Sunday, 6 August 2017

प्रकरण तिसरे : (भाग १)

शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले
पान क्र. १५ 

आर्य ब्राह्मण इराणांतून कसें आले व शूद्र शेतकरी यांची मूळ पीठिका व हल्लींचे आमचे सरकार, एकंदर सर्व आपले कामगारांस मन मानेल तसें पगार व पेनशने देण्याचे इराद्याने नानाप्रकारचे नित्य नवे कर शेतकऱ्यांचे बोडक्यावर बसवून, त्यांचे द्रव्य मोठ्या हिकमतीने गोळा करू लागल्यामुळे शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाले आहेत.

या सर्व अगम्य, अतर्क्य आकाशमय विस्तीर्ण पोकळीत नानाप्रकारचे तत्वांच्या संयोगवियोगाने अगणित सुर्यमंडले त्यांच्या त्यांच्या उपग्रहासह निर्माण होऊन लयास जात आहेत. त्याचप्रमाणे हरेक उपग्रह आपापल्या प्रमुख सूर्याच्या अनुरोधाने भ्रमण करीत असता एकमेकांच्या सानिध्यसंयोगानुरूप या भूग्रहावरील एकाच मातापितरांपासून एक मुलगा मूर्ख मुलगा शहाणा असे विपरीत जन्मतात. तर यावरून मूर्खपणा अथवा शहाणपणा हे पिढीजादा आहेत, असे अनुमान करिता येत नाही. तसेच स्रीपुरुषाचा समागम होण्याचे वेळी त्या उभयतांचे कफवातादी दोषात्मक प्रकृतीच्या मनाप्रमाणे व त्या वेळेस त्यांचं मनावर सत्ववरजादि त्रिगुणांपैकी ज्या गुणांचे प्राबल्य असते, त्या गुणांच्या महत्वप्रमाणाने गर्भपिंडाची धारणा होते. म्हणूनच एका आईबापाचे पोटी आणेल मुले भिन्न प्रकृतीची व स्वभावाची जन्मतात.असे जर न म्हणावे, तर इंग्लंडातील प्रख्यात गृहस्थांपैकी टामस पेन व अमेरिकन शेतकऱ्यांपैकी जार्ज वॉशिंग्टन या उभयतांनी शहाणपणा व शौर्य हि पिधीजाडा आहेत म्हणून म्हणणाऱ्या ख्यालीखुशाली राजेरजवाड्यांस आपआपले कृतीने लाजविले असते काय? शिवाय कित्येक अज्ञानी काळे शिपायी केवळ पोटासाठी कोर्ट मार्शलचे धाकाने काबुल व इजिप्टातील जहामर्दाशी सामना बांधून लढण्यामध्ये मर्दुमगिरी दाखवितात व त्याचप्रमाणे अमेरीकेतील समंजस विद्वानांपैकी पारकर व मेरीयनसारख्या कित्येकांनी जन्मतः केवळ शेतकरी असूनही स्वदेशासाठी परशत्रूशीं नेट धरून लढण्यामध्यें शौर्य दाखविलेली उदाहरणे आपलेपुढे अनेक आहेत.

यावरून जहामंर्दी अथवा नामर्दी पिढीजादा नसून ज्याच्या त्याच्या स्वभावजन्य व सांसर्गिक गुणावगुणांवर अवलंबून असते, असेंच सिद्ध होतें. कारण जर हा सिद्धांत खोटा म्हणावा, तर एकंदर सर्व या भूमंडळावरील जेवढे म्हणून राजेरजवाडे व बादशहा पहावेत, त्यापैकी कोणाचे मूळ पुरुष शिकारी, कोणाचे मेंढके , कोणाचे शेतकरी, कोणाचे मुल्लाने, कोणाचे खिजमतगार, कोणाचे कारकून, कोणाचे बंडखोर, कोणाचे लुटारू व कोणाचे मूळ पुरुष तर हद्दपार केलेले राम्युलस आणि रीमस आढळतात.त्यातून कुणाचाही मूळपुरुष पिढीजादा बादशहा अथवा राजा सांपडत नाही. आता डारविनच्या मताप्रमाणे, एकंदर सर्व सूर्यमंडळांतील ग्रहभ्रमणक्रमास अनुसरून वानर पशूज़ातीचा पालट होऊन त्यापासून नूतन व विजातीय मानवप्राणी झाले असावेत, म्हणून म्हणावे, तर ब्रह्मदेवाचे अवयवांपासून उत्पन्न झाले असावेत, म्हणून म्हणावे, तर ब्रह्मदेवाचे अवयवापासून उत्पन्न झालेल्या सृष्टीक्रसानुमतास बाध येतो.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. १६ 

यास्तव आतां आपण बौद्ध अथवा जैन मताप्रमाणे जुगलापासुन अथवा डारविनच्या मताप्रमाणे वानरापासून स्रीपुरुष उत्पन्न झाले, अथवा ख्रिस्तीi मताप्रमाणे देवाजीनें मृतिकेपासून मानव स्त्रीपुरुष उत्पन्न केले, अथवा आर्य ब्राह्मणांच्या मताप्रमाणे ब्राह्मणांच्या अवयवापासून चार जातीचे मानवी पुरुष निर्माण झाले असावेत, अशा प्रकारच्या सर्व निरनिराळ्या मतांविषयी वाताघाट करीत बसता, त्यांतून कोणत्याही एकाद्या मार्गाने मानवी स्त्रीपुरुष जातींचा जोडा अथवा जोडे निर्माण झाले असतील, व अशी कल्पना करून पुढे चालूं तरं प्रथम जेव्हां स्त्रीपुरुष निर्माण झाले असतील, तेव्हा त्यांस मोठमोठाल्या झाडांच्या खोडाशीं, त्यांचे ढोलीत अथवा डोंगराच्या कपारीत रात्रीस आराम करून आसपासच्या जंगलातील कंदमुळे व फळे यांवर आपले क्षुधेचा निर्वाह करावा लागला असेल व ते जेव्हां ऐन दुपारीं भलत्या एखाद्या झाडाच्या छायेंखाली प्रखरतर सूर्याच्या किरणांपासून निवारण होण्याकरितां क्षणभर विश्रांती घेत असतील, तेव्हा जिकडे तिकडे उंच उंच कडे तुटलेल्या पर्वत व डोंगराच्या विस्तीर्ण रांगा, गगनांत जणू काय, शुभ्र पांढऱ्या धुक्याच्या टोप्याच घालून उभ्या राहिलेल्या त्यांच्या दृष्टीस पडत असतील,

तसेंच त्यांच्या खालच्या बाजूंनी लहानमोठ्या दऱ्याखोऱ्यांच्या आसपास अफाट मैदानांत जुनाट मोठ मोठालें विशाल वड, पिंपळ व फळभारानें नम्र झालेले फणस, आंबे, नारळी, अंजीर,-पिस्ते, बदाम वगैरे फळझाडांची गर्दी होऊन, त्यांवर नानातऱ्हेच्या द्रक्षादि वेलींच्या कामानीवाजा जाळी बनून जागोजाग पिकलेल्या केळींच्या घडांसहित कमळे इत्यादी नानातऱ्हेची रंगीबेरंगी फुले लोंबत आहेत, त्यांच्या आसमंतात जमिनींवर नानाप्रकारच्या पानांफुलांचा खच पडून त्या सर्वांचा भलामोठा चित्रविचित्र केवळ गालिचाच बनून त्यावर जागोजाग तऱ्हेतर्हेच्या पानांफुलांनी घवघवलेलीं झाडें, जशीं काय आतांच नूतन लाविली आहेत की काय, असा भास झाला असेल. तसेंच एकीकडे एकीकडे एकंदर सर्व लहानमोठ्या झुत्र्या, खोंगळ्या, ओढे व नद्यांचे आजूबाजूचे वाळवंटावर खरबुजे,टरबुजे, शेंदाडी,काकड्या,खिरे वगैरे चहूंकडे लोळत पडलेले असून जिकडे तिकडे स्वच्छ निर्मळ पाण्याचे प्रवाह अखंडित खुळखुळ मंजुळवाणा शब्द करीत वहात आहेत.

आसपास लहानमोठ्या तलावांच्या जलसमुदायांत नानातऱ्हेच्या चित्रविचित्र रंगांच्या कमळांवरून भ्रमरांचे थव्याचे थवे गुंजारव करीत आहेत व जागोजाग तळ्यांच्या तटाकी जलतंतू आपल्या आटोक्यांत येताच त्यांना उचलून तोंडात टाकण्याकारेता बगळे एका पायावर बकध्यान लावून उभे राहिले आहेत. शेजारचे अरण्यांत,जिकडे पहावे तिकडे जमिनीवरून गरीब बिचारी हरणे, मेंढरे वगैरे श्वापदांचे कळपांचे कळप, लांडगे, व्याघ्र आदि करून दुष्ट हिंसक पशंपासून आपआपले जीव बचावण्याकरिता धापा देत पळत चालले आहेत व झाडांवर नाना प्रकारचे सुस्वर गायन करून तानसेनासही लाजविणारे कित्येक पक्षी, आपआपल्या मधुर, कोमल स्वरानें गाण्यांमध्ये मात करून चूर झाले आहेत, तों आकाशांत बहिरी ससाणे वगैरे घातक पक्षी त्यांचे प्राण हरण करण्याकरिता वरती घिरट्या घालून, अकस्मात त्यांजवर झडपा घालण्याचे संधानांत आहेत, इतक्यांत पश्चिमेकडचा मंद व शीतल वायु कधी कधी आपल्या वायूलहरींबरोबर नाना प्रकारच्या फुलपुष्पांच्या सुवासाची चहूकडे बहार करून सोडीत आहेत. हे पाहून आपल्या बुद्ध,ख्रिस्ती, मुसलमान, महार, ब्राह्मण वगैरे म्हणविणाऱ्या मानव बांधवांच्या मूळ पूर्वजांस किती आनंद होत असेल बरे! असो, परंतु त्यांस शस्रास्रे व वस्त्रेप्रावरणे तयार करण्याची माहिती नसल्यामुळे आपल्या दाढ्याडोयांच्या झिपऱ्या जटा लोंबत सोडून हातापायांची लांब लांब नखे वाढवून निव्वळ नागवे १ राहावे लागत असेल नाही बरे! ज्यांस मातीची अथवा धातूंची भांडी करण्याची माहिती नसल्यामुळे, पाण्याच्या कडेला गुडघेमेटी येऊन जनावरांप्रमाणे पाण्याला तोंड लावून अथवा हाताच्या ओंझळीने पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत नसेल काय? ज्यांस तवे व जाती घडण्याची माहिती नव्हती, अशा वेळीं भाकरीचपातीची गोडी कोठून ! ज्यांस मेंढराढोरांची कातडी काढण्याची माहिती किंवा सोय नसल्यामुळे अनवाणी चालावे लागत नसेल काय ? ज्यास बिनचूक शंभर अंकही मोजण्याची मारामार त्यास सोमरसाचे २ तारेंत यज्ञाचे निमित्तानें गायागुरें भाजून खाण्याची ३ माहिती कोठून ?



पान क्र. १७ 

सारांश तशा प्रसंगीं ते इतके अज्ञानी असतील की, जर त्यांचे समोर कोणी भांड व धुर्तांनी ताडपत्रावर खोदून लिहिलेल्या वेदाप्रमाणे ४ एखादे पुस्तक आणून ठेविले असते तर, त्यांनी ते हातांत घेऊन पाहतांच त्यांत कांहीं सुवास व रस नाही असें पाहून त्याची काय दशा केली असती, याविषयीं आतां आमच्याने तर्कसुद्धां करवत नाही. कारण ते स्वतः फलाहारी असल्यामुळे या निशाचरांनी केलेल्या वेदमतानुसार सोमरसाचे नादांत अगर पक्षश्राद्धाचे निमित्तानें दुसऱ्यांच्या गाया चोरून मारून त्यांच्याने खावविल्या नसत्या, आणि तसे करण्याची त्यांस गरजही नसेल. कारण ते इतके पवित्र असतील कीं, त्यांना या सर्व मतलबी ग्रंथकारांस आपले वंशज म्हणण्याचे आवडलें असतें काय? त्यांच्यापुढे यांच्याने “तूं बुद्ध", “तूं ख्रिस्ती”,“तू मुसलमान”, “तू महार म्हणून नीच” व “आम्ही ब्राह्मण म्हणून उंच आहोत” असें म्हणण्याची जुरत तरी झाली असती काय?

असो, पुढे कांहीं काळ लोटल्यावर आपल्या मुळ पूर्वजांची संतति जेव्हा जास्त वाढली, तेव्हां त्यांनी आपल्या नातूपणतूस राहण्याकरिता झाडांच्या फांद्यांची आढीमेढी उभ्या करून त्यावर नारळीच्या झांपांची शेकारणी करून पृथक कुटुंबाकरिता झोपड्या तयार करून त्यांच्या भोवताली चौगर्दा बाभळी अथवा करवंदीच्या फाट्यांचे कुंपण व आंत जाण्याच्यारस्त्यावर एक झोपा अथवा कोरड्या दगडांचा गांवकूस करून त्याला एक वेस ठेवून तिकडून रात्रीस रानांतीली दुष्ट जनावरे आंत येऊ नयेत, म्हणून तेथे त्यांनी रखवालीकरिता वेसकर रक्षकांच्या नेमणुका केल्यावरून आंतील एकंदर सर्व गांवकरी लोक आपापल्या मुलांबाळांसह सुखांत आराम करू लागले असतील व यामुळेच आपण सर्व गावकरी हा काळपावेतों आपआपल्या गांवांतील वेसकरांच्या श्रमाबद्दल दररोज सकाळीं व संध्याकाळीं त्यांस अर्ध्या चोथकोर भाकरीचे तुकडे देतों; आणि त्याचप्रमाणे हल्ली आपण सर्व गांवकरी लोक एकंदर सर्व पोलीसखात्यांतील शिपायांसहित मोठमोठ्या कामगारांस भाकरीच्या तुकड्याऐवजी पोलीसफंड देतों कां नाहीं बरें? या उभयतांत अंतर तें काय?
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


महाराचे हातांत काठीदोरी व पोलिसचे हातांत वाद्यांची टीकोरी. असो, इतक्यांत सदरच्या गांवी त्यांच्यात मुलाबाळांच्या क्षुल्लक अपराधावरून आपापसांत तंटेबखेडे उपस्थितीत झाल्यावरून व गांवातील सर्व लहानमोठे वडील जवळपास एखाद्या पाराचे छायेखाली बसून न्यायांती गुन्हेगारास शिक्षा करीत असतील. कारण त्या वेळीं आतांसारखें मोठमोठाली टाऊनहालें अथवा चावड्या बांधून तयारकरण्याचे ज्ञान त्यांस कोठून असेल? परंतु पुढे काही काळाने त्या सर्वांचीं कुटुंबे जसजशीं वाढत गेली असतील, तसतसें त्यांच्यात सुंदर स्त्रियांच्या व ते जंगलाच्या उपभोगाच्या संबधानेनाना प्रकारचे वादविवाद वारंवार उपस्थित होऊ लागले असतील व ते आपसांत जेव्हां गोडीगुलाबीने मिटेनात, तेव्हां त्यांपैकी बहुतेक सालस गृहस्थांनी आपआपले सामानसुमान व तान्ही मुले पाट्यांत घालून एकंदर सर्व आपल्या जथ्यांतील स्त्रीपुरुषांस बरोबर घेऊन दूर देशी निरनिराळे अंतरावर जाऊन जिकडे तिकडे गांवे बसवून त्यांत मोठ्या सुखाने व आनंदाने राहू लागल्यामुळे, प्रथम ज्या ज्या गृहस्थांनी हिय्या करून आपआपल्या पाट्या भरून दूरदूर देशीं जाऊन गांवे वसविली, त्या त्या गृहस्थांस बाकी सर्व गांवातील लोक पाटील अथवा देशमुख म्हणून, त्यांच्या आज्ञेत वागू लागले व हल्लीचे अज्ञानी पाटील व देशमुख जरी भटकुळकण्यांचे ओंझळीने पाणी पिऊन गांवकरी लोकांत कज्जे लढवितात, तरी एकंदर सर्व गांवकरी, त्यांच्या सल्लामसलतीनेच चालतात.

पान क्र. १८ 

दुसरें असें कीं, आपल्यामध्यें जेव्हां सोयरीकसंबंध करण्याचा प्रसंग येतो, तेव्हां आपणांस एकमेकांस विचारण्याची वहिवाट सांपडते.

ती अशी की,
“प्रश्न.-तुमचा गांव कोण आणि तुमचे आडनांव काय?
उ.-आमचा गांव पुणे आणि आमचे आडनाव जगताप.
प्र.- तर मग सासवडचे जगताप तुमचे कोण ?
उ.- सासवडचे जगताप आणि आम्ही एकच, सुमारे सातआठ डोया झाल्या, शेराचे काळांत आमची मूळपाटी सासवडहून पुण्याला आली व हल्लीं आम्ही आपल्या मुलाबाळांची जावळे सासवडास जाऊन करितो, कारण त्यांची आणि आमची सटवाई एक व त्यांचे आमचे देवदेवकही एक.
प्र.-तर मग तुमचा व आमचा सोईरसंबंध सहजासहज जमेल; कारण सासवडचे जगताप आमचे सोयरेधायरे आहेत; तुम्ही तिकडचा पदर मात्र जुळवून द्या म्हणजे झालें, मग तुमची आमची इतर बोलाचाली एका क्षणात करून लग्नचिठ्या ताबडतोब काढता येतील.” याप्रमाणे खरी हकिगत असून जर एखादा प्रश्न करील की, तुम्ही हें जें म्हणतां याला आधार तरी कोणत्या शास्त्राचा?
तर त्यास माझे असें उतर आहे कीं, सुवर्ण-लोभास्तव इराणांतील आर्य लोकांनी मागाहून जेव्हां या देशांतील सर्व मूळच्या स्थाईक अस्तिक, राक्षस वगैरे लोकांचा विध्वंस केला, त्यांपैकी उरलेल्या मुगुटमणी दस्यु १ लोकांवर लागोपाठ अनेक स्वाऱ्या करून अखेरीस त्यांस आपले दास २ करून नाना प्रकारचे त्रास देण्याची सुरुवात केली; त्यावेळी विजयी झालेल्या आर्य लोकांच्याने आपल्या शास्त्रात, पराजित केलेल्या शुद्रांची पूर्वीची खरी मुल पीठिका कशी लिहववेल? पुढे बराच काळ लोटल्यानंतर त्या सर्व गांवच्या वनांतील फळांवर जेव्हा निर्वाह होईना; तेव्हां त्यांनी थोडीशी शेती करण्याचा उद्योगत्यांचे बरेंच लागी लागले असेल. पुढे कांही काळानंतर जेव्हा चहूंकडे सुरु केल्यामुळे हत्यारेपात्यारे, औतकाठ्या वगैरे सामानसुमान नवीन करण्याची त्यास जसजशी युक्ति सुचू लागली, वाढू तसतशी त्यांनी प्रांतांचे प्रांत लागवड केली असेल व त्या मानाने लोकसंख्याही वाढू लागल्यामुळे एकंदर सर्व प्रांतातील वनचराईच्या व सरहद्दीच्या वगैरे संबंधाने सर्व देशभर लढे पडून, त्यांच्यात मोठमोठाल्या हाणामाऱ्या होऊन खुनखराब्या होऊ लागल्या असतील. त्या सर्वांचा बंदोबस्त करण्याकरिता एकंदर सर्व प्रांतांतील लोकांस एक ठिकाणी जमून सर्वानुमते त्या सर्व कामांचे निकाल सहज करण्याच फार कठीण पडू लागले असेल.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
यास्तव सर्वानुमते अशी तोड निघाली किं, एकंदर सर्व प्रांतातील गावोंगावच्या लोकांनी आपआपल्या गावांतील एकेक शहाणा माहितगार निवडून काढावा आणि त्या सर्वांनी एके ठिकाणी जमून तेथे बहुमतानें सर्व कामाचे उलगडे करून निकालास लावण्याची वहिवाट सुरू केली. यावरून आपले सर्व लोकांत हा काळापावेतो निवडून काढलेल्या पंचाचेमार्फत मोठमोठाल्या काज्जांचे निवाडे करून घेण्याची वहिवाट जारी आहे. पुढे कांहीं काळानें जेव्हां अटक नदीचे पलीकडे जाऊन कित्येक कुळांनी तेथे लागवड करून वसाहत केली व त्या मानाने चहूंकडे खानेसुमारी अफाट वाढली, तेव्हां आवर्षणामुळे कित्येक ठिकाणी पिकांस अजिबात धक्का बसून सर्व नदीनाले व तळी उताणी पडली यामुळे अरण्यांतील एकंदर सर्व पशुपक्षी जिकडे पाणी मिळेल तिकडे निघून गेले. जिकडे पहावे तिकडे उपासामुळे मनुष्यांचे लोथीच्या लोथी पडलेल्या पाहून कित्येक देशांतील धाडस पुंडांनी बहुतेक बुभुक्षित कंगालांस आपल्या चाकरीस ठेवून त्यांस आपल्याबरोबर घेऊन, आरंभी त्यांनीं आसपासच्या अबाद देशांत मोठमोठाले दरोडे घालतां घालता, त्यांचे हाताखालचे लोकांवर त्यांचा पगडा बसताच त्यांनी इतर लोकांचे राजे होण्याचे घाट घातले.

(याविषयी आतां आपण शोध करूं लागल्यास त्यांपैकीं बहुतेक पिढीजादा राजांचे घराण्यांतील मूळ पुरुष याच मालिकेंतील शिरोमणि निघतील.) त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून एकंदर सर्व देशांतील गांवकरी, यांच्या हातून हुशार प्रतिनिधींची निवडणूक करून त्याच्या संमतीनें एकंदर सर्व देशाचे संरक्षण करण्यापुरती फौज ठेवून, तिचा खर्च भागण्यापुरता शेतसारा बसवून त्याची जमाबंदी करण्याकरितां, तहशीलदारांसहित चपराशांच्या नेमणुका करून व्यवस्था केली.

त्यामुळे एकंदर सर्व देशांतील लोकांस आराम झाला असेल. नंतर काही काळाने चहूकडे सुबत्ता झाल्यामुळे बळीचे स्थान म्हणजे बलुचिस्थानचे पलीकडे कित्येक डोईजड लोभी प्रतिनिधींनी, सदरील चोरटे लोकांचे वैभव पाहून ते आपआपल्या देशाचे राजे बनतांच, पूर्वीचे लोकसत्तात्मक राज्यांचा बोज उडून ती लयास गेल्यामुळे, इराणचे आलीकडील छप्पन देशांत शाहण्णव कुलाचे प्रतिनिधींनी मात्र आपआपली निरनिराळी राज्ये स्थापून, त्या सर्वांनी एकमेकांचे सहाय्याने आपआपले राज्यकारभार निर्वेधपणे चालवले, यामुळे त्यांच्या वैभवास शेकडो वर्षे बाधा न येतां दस्यू, आस्तिक, अहीर, असूर उग्र, पिशाच मातंग ' वगैरे लोकांच्या राज्यांत सर्व प्रजा सुखी होऊन चहूंकडे सोन्याचा धूर निघूं लागला. इतकेंच नव्हें परंतु हया सर्वांमध्ये दस्यू लोक महा बलवान असल्याकारणाने त्यांचे एकंदर सर्व यावानांवर इतके वजन बसले असावें कीं, त्यापैकीं बहुतेक यवन, दस्यू लोकांबरोबर नेहमी स्नेहभाव व सरळ अंतःकरणाने वर्तन करीत, त्यामुळे दस्यू लोक हरएक प्रकारे त्यांस मदत करून त्यांचा परामर्श करीत.

यावरून यवन लोकांत दस्यू लोकांस दोस्त म्हणण्याचा प्रचार पडला असावा व त्याचप्रमाणे बाकी उरलेले यवन आर्यादि लोक दस्यू लोकांबरोब मनांतून कृत्रिमानें वागत व वेळ आल्याबरोबर त्यांच्याशीं उघड गमजा करीत, तेव्हां दस्यू लोक त्यांच्या खोडी मोडून त्यांस ताळयावर आणीत असतील, यावरून यवन व आर्य लोकांत दस्यू लोकांस वैरभावानें दुशमन व दुष्ट म्हणण्याचा परिपाठ पडला असावा; कारण दोस्त, दुश्मन आणि दुष्ट या शब्दाच्या अवयवांसहित त्यांच्यांतील भावार्थाचा मेळ दस्यू शब्दाशी सर्वाशी मिळतो.



पान क्र. १९ 

तेव्हा त्यांपैकी अठरा वर्णातील अठरा तर्हेच्या पगाड्या घालणाऱ्या “अठरा पगड जातीच्या लोकांनी” सुवर्ण लूट करण्याच्या आशेनें दस्यू लोकांच्या मुलखांत वारंवार हल्ले करण्याची सुरवात केली. परंतु बळीचे पदरच्या काळभैरव व खंडेरावासारख्या महावीरांनी त्यांची बिलकुल डाळ मळू दिली नाही. इतक्यात इराणांतील आर्य१ लोकांत तिरकमट्याची नवीन युक्ति निघाल्याबरोबर तेथील इराणी क्षेत्र्यानपैकी बहुतेक वराहासारख्या धाडस दंगलखोरांनीं, अलीकडील छपन्न देशांतील लहानमोठ्या संपतिमान राजेरजवाड्यांचा नाश २ केल्यांनंतर नरसिंह आर्य क्षेत्र्याने दस्यु लोकांचा तरुण राजपुत्र प्रल्हाद याचे कोवळे मन धर्मभ्रष्ट करून, त्याच्या सहाय्याने त्याच्या पित्याचा कृत्रिमानें वध केला.नंतर वामन आर्य क्षेत्र्याने येथील महाप्रतापी दस्युंपैकीं बळीराजास रणांगणी पाडतांच,त्यानें तिसरे दिवशी बळीचे राजधानीतील एकंदर सर्व अंगनांचे अंगावरील सुवर्णालंकारांची लूट केली, यामुळे दस्यु लोकांनी आपल्या देशांतून,आर्य लोकांस हांकून देण्याविषयीं पुष्कळ लढाया केल्या; परंतु अखेरीस परशुराम ३ आर्य क्षेत्र्यानें येथील एकंदर सर्व क्षेत्रवासी दस्यू लोकांवरलागोपाठएकवीस वेळा स्वाऱ्या करूनतांची शेवटी इतकी वाताहत केली की,त्यापैकी कित्येक महावीरांस त्यांच्या परिवारासह हल्लींच्या चीनदेशाजवळ एक ४ पायमार्ग होता, (ज्यावर पुढे कांहीं काळानें समुद्र पसरला व ज्यास हल्ली वेहरिंगची सामुद्रधुनी म्हणतात) त्या मार्गानें पाताळीं अमेरिकेतील अरण्यांत जावें लागले.

कारण तेथील कित्येक जुनाट लोकांचा व तेथील दस्यू (शूद्र) लोकांचा देवभोळेपणा, रीतिभाती, क्रिया वगैरे बऱ्याचअंशी एकमेकांशी मिळतात. मुळच्या “अमेरिकन ” लोकांत येथल्यासारखीं सूर्यवंशी, राक्षस व आस्तिक कुळे सापडतात. तेथील मुख्य “काशीक” नावांचा येथील 'काशीकरांशी' मेळ मिळतो. “कोरीकांचा' शब्द “कांचन' शब्दाशीं मिळतो. ते तेथल्यासारखे शकुनापशकून मानीत. त्या लोकांत येथील शूद्रांसारखे मेल्या मनुष्यावर पोषाक घालून प्रेताबरोबर सोनें पुरण्याची क्रिया सापडते. हल्ली सर्व शूद्र द्रव्यहीन जरी झाले, तथापि ते (अमेरिकन) शूद्रासारखें मीठ न घालतां मौल्यवान मसाला घालून पुरीत. त्यांच्यांत १ येथल्यासारखीं “टोपाजी, माणकू, अर्तिल यल्लपा व अर्तिल बाळप्पा” अशीं नांवें सांपडतात. तेथें “कानडा' नांवाचा प्रांत सांपडतो. परंतु, कांहीं काळानें मागाहून चिनी अथवा आर्य लोकांनी तेथील लोकांवर स्वाऱ्या करून त्यांस हस्तगत केले असावे; कारण त्यांनी हिंदुस्थानातील आर्य लोकांसारखे, अमेरिकेंतील पूर्वीच्या लोकांस विद्या देण्याची बंदी करून त्यांचे एकंदर मानवी अधिकार हरण करून त्यांस अति नीच मानून आपण त्यांचे ”भूदेव” होऊन, आकाशांतील ग्रहांसह पांच तत्वांची पूजा करीत होते असें आढळते. असो, परंतु येथे आर्य नाना २ पेशवे याचे दालीबंद जातबंधू परशुरामाच्या धुमाळीत, रणांगणीं पडलेल्या प्रमुख महा अरीच्या एकंदर सर्व निराश्रित विधवा स्त्रिपासून जन्म पावलेल्या अर्भकांचा त्यानें (परशुरामानें) सरसकटीनें वध करून दस्यू लोकांच्या कित्येक कुळांची दाणादाण करून, बाकी उरलेल्या एकंदर सर्व क्षेत्रवासी दस्यू लोकांचे शूद्र (दास) व अतिशूद्र (अनुदास) असे दोन वर्ग करून आर्य ब्राह्मणांनी त्यांस नाना प्रकारचे त्रास देण्याविषयी अनेक मतलबी व जुलमी ”कायदे” केले.

त्यांपैकी कांहीं कांहीं लेखी मुद्दे मनूसारख्या कठोर व पक्षपाती ग्रंथांत सांपडतात. ते असें कीं, “ज्या ठिकाणी शूद्र लोक राज्य करीत असतील, त्या शहरांत आर्य ब्राह्मणानें मूळींच राहूं नये, शूद्रास कोणत्याच तर्हेचे ज्ञान देऊ नये, इतकेंच नव्हे, परंतु आपला वेदघोष शूद्राचे कानीसुद्धा पडू देऊं नये. शूद्राबरोबर आर्यांनी अवशीपहाटेस प्रवास करूं नये. शूद्राचा मुरदा फक्त दक्षिणेकडच्या वेशीतून नेण्याविषयों परवानगी होती. आर्य ब्राह्मणांच्या मढयास शूद्रास स्पर्श करण्याची मनाई असे.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya




पान क्र. २० 

राजा भूकेनें व्याकुळ होऊन मेला तरी त्यानें ब्राह्मणांपासून कर अथवा शेतसारा घेऊ नये. परंतु राजाने विद्वान ब्राह्मणास वर्षासने कारण द्यावीत. विद्वान ब्राह्मणास ठेवी सापडल्यास त्याने एकट्यानेच त्यांचा उपभोग घ्यावा. कारण ब्राह्मण सर्वांचा धनी आहे; परंतु राजास ठेवी सापल्यांस त्याने त्यातील अर्धे द्रव्य ब्राह्मणास द्यावे. आर्य ब्राह्मणांनी कसला जरी गुन्हा केला, तरी त्याच्या केसालाही धक्का न लावतां त्यास हद्दपार मात्र करावें, म्हणजे झाले. ब्राह्मणांनी आपली सेवाचाकरी शूद्रांस करावयास लावावें, कारण देवाजीनें शूद्रास ब्राह्मणाची सेवा करण्याकरितांच उत्पन्न केले आहे. जर ब्राह्मणाने एखाद्या शत्रूस आपल्या काही नाजूक कामांत उपयोगी पडल्यावरून, स्वतःच्या दास्यत्वापासून मुक्त केलें, तर त्यास पाहिजेल त्या दुसन्या भटब्राह्मणांनी पकडून आपलें दास्यत्व करावयास लावावे.

कारण देवाजीने त्यास त्यासाठीच जन्मास घातले आहे. ब्राह्मण उपाशीं मरुं लागल्यास त्याने आपल्या शूद्र दासाचे जें काय असेल, त्या सर्वाचा उपयोग करावा. बिनवारशी ब्राह्मणाची दौलत राजानें कधीं घेऊं नये, असा मूळचा कायदा आहे. परंतु बाकी सर्व जातीची बिनवारशी मालमिळकत पाहिजे असल्यास राजानें घ्यावी. ब्राह्मण गृहस्थांनी जाणूनबुजून गुन्हे केले, तरी त्यांस त्यांच्या मुलाबाळांसह त्यांची जीनगीसुद्धा त्यांबरोबरदेऊन फक्त हद्दपार करावे. परंतु तेच गुन्हे इतर जातीकडून घडल्यास त्यांस त्यांच्या गुन्हयांच्या मानाप्रमाणे देहांत शिक्षा करावी. ब्राह्मणाचे घरीं शूद्रास चाकरी न मिळाल्यास त्यांची मुलेंबाळे उपाशी मरूं लागल्यास त्यांनी हातकसबावर आपला निर्वाह करावा.

अक्कलवान शुद्रानेही जास्ती दौलतीचा संचय करू नये. कारण तसे केल्यापासून त्याला गर्व होऊन तो ब्राह्मणाचा धिकार करू लागेल. ब्राह्मणानें शूद्रापाशीं कधीही भिक्षा मागू नये. कारण त्या भिक्षेच्या द्रव्यापासून त्यानें होमहवन केल्यास तो ब्राह्मणं पुढल्या जन्मी चांडाळ होईल. ब्राह्मणाने कुतरे,मांजरे,घुबड अथवा कावळा मारला, तर त्याने त्याबद्दल शूद्र मारल्याप्रमाणे समजून चांद्रायण प्रायश्चित केले म्हणजे तो ब्राह्मण दोषमुक्त होईल. ब्राह्मणांनी बिनहाडकांची गाडाभर जनावरे मारली अथवा त्यांनी हाडकांच्या हजार जनावरांचा वध केला असता,त्यांनी चांद्रयान प्रायश्चित घेतले म्हणजे झाले.शुद्रांनी आर्यब्राह्मणास गावताच्या काडीने मारिले, अथवा त्याचा गळा धोतराने आवळला, अथवा त्यांना बोलतांना कुंठित केलें, अथवा त्यास धिःकारून शब्द बोलले असतां, त्यांनी ब्राह्मणाचे पुढे आडवें पडून त्यांपासून क्षमा मागावी.”१

याशिवाय शूद्राविषयीं नानाप्रकारचे जुलमी लेख आर्य ब्राह्मणांचे पुस्तकांतून सांपडतात, त्यांपैकी कित्येक लेख येथे लिहिण्याससुद्धां लाज वाटते. असो, त्यानंतर आर्य लोकांनी, आपल्या हस्तगत करून घेतलेल्या जमिनीची लागवड सुरळीत रीतीनें करण्याचे उद्देशानें दस्यू लोकांपैकीं प्रल्हादासारख्या कित्येक भेकड व धैर्यहीन अशां लोकांनी स्वदेशबांधवांचा पक्ष उचलून आर्य ब्राह्मणांशीं वैरभाव धरून तद्नुरूप आरंभापासून तों शेवटपर्यंत कधींही हालचाल केली नाही. त्यांस गांवोगांवचे कुळकर्ण्याचे कामावर मुकरर करून आपले धर्मात सरतें करून घेतले. यावरून त्यांस देशस्थ ब्राह्मण म्हणण्याचा प्रघात पडला आहे, कारण देशस्थ ब्राह्मणांचा व येथील मूळच्या शूद्र लोकांच्या रंगरूपाशीं, चालचलणुकीशीं व देव्हाऱ्यावरील कुळस्वामीशीं बहुतकरून मेळ मिळतो व दुसरें असें कीं, देशस्थ व कोकणस्थ ब्राह्मणांचा हा काळपावेतों परस्परांशीं बेटी व रोटी व्यवहारसुद्धां मुळीच होत नव्हता.

परंतु कालच्या पेशवेसरकारांनी देशस्थ ब्राह्मणांबरोबर रोटीव्यवहार करण्याचा प्रघात घातला. सदरची व्यवस्था अमलांत आणून आर्य ब्राह्मण तेथील भूपती झाल्यामुळे त्यांचा बाकीचे सर्व वर्णाचे लोकांवर पगडा पडून त्यांस अठरा वर्णाचे ब्राह्मण गुरु २ म्हणू लागले व त्यांनी स्वतः स्वर्गपाताळ एक करून सोडल्यानंतर आतां कांहीं कर्तव्य राहिले नाहीं, अशा बुद्धीनें ताडपत्रे नेसून, छातीवर तांबडी माती चोळून, दंड थोपटण्याचे विसरून त्याबद्दल स्नानसंध्या करून, चंदनाच्या उट्या लावून, कपाळावर केशर, कस्तुरीचे टिळे रेखून, स्वस्थ बसून मौजा मारण्याचा क्रम आरंभिला. त्यांपैकी कोणी भांगेच्या तारेंत नानाप्रकारचे अपस्वार्थी ग्रंथ करण्याचे नादांत, कोणी योगमार्ग शोधून काढण्याचे खटपटीत पडून, बाकी सर्वानी आपआपसांत एकमेकांनी एकमेकांस ”अठरा वर्णांमध्ये ब्राह्मण गुरु श्रेष्ठ” म्हणण्याचा प्रचार सुरू केला. त्याच सुमारास येथील जंगल (ज्यू) फिरस्ते बकालांनी आपला धर्म स्वीकारावा, म्हणून आर्य ब्राह्मणांनी त्यांचा पाठलाग केला.

यावरून त्यांनी संतापून आर्यांचे विरुद्ध नानाप्रकारचे ग्रंथ करून आर्यधर्माची हेळणा करण्याकरितां आपआपल्या जवळच्या आत्मलिंगाची पूजा करू लागल्यामुळे लिंगाइतांचा एक निराळाच धर्म झाला असावा. नंतर आर्यब्राह्मणांच्या स्वाधीन झालेल्या येथील एकंदर सर्व क्षुद्र शेतकरी दासांचा, त्यांनी सर्वोपरी धिःकार करण्याची सुरुवात केली. त्यांस विद्या देण्याची आटोकाट बंदी करून त्यांची स्थिति पशूच्याही पलीकडच्या मजलशीस पोहोचविली व ते अक्षरशत्रु अतैव ज्ञानशून्य झाल्यामुळे, त्यांस आज दिवसपावेतों राज्य व धर्मप्रकरणीं आर्य ब्राह्मण इतके नागवितात कीं, त्यांच्यापेक्षां अमेरिकेतील जुलमाने केलेल्या हप्शी गुलामांचीसुद्धां अवस्था फार बरी होती, म्हणून सहज सिद्ध करत येईल. तथापि अलीकडे कांही शतकांपूर्वी, महमदी सरकारास त्यांची दया येऊन त्यांनी या देशांतील लज्ञावधि शूद्रादि अतिशूद्रांस जबरीनें मुसलमान करून त्यांस आर्य धर्माच्या पेचातून मुक्त करून, त्यांस आपल्या बरोबरीचे मुसलमान करून सुखी केले. कारण त्यापैकी कित्येक अज्ञानी मुसलमान मुलाने व बागवान आपल्या लग्नांत येथील शूद्रादि अतिशूद्रासारखे संस्कार करितात, याविषयीं वहिंवाट सांपडते.



पान क्र. २१ 

त्याचप्रमाणे पोर्तुगीज सरकारनें या देशांतील हजारों शूद्रादि अतिशूद्रांस व ब्राह्मणांस जुलमाने रोमन क्याथालिक ख्रिस्ती करून त्यांस आर्यांचे कृत्रिमी धर्मापासून मुक्त करून सुखी केले. कारण त्यांच्यामध्ये कित्येक ब्राह्मण शुद्रांसारखी गोखले,भोंसले, पवार वगैरे आडनांवाचीं कुळे सांपडतात. परंतु हल्ली अमेरिकन वगैरे लोकांच्या मदतीनें, या देशांतील हजारों हज़ार गांजलेल्या शूद्रादि अतिशूद्रांनी, ब्राह्मणधर्माचा धिःकार करून, जाणूनबुजून ख्रिस्ती धर्माचा अंगीकार करण्याचा तडाखा उडविला आहे, हे आपण आपल्या डोळयानें ढळढळीत पहात आहो. कदाचित सदरच्या शूद्रादि अतिशूद्रांच्या दुःखाविषयी तुमची खात्री होत नसल्यास, तुम्ही नुकतेच अलीकडच्या दास शेतकऱ्यांपैकी सातारकर शिवाजी महाराज, बडोदेकर दामाजीराव गायकवाड, ग्वालेरकर पाटीलबुवा, इंदुरकर लाख्या बारगीर, यशवंतराव व विठोजीराव होळकरासारख्या बडे बडे रणशूर राजेरजवाड्यांविषयीं, थोडासा विचार करून पाहिल्याबरोबर ते अक्षरशून्य असल्यामुळे त्यांजवर व त्यांच्या घराण्यांवर कसकसे अनर्थ कोसळले हें सहज तुमचे लक्षांत येईल; यास्तव त्याविषयीं तूर्त येथे पुरें करितों.

असो, येथील छप्पन देशांतील राजांनी सदरचे लोकसत्तातमक राज्याची कंस सोडली व त्यामुळे आर्य ब्राह्मणांनी दस्यू वगैरे लोकांची वाताहात करून हा काळपावेतों त्यांची अशी विटंबना करीत आहेत, हें त्यांच्या कर्मानुरूप त्यांस योग्य शासन मिळालें, यांत कांहीं संशय नाहीं, तथापि इराणापलीकडील ग्रीशियन लोकांनी फिलाय्पासून प्रजासत्ताक राज्य आपल्या काळजापलीकडे संभाळून ठेवले होतें. पुढे जेव्हां इराणांतील मुख्य बढाईखोर “झरक्सिस" यानें ग्रीक देशाची वाताहातं करण्याकरिता मोठ्या डामडौलानें आपल्याबरोबर लक्षावधि फीज घेऊन, ग्रीस देशाचे सरहद्दीवर जाऊन तळ दिला, तेव्हां स्पार्टा शहरांतील तीनचारशें स्वदेशाभिमानी शिपायांनी रात्री एकेकी थरमॉंपलीच्या खिंडीतून येऊन त्यांचे छावणीवर छापा घालून त्यांच्या एकंदर सर्व इराणी फौजेची त्रेधात्रेधा करून, त्यांस परत इराणांत धुडकावून लाविलें.

हा त्यांचा कित्ता इटाली देशांतील रोमन लोकांनीं जेव्हां घेतला, तेव्हां ते लोक प्रजासत्तात्मक राज्याच्या संबंधानें एकंदर सर्व युरोप, एशिया व आफ्रिका खंडांतील देशांत विद्या, ज्ञान व धनामध्ये इतकें श्रेष्ठत्व पावले की, त्यांच्यामध्ये मोठमोठे नामांकित वक्ते व सिपियोसारखे स्वदेशाभिमानी योद्धे निर्माण झाले. त्यांनी आफ्रिकेतील हनीबॉलसारख्या रणधीरांचा नाश करून तेथील एकंदर सर्व लोकांस यथास्थित शासन केले.

नंतर त्यांना पश्चिम समुद्रांत ग्रेट ब्रिटन बेटांतील, अंगावर तांबड्यापिवळ्या मातीचा रंग देऊन कातडी पांघरणाऱ्या रानटी इंग्लिश वगैरे लोकांस, वस्त्रपात्रांचा उपयोग करण्याची माहिती करून देऊन, आपल्या हातांत चारपांचशे वर्षे छडी घेऊन त्या लोकांस प्रजासत्तात्मक राज्याचा धडा देऊन वळण लावीत होते; तो इकडे रोमन सरदारांपैकी महाप्रतापी जुलीअस सीझरने आपल्या एकंदर सर्व कारकीर्दीत सहा लक्ष रोमन शिपायांस बळी देऊन अनेक देशांतील पीढीजादा राजेरजवाड्यांवर वर्चस्व बसविल्यामुळे, त्याच्या डोळयावर ऐश्वर्याची इतकी धुंदी आली किं, त्याने आपल्या मूळप्रजासत्तात्मक राज्यरूपमातेवर डोळे फिरवून, तिच्या सर्व अवदात्यालेक्रांस आपले दासानुदास करून, आपण सर्वांचा राजा होण्याविषयी मनामध्ये हेतु धरिला.

त्या वेळेस तेथील महापवित्र स्वदेशाभिमानी, ज्यांना असे वाटलें कीं, या राज्यसत्तात्मकतेपासून पुढे होणारी मानहानी आमच्यानें सहन होणार नाही, त्यांपैकी ब्रुटस नांवाचा एक गृहस्थ आपल्या हातांत नागवा खंजीर घेऊन, ज्युलिअस सीझर प्रजासत्तात्मक राज्यमंदिराकडे सिंहासनारूढ होण्याचे उद्देशानें जात असतां, वाटेमध्ये त्याचा मार्ग मोकळा रोखून उभा राहीला. नंतर ज्युलिअस सीझर याने आपल्या मार्गांने आडव्या आलेल्या ब्रूटसाच्या डोळयांशीं डोळा लावल्याबरोबर मनामध्यें अतिशय खजिल होऊन, आपल्या जाम्याच्या पदराने तोंड झांकताच, ब्रुटसाने आपल्या स्वदेशबांधवांस भावी रज्यसत्तात्मक शृंखले पासून स्वालंब करण्यास्तव परस्परांमध्ये असलेल्या मित्रत्वाची काडीमात्रा पर्वा न करितां, त्यांच्या (ज्युलियस सीझरच्या) पोटांत खंजीर खुपसून, त्याचा मुरदा धरणीवर पडला.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya


पान क्र. २२ 

परंतु ज्युलिअस सीझरने पूर्वी सरकारी खाजीन्यांतील पैसा बेलगामी खर्ची घालून सर्व लोकांस मोठमोठाल्या मेजवान्या दिल्या होत्या, त्यामुळे तेथील बहुतेक ऐषआरामी सरदार त्याचे गुलाम झाले होते, सबब पुढे चहूंकडे भालेराई होऊन, तेथील प्रजासत्ताक राज्याची इमारत कोसळून, बारा सिझरांचे कारकीर्दीचे अखेरीस रोमन लोकांच्या वैभवाची राखरांगोळी होण्याच्या बेतांत रोमी लोक, इंग्लिश वगैरे लोकांस जागचे जागीं मोकळे सोडून, परत आपल्या इटाली देशांत आले. परंतु त्याच वेळीं इंग्लिश लोकांस आसपास स्कॉच, स्याक्सन वगैरे लोक अट्टल उत्पाती असल्यामुळे त्यांनी एखाद्या बावनकशी सुवर्णामध्ये तांब्यापितळेची भेळ करावी, त्याप्रमाणे, त्य प्रजासत्ताक राज्यपद्धतीमध्ये वंशपरंपराधिरूढ बडे लोकांची व राजांची मिसळ करून, त्या सर्वांचे एक भलेंमोठे तीन धान्यांचे गोड मजेदार कोडबुळे तयार करून, सर्वांची समजूत काढली. त्या देशांत जिकडे डोंगराळ प्रदेश असल्यामुळे लागवड करून सर्वांचा निर्वाह होण्यापुरती जमीन नसून, थंडी अतिशय; सबब तऱ्हेतऱ्हेच्या कलाकौशल्य व व्यापारधंद्याचा पाठलाग करितांच, ते या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकंदर सर्व बेटांसह चार खंडांत विद्या, ज्ञान व धन संपादन करण्याचे कामी अग्रगण्य होत आहेत, तों इकडे आरबस्थानांतील हजारात महमद पैगंबराचे अनुयायी लोकांनी इराणांतील मूळच्या आर्य लोकांच्या राज्य वैभवासह त्यांची राखरांगोळी करून, या ब्राह्मणांनी चावून चिपट केलेल्या अज्ञानी हिंदुस्थानांत अनेक स्वाऱ्या करून हा सर्व देश आपल्या कबजांत घेतला.

नंतर मुसलमानी बादशहा दिवसा तानसेनी गाणीं ऐकून रात्रीं जनानखान्यात लंपट झाले आहेत, इतक्यांत महाकुशल इंग्रजांनी मुसलमानांच्या पंगड्यांवर घण मारून हा देश सहज आपल्या बगलेंत मारला, यामध्ये त्यांनी मोठा पुरुषार्थ केला, असे मी म्हणत नाहीं. कारण येथील एकंदर सर्व प्रजेपैकीं एक दशांश ब्राह्मणांनी आपल्या कृत्रिमी धर्माच्या आडून लेखणीच्या जोरानें, धर्म व राजकीय प्रकरणी बाकीच्या नऊ दशांश लोकांस विद्या, ज्ञान, शौर्य, चातुर्य व बल याहींकरून हीन करून ठेविलें होतें. परंतु यापुढे जेव्हां इंग्रज लोकांस नऊ दशांश लोकांस विद्या, ज्ञान, शौर्य, चातुर्य व बाल याहींवरून हीन करून ठेविले होते.

परंतु यापुढे जेव्हा इंग्रज लोकांस नऊ दशांश शूद्रादि अतिशूद्र लोकांचा स्वभाव सर्व कामांत रानटी व आडमूठपणाचा असून ते सर्वस्वी ब्राह्मणांचे धोरणानें चालणारे, असें त्यांच्या प्रचीतीस आले; तेव्हां त्यांनी महाधूर्त ब्राह्मणास नानाप्रकारच्या लालची दाखवून एकंदर सर्व कारभार त्यांजकडे सोपवून, आपण सर्व काळ मौल्यवान वस्त्रे, पात्रे, घोडे, गाड्या व खाण्यापिण्याच्या पदार्थात लंपट होऊन, त्यांमध्ये मन मानेल तसे पैसे उधळून, एकंदर सर्व युरोपियन व ब्राह्मण कामगारांस मोठमोठ्या पगारांच्या जागा व पेनशनें देण्यापुरतें महामूर द्रव्य असावे या हेतूने, कोरड्या ओल्या कोंड्याभोंड्यांच्या भाकरी खाणाऱ्या, रात्रंदिवस शेतीत खपणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्याच्या शेतावर दर तीस वर्षांनी, पाहिजेल तसे शेतसारे वाढवून, त्यांच्या अज्ञानी मुलांबाळांस विद्या देण्याची हूल दाखवून, त्या सर्वांच्या बोडक्यावर लोकलफंड या नांवाचा दुसरा एक कराचा बोजा लादला आणि त्यांनी (शेतकऱ्यांनी) आपल्या मुलांबाळांसह रात्रंदिवस शेतांत खपून धान्य, कापूस, अफू, जवस, वगैरे काला कित्ता मोठ्या कष्टाने कमावून शेतसाऱ्यासुद्धा लोकलफंडाचे हप्ते अदा करण्याकरिता त्या सर्व जीनसांत बाजारांत नेऊन दान करावयास जाण्याचे राजमार्गांत, दर सहा मैलावर जागोजागी जकाती बसवून त्यांजपासून लाखो रुपये गोळा करू लागले. 
पुढील पान..


महात्मा फुलेंचे संपूर्ण साहित्य अॅप स्वरुपात येथे उपलब्ध आहे..

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.