शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
आसूडचा तिसरा भाग लिहून तयार केल्यानंतर दुसरे दिवशीं तिसच्या प्रहरी अंगावर भगवीं वस्त्रे, गळ्यांत तुळशीची माळ घातलेला मुंबईतील एक शूद्र जातीचा कबीरपंथी वाचाळ, पंढरपुरीं खेट्या घालणारा साधू माझे घराचे अंगणांत येऊन बाकावर बसला. हे माझे घरचे मनुष्यानें मला घरांत येऊन कळविल्याबरोबर मी बाहेर येऊन त्यांस विचारलें कीं, “कां बुवासाहेब, आपण इकडे का येणे केले आणि आपली काय मर्जी आहे? ते सर्व कळल्यास मला फार संतोष होणार आहे.” बु-”तुम्हांसच जोतीराव फुले म्हणतात काय? मी-”होय, याच देहाला जोतीराव फुले म्हणतात." बु-”बरें तर आपण हिंदु असून कांही इंग्रजी अभ्यास केल्यावरून आतांशे हिंदुधर्माचा धि:कार करूं लागलात, यास्तव हिंदू धर्माचे मुख्य चार वेद ईश्वरी कृत्ये आहेत किंवा कसें, याविषयी माझ्या मनाची खात्री करून घ्यावी, या इरादयानें येथे मी आलों आहे.” मी-”हिंदु धर्मातील चार वेद आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनीं कोठे पाहिले आहेत काय?” बु-”हाय, ते चार वेद एक ब्राह्मणाचे घरीं मी आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहेत.” मी-“ते ग्रंथ ईश्वरानें स्वतः लिहिले याविषयी तुम्ही कांही खात्रीलायक प्रमाण देऊं शकाल काय?"
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
बु-”त्याविषयी ब्राह्मणांच्या गप्पाष्टकांशिवाय दुसरे खात्रीलायक प्रमाण नाही.” मी-“असो, प्रथम ईश्वराला आकार आहे किंवा कसें?" बु-”ईश्वराला आकार कोठून असणार? तो निराकार परमात्मा आहे." मी- “तर निराकार परमात्म्यानें चार वेद कसे तयार केले?" बु-”त्याविषयी ब्राह्मण लोक तुम्हांस उत्तर देतील. हें त्यांचे त्यांसच विचारा, म्हणजे बरें होईल." मी-”दुसरें असें की, ईश्वरानें सर्व मानवी प्राण्यांचा उद्धार करण्यासाठी चार वेद तयार केले आहेत.” मी- “तिसरें असें की, ईश्वरानें कोणत्या भाषेत चार वेद तयार केले?" बु-”ईश्वरानें चार वेद संस्कृत भाषेत तयार केले." मी-”चवर्थे असें की, हल्ली या भूगोलावरील चार खंडासह एकंदर सव बेटांतील लोकांस संस्कृत भाषा येते काय?” बु “सांप्रत या भूमंडळावरील फारच थोड्या चौकस प्रदेशांतील लोकांस संस्कृत भाषेतील अर्थ समजतो.” मी-“यावरून एकंदर सर्व मानवी प्राण्यांच्या उद्धाराकरितां ईश्वरानें चार वेद तयार केले, असें सिद्ध होत नाही. कारण या भूमंडळावर शेकडों तन्हेच्या भाषा बोलणारे लोक आहेत. त्यांतून बहुतक देशांतील लोकांस संस्कृत भाषा तर मुळीच येत नाही. त्यांनी चार वेदांपासून आपला उद्धार करून घ्यावा याविषयी तुमचे काय म्हणणे आहे?"
बु-”ज्या वेळी ईश्वरानें चार वेद तयार केले, त्या वेळीं एकंदर सर्व खंडांसह बेटांतील लोक संस्कृत भाषा बोलत असतील, यावरून ईश्वरानें चार वेद संस्कृत भाषेत तयार केले असावेत. परंतु पुढे कांहीं काळानें अशा नानाप्रकारच्या भिन्नभिन्न भाषा पुढे निर्माण झाल्या असाव्यात, असें अनुमान होतें." मी-”अशा (निरनिराळ्या) भाषा पुढे निर्माण होतील, हें ईश्वरास वेद तयार करतेवेळी पूर्वी कळले नाही? यावरून त्याचे त्रिकाळ ज्ञानास व सर्वसाक्षीपणास बाध येतो की नाही? शिवाय “जरमन, स्काच, इंग्लीश" वगैरे लोकांतील “म्याक्सम्युलर" सारख्या विदवानास चार वेदांचे चांगलें परिज्ञान झालें असून त्यांनी आपल्या ख्रिस्ती धर्माचा धिःकार (पंडिता रमाबाईनें आर्यधर्माच्या नाकाला चुना लावल्यामुळे धुर्तातील एक अनामीक भागूबाई विद्ववान तोंडांत बोट घालून “xxबागxxवी” म्हणून आपला गुजारा करीत आहे.) करून वेदधर्माचा स्वीकार कां केला नाही, याचे मोठे आश्चर्य वाटतें."
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
बु “म्याक्सम्युलरसाहेबास” कदाचित ब्राह्मणासारखा गळ्यांत पांढरा टोर घालून युरोपातील थंड देशांत त्रिकाळ स्नानसंध्या करीत बसण्याचे भय वाटल्यामुळे त्यांनीं तसे केले असेल, असे वाटते. यास्तव त्यांतील खरें व्यंगित त्यांचे मनाला ठावें. मी त्याविषयी काय सांगू?” मी-“जर ईश्वरानें सर्व मानवी प्राण्यांचा उद्धार करण्यासाठी चार वेद तयार केले होते, तर भटब्राह्मणांनी हिंदुपैकी शूद्रादि अतिशूद्रांस चार वेदांचे अध्ययन करण्याची मनाई केली नसती. यावरून त्यांनी ईश्वराचे आज्ञेचा भंग केल्यामुळे वेदकर्ता उगीच कसा एकीकडे लपून बसला व त्यांपासून शूद्रादि अतिशूद्र लोकांचे थोडें कां नुकसान होत आहे? यास्तव त्यांनीं वेदकत्र्या ईश्वरासहित चार वेदांवर भरोसा ठेवून आपल्यास हिंदु तरी कशाकरितां म्हनवून घ्यावें?" बु.-“शूद्राद अतिशूद्र लोकांस चार वेद अध्ययन करण्याविषयीं भटब्राह्मणांनी कधींच मनाई केली नाहीं कित्येक भटब्राह्मण लोक पोटासाठी पाद्रीसाहेबांच्या घरोघर जाऊन त्यांस वेद शिकवितात आणि ते तुमचे शूद्रादि अतिशूद्र लोक दरिद्री असल्यामुळे त्यांना वेद अध्ययन करण्याची ऐपत ਸ੍ਵੱਧ नाहीं. त्यास ब्राह्मणांनी करावें तरी काय? असे बहुतक ब्राह्मणांचे म्हणणे आहे.”
मी-“यावरून असें दिसतें कीं, ब्राह्मणांचे कपट आपल्यास काहीच माहित नाही. बरे असो, तसे का होईना, धर्माच्या नावावर निर्वाह करणारे पाद्री लोक वेद शिकण्याकरितां पैसे खर्च करण्यापुरते श्रीमंत आहेत काय? आणि शूद्रांपैकी भोसले, शिदे, होळकर, गायकवाड वगैरे राजेरजवाडे हे वेद शिकण्यापुरते भटब्राह्मणांस पैसे देण्याकरितां दरिद्री आहेत काय? त्यांतून एकासही आपल्या मुलास चार वेद अध्ययन करण्यापुरते सामर्थ्य नाही? ते सर्वच का युरोपियन पाद्रीसाहेबांपेक्षा कंगाल आहेत, असे तुम्हास वाटते काय? बुवासाहेब! अहो, या सर्व शूद्र राजेरजवाड्यांच्या दरबारांत वैदिक, शास्त्री, जोशी व कथाडे निरंतरच्या उपदेशावरून त्या अज्ञान्यांची त्यांवर इतकी भक्ति जडते की, कोणी राजा रामदासाचे घराण्यास जहागीर करून देतो. कोणी एकंदर हिंदुस्थानांतील क्षेत्रवासी भटब्राह्मणांस सतत एक महिनाभर बुंदीची भोजने देतो. कोणी पुण्यातील ब्राह्मणांस सोन्याच्या पुतळ्या वाटतो. यावरून सर्वच शूद्र दरिद्री आहेत, असें सिद्ध होत नाही. त्यांतून एकातरी भटब्राह्मणार्ने आपली भीड खर्ची घालून सदरच्या राजेरजवाड्यांतून एका यजमानापासून तरी, त्याच्या राज्यांतील शूद्र शेतकरी बांधवांचे मुलांकरितां गावोगांव शाळा घालवून त्यामध्यें एकदोन विद्वान करावयाचे होते अहो, यांच्यापेक्षा परदेशस्थ असून अन्यधर्मी भिक्षुक पाद्री हजार वाटेनें बरे म्हटले पाहिजेत का नाही? कारण शूद्रादि अतिशूद्ध लोक आज हजारों वर्षापासून हया ब्राह्मण लोकांच्या पाशांत राहून दिवस काढीत आहेत. त्यांना त्यांतून मुक्त करण्यास्तव त्यांनी आपल्या मुलखांत रिव्रस्ती लोकांपाशीं भिक्षा मागून त्या पैशांनें येथे शिदे, होळकर, गायकवाड वगैरे शूद्र राजेरजवाड्यांचे जातबांधवांस सरकारी शाळेतील ब्राह्मण विद्याथ्र्याचे तोलाचे विद्वान केल्यामुळे, ते ब्राह्मन कामगारांचे बरोबर मोठ्या शेखीनें वकिलीचीं व सरकारी हुद्यांची कामें करीत आहेत. ह्यावरून त्यांना आतां मूळची आपली स्थिती कशी होती आणि हल्लीं आपली स्थिती कशी होत चालली आहे, हें कळत नसेल काय? परंतु शूद्ध लोक किती हतभाग्य व किती असमंजस समजले पाहिजेत की, त्यांना या कामीं एवढे मोठे इंग्रज सरकारचे सहाय्य मिळूनही, ह्या पाशांतून मुक्त होण्याची इच्छा न होतां, हल्लीं मिळालेलें पोकळ वैभव कदाचित हातचे जाईल, या भीतिस्तव ब्राह्मण कामगारांचे पुढे हांजी हांजी करून एवढ्यांतच कृतार्थ मानून आपआपल्या डौलांत गुंग झाले आहेत."
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
https://goo.gl/4ymbya
बु-”असें जर आहे, तर आपण आपल्या शूद्र राजेरजवाड्यांकडे जाऊन त्यांनी आपल्या शूद्र बांधवांचे मुलांकरितां गांवोगांव शाळा घालून त्यांस विद्या द्यावी, म्हणून त्यांची प्रार्थना का करत नही?” मी-“अहो महाराज, त्यांच्या दरबारांत ब्राह्मण कारभाज्यांचे इतके प्राबल्य वाढलें असतें की, तेथे माझी गरिबाची दाद ते कशी लागूं देतील?" बु-”असें कर्से म्हणता? अहो, जेथे तुमच्या पुण्यांतील नाच्या पोरांच्या मागे तुणतुण्यावर झील धरून गाणे गाणान्या कुशा घोंगड्यानें बडोद्याहून हजारों रुपये कमावून आणिले; आणि तशा ठिकाणीं फक्त त्यांस त्यांच्या जातबांधवांच्या बण्याच्या दोन गोष्टी सांगण्यापुरती त्याजपाशीं तुमची दाद लागणार नाही, म्हणून म्हणतां हें कसे?” मी-”राजेसाहेब तमासगिरांचे छंदास लागावेत हा कारभाज्यांचा मूळ हेतु असतो. त्याप्रमाणे ते त्यांचे नाटों लागले म्हणजे यास त्याच्या राज्यकारभारात हात घालून आपला फायदा करून घता यता. त्याचप्रमाण परभारें राजेसाहेबांकडून युरोपियन" कमगारांस मोठमोठाल्या मेजवान्या देववितात व आमच्यासारख्यांच्या सल्ल्यावरून कारभारी लोकांचे नुकसान आहे, कारण, राजेसाहेबांनी शूद्र शेतकऱ्यांचे मुलांस विटवान केल्यामुळे ते पुढे मोठमोठ्या हृदयांची कामें करू लागल्यास कारभाऱ्यांच्या ब्राह्मण जातबांधवांचे मुलांस नांगर हांकून कपाळी शेतीचा धंदा व चिखलमातीचीं कामें करण्याचे येईल का नाही बरें?" बु-”असा डावपेंच ब्राह्मण लोकांत नसेल असें मला आजपर्यंत वाटत होतें. परंतु आज माझी खात्री झाली, यावरूनच बावा ! हे धूर्त ब्राह्मण कारभारी शूद्र राजेरजवाड्यांची मुलें वयांत आल्याबरोबर त्यांस राज्यकारभार चालविण्याचे ज्ञान नाहीं, म्हणून तूर्त राज्यकारभार देऊं नये, असें इंग्लिश सरकारास लिहिण्यास कमी करीत नाहीत, कारण तसे केल्यापासून आपली सरकारास हुशारी आणि राजपुत्रांची गाफली समजून आपण तेथील कारभारी होतांच, दिवसा तेथील राजपुत्रांच्या गळ्याला माकडाप्रमाणे दोरी लावून, साहेब लोकांचे बंगलोबंगली त्यांची धिंड मिरवून, रात्रीं त्यांना नाचतमाशांचे नार्टी लावून आपण त्यांच्या दौलतीची वाताहत करीत नसतील कशावरून?” मी-“जो काळपावेतों आमचे शूद्र राजेरजवाडे शुद्धीवर येऊन आपआपल्या मुलाबाळांसह आपल्या पदरच्या शूद्र मानकऱ्यांस विद्वान करणार नाहीत, तों काळपावेतों ब्राह्मण कारभारी असे करण्याचे सोडणार नाहीत. यास्तव तशा गोष्टींचा येथे उच्चार करून कांहीं फायदा होणे नाही. शूद्र आपल्या कर्माप्रमाणे फळे भोगीत आहेत व त्याचप्रमाणे ब्राह्मण कारभारी आपआपल्या केलेल्या कर्माची कधी तरी फळे भोगतील." बु- “बरें तर, आतां मी येतों.”
मी-“आपली मर्जी, या राम राम.”
पुणे तारीख ६ एप्रिलसन १८८३ ईसवी. स
जो. गो. फु.
स. शो. स. स.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.