरेदी करून आणवितें, सरकार त्यांच्या खाण्यापिण्याकरितां उत्तम गहूं, तांदूळ, डाळ, निकोपी तरुण गाया, शेळ्या व मेंढ्यांचे मांस, विलायती पोरटर वगैरे अंमली दारू, निर्मळ तेल, तूप, दूध, साखर, चहा, मीठ, मिरच्या, गरम मसाला, सुरी, कांटा वगैरे सामान येथे खरेदी करून, रिवस्ती अचान्याकडून तीन वेळां ताजा पाक सिद्ध करवून त्यास वेळचे वेळीं आयतें जेऊं घालितात.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
पान क्र. २५
त्यास राहण्याकरितां लाखों रुपये खर्ची घालून सरकारनें दोन मजली टोलेजंग बराकी बांधल्या आहेत. जीमध्यें लोखंडी खाट, बिछान्यावर उशी, पलंगपोसासह धाबळीची सोय केली असून वरती रोषणाईसाठी हंडी लोंबत आहे. बराकीचे अंगणांत स्नानाकरिता न्हाणी करून तीजमध्ये “फिल्टर” केलेले पाण्याची तोटी सोडली आहे. त्याच प्रमाणे स्वच्छ सोयीचे शौचकूप केलेंच आहे. तशांत अजीर्णामुळे किंचित खोकला किंवा ताप आला की, त्यांच्या जिवासाठी दवाखाना तयार केलेला असून त्यामध्यें शेकडों रुपये किंमतीचीं औषधे, शस्त्रे वगैरे ठेवून त्यावर हजारों रुपये दरमहा पगाराच्या डाक्टराची नेमणूक करून, त्यांच्या तैनातीत डोलीसुद्धां हमाल दिलेले आहेत.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
याशिवाय त्यास देण्यामागण्याची काळजी नसून, घर, शेतखाना, झाडू, पाणी, रस्ता, शेत व लोकलफंड पट्टी वगैरे देण्याची ददात नसून, असमानी व टोळ्यांच्या सुलतानीविषयी बिलकूल काळजी नाही आणि यावरूनच आपण सॉवळ्यांतील नेटिव्ह कामगारांस धि:कारानें म्हणतो कि, पहा हा नेटिव्ह कामगार, ऐशआरामी युरोपिअन कामगारांचे पुढे पुढे करून अन्यानी शेतकऱ्यांपासून लांच खाऊन कसा सोजरासारखा लाल गाजर पडला आहे. काय हा उधळेपणा ! याला म्हणावें तरी काय? यास्तव आमचे डोळे झांकून निराकार परमात्म्याची प्रार्थन करणाऱ्या, विलायती सरकारानें येथील धूर्त ब्राह्मणांनी उपस्थित केलेले समाजांच्या व वर्तमानपत्रांच्या गुलाबी लिहण्यावर बिक्कुल भरंवसा न ठेवितां, एकंदर सर्व आपल्या सरकारी खात्यांतील गोऱ्या व काळ्या कामगारांस वाजवीपेक्षा जास्ती केलेले पगार अजीबाद कमी करून, अज्ञानानें गांजलेल्या दुबळ्या शुद्र शेतकऱ्यास विद्यादान (A Sepoy Revolt by Henry Mead, pages 280, 81, 82, 83, 85 and 86.) देऊन त्यांच्या बोडक्यावरील शेतसारा, टोल वगैरे पट्या कमी न केल्यास, थोड्याच कालांत या जुलमाचा पारणाम फार भयंकर होणार आहे, असें आमच्या ऐषआरामी उधळ्या सरकारचे कानात सांगून या प्रसंगी पुरे करितो.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.